क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७)
लेखन :सोनल पाटील
– १६५ वर्ष्यापुर्वी स्रीशिक्षण, ज्ञानसत्ता
सामाजिक न्याय, जातिनिर्मूलन, समता,स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांच्या
प्रस्थापनेसाठी ज्यांनी समर्पितपणे काम केले आशा या सावित्रीबाई फुलेंचा
जन्म ३ जानेवारी १८३१ ला सातार्यातील नायगावात खंडेजी आणि लक्ष्मीबाई नेवसे
या दांपत्याच्या पोटी झाला होता.१८४० साली ज्योतीराव फुलेंशी त्यांचा
विवाह झाला होता.तेव्हा त्या अवघ्या नऊ वर्ष्याच्या होत्या. ज्योतीराव आणि
सावित्राबाई एक विलक्षण आगळेवेगळे दांपत्य होते.देशातील समग्र
स्री-शुद्रातिशुद्र वर्गाची शैक्षनिक, सांस्कृतिक अणि सामाजिक चळवळ
उभरण्याचे एतिहासिक काम या जोडप्याने केले.त्यांच्या कामाचे मोल सांगताना
‘दि ऑब्झव्ह्रर अॅड डेक्कन विकली’ या वर्तमानपत्राने दीडशे वर्ष्यापुर्वी
लिहिले होते की,हे काम म्हणजे, ’हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या
युगाचा आरंभ होय.’ ज्योतीरावांनी सावित्रीबाईंना शिकवले,पहिली भारतीय
शिक्षिका बनविले. सार्वजानिक जीवनात येण्यासाठी प्रोत्साहन
दिले.ज्योतिरावांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाईंनी अनेक महत्वपूर्ण चळवळी
केल्या असल्या तरी दरवेळेला त्यांच्यामध्ये ज्योतिराव नेता-सावित्रीबाई
अनुयायी असेच नाते होते असे नाही.स्वतः ज्योतीरावांनी केलेल्या नोंदीनुसार
बर्याच वेळेला सावित्रीबाई नेत्या होत्या आणि ज्योतीराव कार्यकर्ते म्हनुन
काम करीत होते. सावित्रीबाई देशातील पहिल्या शिक्षिका बनल्या होत्या तेव्हा
त्या अवघ्या १८ वर्ष्याच्या होत्या.शिक्षिका म्हणून विनावेतन काम करताना
त्यांना किती अपार छळ सोसावा लागला हे सर्वाना माहितच आहे.
त्यांनी
"फिमेल नेटीव्ह स्कूल" अणि "दि सोसायटी फॉर प्रमोटिंग दि एजुकेशन ऑफ़
महारस,मांग्ज अॅन्ड एस्ट्रोज" अश्या दोन शिक्षण संस्था सुरु केल्या
होत्या.त्या फक्त संस्थाचालक किंवा शिक्षिका-मुख्याध्यापिका नव्हत्या तर
त्या देशातील पहिल्या महिला शिक्षणतज्ञही होत्या.त्यांच्या शैक्षणिक
विचारांची दाखल अनेक वर्ष्यापर्यंत घेण्यात न आल्याने फक्त एक सामान्य
शिक्षिका एवढेच त्यांचे स्थान होते असे मानले गेले. ”Industrial Department
should be attached to the schools in witch children would learn useful
trands and crafts and be able on leaving school to maintain themselves
comfortably and independently.” हा त्यांचा विचार आजही किती महत्वाचा आहे
हे वेगळ सांगायला नको. शैक्षणिक गळती रोखण्यासाठी त्यांनी गरीब
मुला-मुलींना पगार देण्याची व्यवस्था केली होती. मुलांच्या आई-वडिलांना
शिक्षणाचे महत्व समजावे म्हणून त्यांनी स्वताच्या घरात स्री-पुरुषांसाठी
१८५४ साली प्रौढ साक्षरता अभियान सुरु केले होते. सावित्रीबाईंनी स्री
हक्काच्या-अधिकाराच्या प्रस्थापनेसाठी चालवलेल्या मोहिमा आजही प्रेरणादायी
आहेत.विधवा पुनर्विवाह,विधवांच्या बाळंतपनासाथी अणि त्यांच्या आपत्यांच्या
संगोपनासाथी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरु करणे,विधवांचे केशवपन
थांबवण्यासाठी नाभिक बांधवाना संघटीत करून त्यांचा संप घडविणे,दुष्काळात
अनाथ मुलामुलींच्या प्रतिपालनासाठी ‘व्हिक्टोरिया बालाश्रम’ चालवणे, लग्न
समारंभातील अवडंबर, हुंडा बडेजाव रोखण्यासाठी सत्यशोधक विवाह पद्धती सुरु
करणे यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता.पहिला सत्यशोधक विवाह २५ डिसेंबर
१८७३ रोजी सावित्रीबाईच्या नेतृत्वाखाली लागला.त्यातील मंगलाष्टकामध्ये,
’स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा,अर्पाया न भी मी सर्वस्व कदा.’
अशी वराने प्रतिज्ञा करण्याची ज्योतीराव, सावित्रीबाईंची क्रांतिकारक
विचारधारा आजही कालसुसंगत आहे.
दुष्काळ,जातीय दंगल,प्लेगची साथ अशा
संकटात सावित्रीबाई कायम कार्यरत राहिल्या.१८९७ च्या प्लेगच्या साथीमध्ये
शेकडो आजारी मुलामुलींचा औषधोपचार करताना त्यांनी स्वताचा जीव धोक्यात
घालून काम केले.त्यांचे दत्तक पुत्र डॉ.यशवंत यांना या कामात त्यांनी सोबत
घेतले होते. मुंढव्याच्या दलित समाजातील पांडुरंग बाबाजी गायकवाड याला
त्यांनी स्वताच्या पाठीवरून दवाखान्यात उचलून नेले.त्याला
वाचवले.पांडुरंगाला वाचावतांना या संसर्गजन्य आजाराने त्या घेरल्या गेल्या
अणि काम करता करता त्यांना देह ठेवावा लागला.
आयुष्यातील ५० वर्षे रात्रंदिवस समाजासाठी झुंजणारी ही ‘ज्ञानज्योति’ १० मार्च १८९७ रोजी पंचतत्वात विलीन झाली.
माहिती संकलन-
*सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य
*जीवनवेध.
१० मार्च १८९७
विनम्र अभिवादन
No comments:
Post a Comment