मराठ्यांच्या शेवटच्या लढाईचा साक्षीदार दुर्ग शिवपट्टण(खर्डा भुईकोट)
शिवपट्टण हे प्रसिद्ध आहे मराठ्यांच्या शेवटच्या मोठ्या विजयासाठी. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाई जणू हादरली होती. माधवरावांच्या नेतृत्वाखाली पेशवाई सुरू होती परंतु माधवराव जरी सत्त्येवर असले तरी नाना फडणीसांची चतुराई सर्व काही हाताळत होती. पेशव्यानकडे सर्व दक्षिण भारताचा जवळपास कारभार होता त्यामुळे राज्यांकडून वसुली कर ते गोळा करत आणि त्यात राज्यांमध्ये हैदराबादचा निजाम देखील होता. हैद्राबादच्या निजामकडे जवळपास २ कोटी रकमेची वसुली थकली होती.
निजामाच्या वकिलाने त्याला असा सल्ला दिला की या रकमेतून फौज उभी करावी आणि मराठ्यांना वसुली न देता त्यांच्याशी युद्ध करावे. निजामाला देखील ते पटले आणि त्याने थोड्याच दिवसात फौज उभी केली.निजामाने भर दरबारात मराठ्यांचा अपमान केला त्यामुळे मराठे देखील संतापले होते.निजाम पुण्याकडे कूच करू लागला. मराठ्यांना ही गोष्ट कळताच पेशवे आणि मराठे एकत्र आले आणि ३० नोव्हेंबर १७९४ ला मराठी फौजा शत्रूला तोंड द्यायला पुण्याच्या बाहेर पडल्या. रत्नापुर ला तळ टाकला गेला आणि मग कशा प्रकारे लढायचं याची तय्यारी सुरू झाली. मराठ्यांचा मुख्य लढाऊ तळ एक पाऊल पुढे घोडेगाव येथे पडला. मराठ्यांचा फौजेचे सेनापती होते परशुराम भाऊ पटवर्धन, त्यांच्या सोबतीला नाना फडणीस ची चतुराई, तोफखाना प्रमुख दौलतराव शिंदे , तुकोजी होळकर आणि दुसरे रघुजी भोसले हे शूर सरदार देखील होते.मराठ्यांनी निजामावर हल्ला केला परंतु तेव्हा काही तुकड्या पोहोचू न शकल्याने निजाम बचावला. परंतु आता मराठ्यांचा सामना मोकळ्या मैदानात करणे शक्य नव्हते आणि परांड्याच्या किल्ल्यापर्यंत तर तो पोहोचू शकत नव्हता म्हणून त्याने खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. परंतु अखेर ११ मार्च १७९५ ला लढाई सुरू झाली आणि मराठयांनी विजयाचे पारडे आपल्या बाजूने झुकते ठेवले मग निजाम आणि मराठे तहाची बोलणी सुरू झाली. २७ मार्च ला अखेर निजामाचा सेनापती मशिरुल्मुक मराठ्यांच्या स्वाधीन झाला आणि युद्ध मराठे जिंकले. सर्वात मोठा आणि अखेरचा मराठ्यांचा हा विजय मराठा साम्राज्याचे वर्चस्व वाढवणाराचा होता.
शिवपट्टणच्या
दैदिप्यमान विजय म्हणजे मराठ्यांच्या पाणिपत नंतरची नवसंजीवनी
होती.मराठ्यांना हे वर्चस्व जास्त काळ टिकवता आल नाही.१८१८ मध्ये मराठा
साम्राज्य लयास गेले, ते चांगले नेतृत्व न भेटल्यामुळे,नाही तर इंग्रजांना
भारतात शेवटपर्यंत प्रखर विरोध कोणी केला असेल तर तो मराठ्यांनी केला. या
मागे प्रेरणा होती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राष्ट्र
प्रथम"संकल्पनेची,शिवरायांची ही शिकवण" पुढे ही नंतर येणाऱ्या पिढ्यांनी
चालू ठेवली त्याला मुर्त रुप दिले.शेवटी निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व
पत्करले व शेवटपर्यंत महाराष्ट्रातील मराठवाडा निजामाच्या अत्याचारा खाली
भरडला गेला.
No comments:
Post a Comment