छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्राला अपरीचित पुत्र !
(राजश्री मदनसिंह व माधोसिंह)
मदनसिंह व माधोसिंह यांच्या वंशज शाखा कुठे आहे जर शाखा असतील तर आज त्या वास्तव्यास कुठे असतील आणि ह्या मराठा राज्यात/महाराष्ट्रात विन्मुख का आहेत हा विषय आभ्यासाचा आहे .
छत्रपती संभाजी महाराज यांना 3 राण्या असल्याचे संदर्भ उत्तररेतील व दक्षिणेतील साधनांत व दफ्तरात उपलब्ध आहे .
1) येसुबाई राजेशिर्के घराणे शृंगारपुर राजेशिर्के
2) दुर्गाबाईसाहेब जवळखेडकर जाधवराव घराणे
3) चंपाबाई साहेब जादौन गुजरात
राणी येसुबाईसाहेब यांजपासुन युवराज शाहुराजेभोसले झाले.
तर ...! मग मदनसिंग व माधोसिंह भोसले कोणात्या राणिपासुन झाले असावे ?
राजस्थानी साधनात मनसब संदर्भात संभाजीराजेंचे दोन पुत्राचा उल्लेख असुन ते दासीपुत्र आहे असा उल्लेख नाही . त्याचा फारसी अनुवाद देखील पत्रात आहे .
मदनसिंह यांना बीड गेवराई भागातील मोकासा असल्याचा संदर्भ सापडतो तसेच औरंगजेबाने त्यांना "आलमगीर गाजी। खानेजादेबादशाहमदनसिंह" असा शिक्का दिल्याची नोंद सापडते .
मदनसिंह यांचा भाऊ माधोसिंह हा सोलापुरात वारला असुन त्यांची समाधी तेथे आहे .
मदनसिंह यांना दोन पुत्र असल्याची नोंद सापडते , रूपसिंह व सांबसिंह अशा नावाने . राजश्री रूपसिंह यांनी वाई भागात सिरवळकर देशपांडेना दिलेले इनामी पत्र शाहु दफ्तरात उपलब्ध आहे. तर दुसरे पुत्र सांबसिंह हे शुर असल्याची व पागा बाळगुन असल्याची नोंद पेशवे दफ्तरात सापडते . छत्रपती शाहुंनी मदनसिंह यांचे पुत्रास पुतने असा उल्लेख केलेला आहे व मदनसिंह यांस भाऊ यावरून नेमका इतिहास काय हा संशोधनाचा विषय आहे .
सदरील मदनसिंह व माधोसिंह हे दासीपुत्र असल्याची नोंद समकालीन साधनात आढळलेलि नाहि ती दासीपुत्र नोंदी ह्या अतिउत्तर कालिन आभ्यासकांनी दिल्या असुन त्याला कसलाही आधार नाही व सबळ पुरावा नाहि ; म्हणुन सर्व इतिहास प्रेमी व आभ्यासक यांचे ह्याविषयी संशोधनाचि मार्गी लावण्याची भुमिका घेणे हे नैतिक कर्तव्य आहे .तसेच 96 कुळीचे मराठ्यांनी देखील ह्या विषयी लक्ष घालणे गरजेचे आहे .
टिप: सदरील लेख ससंदर्भ आहे यात मी कसल्याही प्रकारचा हेवा दावा केलेला नसुन आभ्यास करतांना सापडलेले संदर्भ असुन त्याचे महत्व ऐतिहासिक दृष्टिकोणातुन फार असल्यामुळे हा लेख महाराष्ट्रापुढे सादर केला आहे .मी संदर्भ पुढे केले आहे यात माझे कसलेही हेवे दावे नसुन संदर्भ बघुन पडलेले प्रश्न आहे जे मी ऐतिहासिक ग्रुपवर आभ्यासाच्या दृष्टिने जाणकारांनसमोर सादर केलेत.
No comments:
Post a Comment