विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 December 2023

थोरले स्वामी..!!

 


थोरले स्वामी..!!

छत्रपती थोरले स्वामी ज्या वेळी दक्षिण प्रांती उतरले होते.त्यावेळी ते वेल्लोर या ठिकाणी पोहोचले असता त्यांनी मद्रास स्तीत इंग्रजी अधिकाऱ्यास पत्र पाठवून काही वास्तूंची मागणी केली होती.मागणी तात्काळ मान्य करून त्यांनी त्या वस्तू तात्काळ महाराजांकडे धाडल्या.त्यासोबत त्यांनी भेटवस्तू नजराणे आणि महाराजांसाठी एक पत्र पाठवलं.त्या पत्रास महाराजांनी उत्तर पाठवलं
सर विल्यम लँगहॉर्न या अधिकार्यास हे पत्र पाठवलं गेलं

महाराज त्या पत्रात काय म्हणतात

" आपले पत्र अगदी योग्य वेळी पोहोचले.सन्माननीय महोदयांनी त्यासोबत मालदीवचे नारळ,बेझोर व मोहरा इत्यादी पुष्टीकारक औषधे वगैरे वेळेवर पोहोचली,ज्यायोगे मला खूपच आनंद वाटला.महादजी कडून आपले चातुर्य कळाले आणि सर्वच लोकांशी आपण सलोखा ठेवता हे जाणून आम्हाला समाधान वाटले तरी आणखी मालदीव नारळ,बेझोर व पुष्टीवर्धक रत्ने व विषावरील उतारे पाठविताना त्यांची किंमत कळविण्यास संकोच करू नये.सन्माननीय मोहदयांनी माझ्याप्रती भीडस्त राहू नये अशी मी विनंती करतो.या पत्रासोबत आपल्यासाठी जे मालदीव पाठवले आहेत,त्यांचा स्वीकार व्हावा.सध्यातरी आणखी त्रास द्यावा असे मला वाटत नाही..."

( २५ मे १६७७ )

इथं पत्र देण्याचं कारण म्हणजे किती प्रांजळपणे हे लिहल गेलंय.म्हणजे तसं बघायला गेलं तर जवळ जवळ त्यावेळी महाराजांपाशी लाख भराची फौज होती.एखादा सरदार जरी मद्रास वरती पाठवला असता तर मद्रासचा धुराळा करून इंग्रज अधिकारी छत्रपतींच्या पायाशी असते.पण हे न करता महाराजांनी अगदी रीतसर मागणी करून त्या वस्तू मागवल्या.
पत्रास परत फेर पत्र ही पाठवलं.एखादा विज्यापुरी किंवा मोगली असता तर त्या वस्तू तशाच मठकवल्या असत्या. म्हणजे जे धोरण आपल्या फौजेसाठी( रयतेच्या काडीला ही तोशीस न द्यावी) या प्रमाणे त्यांनी स्वतःही अमलात आणलेलं दिसतंय.छत्रपती लिहिता की मला त्या वस्तूंची किंमत कळवावी
ज्या अर्थी महाराजांनी किंमत विचारली त्याअर्थी ती अदा होणारच होती यात काही शंकाच नाही.परत महाराज लिहितात की तुम्हाला आणखी त्रास देण्याची इच्छा नाही.तसं बघितलं तर इंग्रज तशे मराठ्यांना पुरत ही नव्हते आणि उरत ही नव्हते तरी ही महाराजांनी सौजन्य पुर्वक शब्दात त्यांना त्रास न देण्याची इच्छा वेक्त केली.प्रशासन चालवताना महाराज जरून करारी असतील पण या पत्रातून त्यांचा सौम्य पणा ही जाणवतोय हे नक्की.

देहे त्यागीता कीर्ती मागे उरावी ।।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।।
मना चांदना परी त्वां झिजावे ।।
परी अंतरी सज्जना नीववावे ।।

।। जय शिवराय ।।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...