शहाजी राजेंच्या लग्नानंतर लखोजी जाधवरावांनी मुलगी जिजाबाईसाहेब यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सैन्यातील उत्कृष्ट तलवारबाज आणि युद्धनितीतील पारंगत वीर सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांची नेमणूक केली होती.
सरदार गोमाजी नाईक यांनी जिजाबाई साहेब आणि बाल शिवाजीराजे हे शिवनेरी येथे असतानाच शिवाजी राजांच्या प्रशिक्षणाची सुरुवात केली होती. अगदी याच काळात सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी लढवय्या पठाणी तुकडीला आपल्या सैन्यात सामावून घेतले होते.
जिजाबाई साहेब आणि शिवाजी महाराज हे १६३६ ते १६३९ या कालावधीत शहाजी महाराजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते.येथे देखील शिवाजी महाराजांचे पुढील शिक्षण सुरुच होते.शिवाजी राजेंना बालपणी सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेशिवाय सरदार बाजी पासलकर यांचेदेखील तलवारबाजी आणि युध्दकलेतील निपूणतेचे मार्गदर्शन मिळाले होते. सरदार गोमाजी नाईक हे १७ व्या शतकातील शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक पराक्रमी सरदार आणि मिलिटरी अँडव्हायझर होते.
लखोजी जाधवराव यांनी ज्या हेतूने त्यांची नेमणूक केली होती,अगदी तो हेतूच सार्थ करण्याचे काम जणू सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांनी केले होते.
शिवाजीराजेंच्या बालपणीच्या काळात सरदार गोमाजी नाईक पानसंबळ शिवाजी राजेंचे प्रशिक्षक बनून अशी दुहेरी भूमिकेतून काम करत त्यांनी शिवाजी राजेंना तलवारबाजी, घोडेस्वारी,युध्दनिती आणि शस्त्रांचा उपयोग कसा करावा, वगैरे गोष्टी शिकवल्या. या स्वराज्याच्या अंकुरातून शिवाजी महाराजांनी त्याचा पुढे वटवृक्ष बनवला.
संदर्भ : जेधे शकावली आणि ग्रँट डफ हिस्ट्री आँफ द मराठा
...जयरुद्रशिवशंभौ...
copy pest
No comments:
Post a Comment