विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 9 December 2023

मध्ययुगीन काळात महाराष्ट्रावर किती शाह्यांनी राज्य केलं?

 

अल्लाउद्दीन खिलजी नंतर आलेल्या कुतूबुद्दीन मुबारीकखान खिलजी ने राजा रामदेवरायाचा जावई आणि यादव वंशातील शेवटचा राजा हरपालदेवाला ठार मारले आणि महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला.

उसकी खाल खिंचकर देवगीरके दरवाजेपर लटका दिया जाय!” असा हुकूम सोडून त्याने फक्त हरपालदेवाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचीच साडली सोलली. आणि यानंतर हा शूरांचा, संतांचा, विद्वानांचा, पुण्यवंतांचा, नीतिवंतांचा, कष्टाळू शेतकऱ्यांचा, प्रामाणिक राजकर्त्यांचा, धर्मशीलवंतांचा आणि सज्जनांचा देश पठाणांच्या गुलामगिरीत पडला.

नंतर जवळजवळ साडे तीनशे वर्ष महाराष्ट्र मुसलमानांच्या हाती होता. या कालखंडात अनेक शाह्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं.

  • खिलजी सुलतान :-

(१) अल्लाउद्दीन खलजी (इ. १३१३ ते १९ डिसेबर १३१६),

(२) मुबारिकखान खलजी (इ. १३१६ ते १३२०).

  • तुघलक सुलतान :-

(३) ग्यासुद्दीन तुघ्लख (इ. १३२० ते १३२६),

(४) महंमद तुघ्लख (इ. १३२६ ते १३४७).

  • बहमनी सुलतान :-

(५) हसन गंगू बहमनी उर्फ जाफरखान ऊर्फ अल्लाउद्दीन शाह (दि. १२ ऑगस्ट १३४७ ते १० ऑगस्ट १३५८),

(६) महंमदशाह बहमनी (दि. १० ऑगस्ट १३५८ ते दि. २१ मार्च १३७५),

(७) मुजाईदशाह बहमनी (दि. २१ मार्च १३७५ ते दि. १४ एप्रिल १३७८),

(८) दाऊदशाह बहमनी (दि. १४ एप्रिल १३७८ ते मे १३७८),

(९) महमूदशाह बहमनी (मे १३७८ ते दि. २० एप्रिल १३९७),

(१०) ग्यासुद्दीनशाह बहमनी (दि. २० एप्रिल १३९७ ते दि. ९ जून १३९७),

(११) शमसुद्दीन बहमनी (दि. ९ जून १३९७ ते १५ नोव्हेंबर १३९७),

(१२) फेरोजशाह बहमनी (दि. १५ नोव्हेंबर १३९७ ते सप्टेंबर १४२२),

(१३) अहंमदशाह बहमनी (सप्टेबर १४२२ ते १९ फेब्रुवारी १४२५)

(१४) अल्लाउद्दीन बहमनी (दि. १९ फेब्रुवारी १४२५ ते इ.स. १४५७),

(१५) हुमायून जालीम बहमनी (इ. १४५७ ते ३ सप्टेंबर १४६१),

(१६) निजामशाह बहमनी (दि. ३ सप्टेंबर १४६१ ते दि. २९ जुलै १४६३),

(१७) महंमदशाह बहमनी (दि. २९ जुलै १४६३ ते दि. २१ मार्च १४८२),

(१८) महंमूदशाह बहमनी (दि. २१ मार्च १४८२ ते २१ ऑक्टोबर १५१८),

(१९) अहमदशाह बहमनी (दि. २१ ऑक्टोबर १५१८ ते १५२०),

(२०) अल्लाउद्दीनशाह बहमनी (इ. १५२० ते १५२१),

(२१) वलीउल्लाशाह बहमनी (इ. १५२१ ते १५२४),

(२२) कलीउल्लाशाह बहमनी (इ. १५२४ ते १५२६)

  • बीदरचे बेरीदशाही सुलतान :-

(२३) सुलतान कासीम बेरीदशाह (इ. १४९२ ते १५०४),

(२४) अमीर बेरीदशाह (इ. १५०४ ते १५४९),

(२५) अली बेरीदशाह (इ. १५४९ ते १५६२),

(२६) इब्राहीम बेरीदशाह (इ. १५६२ ते १५६९),

(२७) कासीम बेरीदशाह (इ. १५६९ ते १५७२),

(२८) मिर्झा अली बेरीदशाह (इ. १५७२ ते १५९२).

