एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपञ ठेवलेली जी माणसे महारांजाच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदिच सुरूवातीपासून जे होते त्यांपैकी विषेश उल्लेख हा सरदार कान्होजीराजे जेधे यांचा करावा लागतो…
सरदार कान्होजी जेधे हे इतर सरदारच्या वतनवाडी पेक्षा ते स्वामिनीष्ट कार्यतर जीवन जगले.
अशा महापुरषावर महाकाव्यच होवे !
संपूर्ण बारा मावळामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने व सचोटीच्या वर्तनाने आपला दरारा बसविला होता.
कितीही अवघड किल्ला असला तरी कान्होजीचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते ते म्हणजे शिडया व माळा लाऊन सैनिक गडावर चढविणे व गड सर करणे.
तसेच मलिक अंबर या निजामशहाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होता.
त्यांच्या समवेत कान्होजीने अनेक लढायात आपली मर्दुमकी दाखून निजामशाही पासून कान्होजी नांवारुपास आले होते...
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते.
“कान्होजी ! तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी.
स्वराज्याला तुमची गरज आहे.
आपण शूर लढवय्ये आहात.
अनुभवी आहत.
बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.”
असे म्हणत, शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नयनांनी मिठी मारली.
शहाजीराजांचे बोल ऐकून कान्होजी जेधे शिवाजीराजांचेकडे येवून त्यांना म्हणाले,
“महाराजांनी (शहाजी) शपथ घेऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे. खास व पाचजण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ”
असे म्हणून स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी कान्होजी जेधे यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना सर्वोतपरी सहकार्य केल.
आपल्या साही मुलांसह अफजलखानाच्या सैन्याचा फडशा पडला.
कान्होजी जेधे यांनी नि:स्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम दिले होते...
आजही ‘कारी’ त असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे.
प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास अंबवडेस जरूर जावे.
तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल……
पोस्ट सौजन्य...
history_maharashtra
No comments:
Post a Comment