सरसेनापती संताजी घोरपडे...!!
लेखन ::इंद्रजित खोरे
शत्रूला आपलं बळ लक्षात येऊ नय म्हणून संताजींनी आपली फौज दोन दोन हजारांच्या ठोळ्यात विभागून ठेवली होती.मराठे यावेळी कर्नाटकच्या सरहद्दीवर धुमाकूळ घालत होते.खंडण्या वसूल केल्या जातहोत्या,नवीन इलाखे जोडले जात होते. मराठयांची ही खटपट बघून औरंगजेबाला दम निघेना.
बादशाहनं नेहमीप्रमाणं वाजत गाजत जाननिसारखान व
तहव्वूरखानाला संताजी घोरपडे यांच्यावर नामजद केलं.
संताजींच्या नावानच यांना घाम सुटला.पण करणार काय बादशाहाचा आदेश.पण व्हायचं तेच झालं.संताजींनी यांना असं काय गोत्यात आणलं की याचं नशीबच थोर म्हणून हे वाचले
नाही तर आज यांच्या कबरी आपल्याला तिथं दिसल्या असत्या.
पुढे खाफीखान लिहितो..
" या सुमारास सलाबतखानाची मुले जाननिसारखान आणि
तहव्वूरखान यांची नावे गाजत होती.त्यांनी युद्धात उत्कृष्ट कामगिरी केली होती..कर्नाटकाच्या सरहद्दीवर शत्रूचा पाडाव करण्यासाठी म्हणून जाननिसारखान व तहव्वूखान यांना तैनात करण्यात आले होते.त्यांचा आणि संताजीचा युद्धप्रसंग घडला.
निकराची मारामारी झाली.उभय पक्षांचे अनेक लोक जखमी अगर ठार झाले.बादशाही फौजेचा सपशेल पराभव झाला. संताजीने खानास रणास आणून मारिले.जाननिसारखान जखमी झाला.मोठ्या जीवानिशी निसटला.तहव्वूरखान हा सुद्धा जखमी झाला. मैदानावर अनेक मोगली हशम जखमी अगर ठार होऊन मातीत बरबटून पडले होते.तहव्वूरखानाने त्यांच्यातच स्वतःला नेऊन घातले.खुदाची खेर झाली.पुनर्जन्म झाला असे त्याला वाटले...!!"
# सेनापती
# संताजी घोरपडे
# मराठे
# युद्धाच्या ठाई तत्पर
# जय शिवराय
# जय रौद्र शंभू
No comments:
Post a Comment