विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 November 2023

पराक्रमाचे तमाशे दाखवावेत अस छत्रपती शिवाजी महाराज का म्हणायचे?

 


पराक्रमाचे तमाशे दाखवावेत अस छत्रपती शिवाजी महाराज का म्हणायचे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनाशासाठी मिर्झा राजा जयसिंग याने हजार ब्राम्हण अनुष्ठानास बसवून कोटी चंडी यज्ञ केला होता.
काय फलित मिळाले?
छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटल्यावर मिर्झा राजाची औरंगजेबाने हत्या घडवून आणली.
आता हा झाला इतिहास. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून इतिहास लक्षात ठेवायचा असतो.
मंत्रांचा उपयोग हा कल्याणासाठी करायचा असतो. कोणाच्या विनाशासाठी नाही. मग तो कोणीही असो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्व कर्तुत्व दाखवून यश संपादन केले आहे.
मिर्झा राजाने जसा होम हवन केला तसा होम हवन छत्रपती शिवाजी महाराजही औरंगजेबाच्या किंवा अफजल खानाच्या विनाशासाठी करू शकले असते. पण त्यांनी तो केला नाही.
का?
कारण कर्तृत्वाचे सामर्थ्य हे मंत्रांच्यापेक्षा जास्त असते.
इतिहासातून आपण शिकत नाही म्हणूनच लोक आता खेळातही होम हवन करू लागले आहेत...
असो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालावे की मिर्झा राजा जयसिंगाच्या हे ज्याने त्याने आपल्या विचाराने ठरवावे..

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...