  • वऱ्हाडचे इमादशाही सुलतान :-

(२९) सुलतान फत्तेउल्ला इमादशाह (इ. १४८४ ते काही महिने),

(३०) अल्लाउद्दीन इमादशाह (इ. १४८४ ते १५२७),

(३१) दर्या इमादशाह (इ. १५२७ ते १५६२),

(३२) बुऱ्हाण इमादशाह (इ. १५६२ ते १५७२).

  • अहमदनगरचे निजामशाही सुलतान :-

(३३) सुलतान अहमद निजामशाह (इ. १४८९ ते १५०८),

(३४) बुऱ्हाण निजामशाह (इ. १५०८ ते १५५३),

(३५) हुसेन निजामशाह (इ. १५५३ ते १५६५),

(३६) मुर्तुजा निजामशाह (१५६५ ते १५८६),

(३७) मीरन हुसेन निजामशाह (इ. १५८६ ते १५८८),

(३८) इस्माईल निजामशाह (इ. १५८८ ते १५९१),

(३९) बुऱ्हाण निजामशाह (इ. १५९१ ते १५९५),

(४०) इब्राहीम निजामशाह (इ. १५९५ ते १५९६),

(४१) अहंमद निजामशाह (इ. १५९६ ते १६०३),

(४२) बहादूर निजामशाह (इ. १५९६ एकच वर्ष),

(४३) मुर्तजा निजामशाह (इ. १६०३ ते १६३०),

(४४) हुसेन निजामशाह (इ. १६३० ते १६३३)

  • विजापूरचे आदिलशाही सुलतान :-

(४५) सुलतान युसूफ आदिलशाह (इ. १४८९ ते १५१०),

(४६) इस्माईल आदिलशाह (इ. १५१० ते १५३४),

(४७) इब्राहीम आदिलशाह (इ. १५३४ ते १५५७),

(४८) अली आदिलशाह (इ. १५५७ ते १५८०),

(४९) इब्राहीम आदिलशाह (इ. १५८० ते १६२६),

(५०) महंमद आदिलशाह (इ. १६२६ ते १६५५).

खानदेशचे फरुकी सुलतान :-

(५१) सुलतान मलिक राजा फरुकी (इ. १३७० ते १३९९),

(५२) मलिक नासीर फरुकी (इ. १३९९ ते १४३७),

(५३) मीरन आदिलखान फरुकी (इ. १४३७ ते १४४१),

(५४) मीरन मुबारिकखान फरुकी (इ. १४४१ ते १४५७),

(५५) आदिलखान फरुकी (इ. १४५७ ते १५०३),

(५६) दाऊदखान फरुकी (इ. १५०३ ते १५१०),

(५७) आदिलखान फरुकी (इ. १५१० ते १५२०),

(५८) मीरन महंमद (इ. १५२० ते १५९९).

  • मोगल सुलतान :-

(५९) सम्राट अकबर, अहमदनगरपर्यंत सत्ता (इ. १५९९ ते १६०५),

(६०) जहांगीर (इ. १६०५ ते १६२७),

(६१) शाहजहान (इ. १६२७ ते १६५७),

(६२) औरंगझेब (इ. १६५८ ते पुढे).

या सर्वांमधले फक्त इमादशाही आणि निजामशाही चे संस्थापक काय ते महाराष्ट्रातले. ब्राह्मण. बाटले. बाकी कोणत्याही शाह्यांचा महाराष्ट्राशीच काय भारताशीही काही संबंध नव्हता. कोणी तुर्कस्थानातून तर कोणी जॉर्जियातून तर कोणी इराणातून आलेले! पण या सगळ्यांसाठी कोणी रक्त सांडले? मराठ्यांनी!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...