विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 January 2024

शूर ताकदवर मराठा रावरंभा निंबाळकर भाग ४

 












शूर ताकदवर मराठा
रावरंभा निंबाळकर
भाग ४
श्रीकमलादेवी मंदिर -
श्रीकमलादेवीची प्रतिष्ठा केलेले पूर्वाभिमुखी हेमाडपंति मंदिर रावरंभाजींनी निर्माण केले असले तरी दुपेडी तटबंदीतील ओव-या आणि त्यावरील चार गोपुरे व चार कमानी दरवाजे हे जानोजी निंबाळकर यांनी बांधलेले आहेत. मंदिर जरी पूर्वाभिमुखी असले तरी पश्चिमेकडील दोन दरवाजे गोपुरांनी युक्त आहेत त्यातूनच प्रामुख्याने प्रवेश करतात. तटबंदीतील भक्तांच्या निवासासाठी बांधलेल्या एकूण ओव-यांची संख्या ९६ इतकी आहे. मुख्य मंदिर तीन विभागात असून सभामंडपात प्रवेश करताना कीर्तीमुख असून मध्यभागी पितळी कासव आहे. येथील मोठ्या घाटेखालून पुढे गेल्यास आंतराल आहे. येथे उजव्या बाजूस देवीचा जमादारखाना तर डाव्या बाजूस श्रीकमलादेवीचा पलंग व उत्सवकाळात वापरण्याच्या मूर्ती ठेवण्याचे दालन आहे. गाभाऱ्यात श्रीकमलादेवीची आठ हात असलेली पाच फूट उंचीची गंडकी शिळेमधे कोरलेली अप्रतिम मूर्ती विराजमान आहे. ही सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचे मर्दन करीत आहे. श्रीदेवीच्या उजव्या चार हातात बाण, तरवार, ढाल व गदा तर डाव्या बाजूच्या हातात शंख, भृशुंडी, बाण व राक्षसाची शेंडी आहे. मुख्य गाभाऱ्यावर उंच दाक्षिणात्य पद्धतीचे सहा स्तरावरील ९६ देव - देवतांची मूर्तीचित्रे कोरलेली आहेत.सर्वोच्च ठिकाणी इस्लामी पद्धतीचा सोनेरी कळसात मध्यभागी घुमट असून चारहि बाजूला लहान मिनार आहेत.कळसाखाली सहस्त्रदल कमल व इतर इस्लामी पद्धतीचे काम केलेले आहे.मुख्य मंदिर ९६ खांबावर असून प्रदक्षिणा मार्गावर शिवमंदिराच्या दरवाजावर कार्तिकेय, गणपति मंदिर, सूर्यनारायण मंदिर, श्रीविष्णू मंदिर आहेत. मंदिर आवारात ईशान्य कोपऱ्यात अन्नपूर्णामाता मंदिर तर उत्तरेस लक्ष्मीनारायण व व्यंकटेशाचे मंदिर आहे. मुख्य मंदिसासमोर ९६ पायऱ्या असणाऱ्या इस्लामी पद्धतीच्या तीन दीपमाळा असून तिच्यावरून संपूर्ण करमाळा शहर व सीना, कानवळा नदीचा संगम दिसून येतो. पूर्वेकडील दरवाजावर नगारखाना आहे. याच दरवाजासमोर बागेत इस्लामी शैलीतील निंबाळकर घराण्यातील व्यक्तिंच्या शुष्कसांध्यातील समाध्या आहेत. बाहेरील परिसरात स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना असलेली ९६ पायऱ्यांची शिवलिंग आकाराची अष्टकोनी विहीर आहे. या विहिरीसाठी झालेला खर्च हा मंदिराच्या निर्मिती मुल्यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते आणि प्रत्यक्ष पाहताना त्याची प्रचिति देखील येते. कार्तिक वद्य चतुर्थीस श्रीदेवीच्या यात्रेचा दिवस असतो.
करमाळा किल्ला
करमाळ्याच्या पश्चिमेस जानोजी निंबाळकरांनी अठरा बुरूजांचा भुईकोट किल्ला बांधला. किल्ल्याभोवाती खंदक होता. खंदक ओलांडून गेल्यावर वेस तर तिच्या पुढे दोन बुरूंजयुक्त महादरवाजा व त्याच्यासमोर काळ्या मारूतीचे व शनीचे मंदिर आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस ब्रम्ह, विष्णू व महेश यांची मंदिरे आहेत. यातील चारमुखी शिवपिंडी शिवमंदिरास खोलेश्वर म्हणून संबोधतात.
रावरंभा निंबाळकर वंशवेल
रावरंभा -------------------------------------------------------------------
| | | |
खंडेराव जानोजीराव सुलतानराव महादजीराव
|
|
-------------------------------------------------------------------
| | | | |आनंदराव महाराव धारराव जसवंतराव जगदेवराव
| | |
रावरंभा (शेंद्री (रोपाळे
| ता.बार्शी) ता.माढा)
|
-------------------------------------------------
| |
खंडेराव आनंदराव
संदर्भ -
१) बखर रावरंभाची
ले. - अनिरुद्ध बिडवे
मनोरमा प्रकाशन
२)मराठी रियासत - गो.स.सरदेसाई
©® सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...