राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा २०२४
शक १५५४
१ सातारा जिल्ह्यांतील कृ ष्णाकांठच्या गोवे गावीं रहाणा-या रा. रा. बळवंत सदाशिव चितळे यांनी तेथून एका मैल वर असलेल्या एका जाधवांचा वाडा विकत घेतला. या वाड्यांत एका कोनाड्यांत प्रस्तुत मराठीतकोरलेला ताम्रपट सांपडला तो
भाषा अर्वाचीन मराठी. मूळ निवाडपत्राचा काळ शक १५५४ दिलाआहे. म्हणजे हैं निवाडपत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात १६३२मध्य मूळ निवाडपत्र कागदावर झाले असून, नंतर स्वामित्वाचा पुरावा अक्षय जवळ रहावा म्हणून तें पत्रतांब्याच्या पत्र्यावर कोरून घेतलेलें दिसतें, शक१५५४ताम्रपट तत्कालीन गोव्याच्या जाधव पाटिल घराण्यातील आहे.. या घराण्यातील एक दोन पत्रात गोवे येथील जाधव घराण्याचे उल्लेख जाधवराव म्हणून आढळते. सातारा जिल्ह्यातील जाधव घराण्यातील सर्वात पुरातन घराणे म्हणून गोवे येथील जाधव घराण्याचे उल्लेख सापडतात. सदर गावातील जाधव मंडळींचा वंश विस्तार खूप मोठा असून बिदरच्या बहमानी बादशहाच्या अगोदर पासून हे घराण येथे नांदत असल्याचे काही समजते भविष्यात लवकरच पुढे येतील तसेच आज घडीला नागोजी पाटलाच्या वंश विस्तार होऊन गावात पसरले आहेत सातारा जिल्ह्यात असलेल्या जाधव मंडळींची जी गाव आहेत त्या बहुतेक मंडळींचा मुळगाव येथील जाधव पाटील घराण्यातले आहेत पुरातन वतनदार घराणं तसेच सदानंद गिरी गोसावी मठामुळे येथील बहामनी, निजामशाही, आदिलशाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या सेवेशी हे कायम निंब गोवेकर जाधव मंडळी सेवा करताना दिसतात या जाधव पाटील घराण्यातील पराक्रमी पुरुषांचं कर्तुत्व त्यांच्या समशेरतून मराठेशाही जरीपटका हिंदुस्थानात फडकला येत लढाईत या जाधव पाटील घराण्यातील अनेक पुरूष धारातीर्थी पडले आहेत. मराठ्यांच्या इतिहासात आढळते .. त्यामुळे इनाम , वतन मोकाशी, यामुळे या गावातील जाधव पाटील मंडळांचा वंश विस्तार सातारा सह महाराष्ट्रात बऱ्याच भागात झाला आहे यापैकी या घराण्यातील काही नाव अशी महादजी जाधव पाटील वाघाजी जाधव पाटील सुभानजी जाधव पाटील जगदेवराव जाधव पाटील
गणोजी जाधव पाटील भिकोजी जाधव पाटील दादोजी जाधव पाटील जानूजी जाधव पाटील गंगा जी जाधव पाटील, सोनीजी जाधव पाटील आधी नाव सापडतात तर यातील सुलतानजी , शेटयाजी आणि सुभानजी हे छत्रपतीच्या हुजरीकडील शिलेदारांपैकी असावेत कारण यातली काही नावाची उल्लेख असलेले पत्र आढळतात खालील दिलेल्या दिलेल्या पत्रातून महिमाजी पाटील ,तानाजी पाटील ,विठोजी पाटील ,परसो जी पाटील, कृष्णाजी पाटील, कान्होजी पाटील, विसजी पाटील यांचा उल्लेख आढळतो
_____यातील एक पत्रात महाराणी ताराबाईंनी या जाधव पाटील यास लिहिले आहे
_________ तळटीप-:-येथे वंशावळ दिलेली नाही वाचनातून आलेले नाव या लेखात दिले आहे
________________
श्री सदानंदाचे तालिक२५६
राजश्री आनंदगिरी गोसावी मठ सदानंद गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक महिमाजी पाटील व तान्हाजी पाटील व विठोजी पाटील व परसोजी पाटील व कृष्णाजी कानोजी व विठोजी पा। व बाजे बाप भाऊ समस्त मोकदम मौजे गोवे सा। निंब पा। वाई दंडवत विनंती उपरी आपले आत्मसंतोषे दसनामाचे भंडारीयाबदल जमीन 68१॥ दीड नजीक बागाचे खाली तुकडा दिधला असे लेकराचे लेकरी चालऊन जो हिकहरकत करील त्यास श्री व आपले वडिलाचे इमान असे हे लिहिले सही व आमचे पाटाचे पाणीयासी निसबत नाही तुह्मी आपले धरणी पाणी धरणे कळले पाहिजे हे विनंती.
निशान नांगर
_______________
१३६ १५९७ माघ वद्य ६
अज दिवाण सुभा पा। वाई ता। मोकदमानी मौजे गोवे तान्हाजी (पा)टील सा। निंब सु॥ सीन सबैन अलफ मौजे मजकूरपैकी गोसावी यास एक बिघ दिधला आहे आणि तू कथळा करितोस तरी आता त्याचा बिघा त्यास देणे गावपैकीं दिधला आहे ऐसे असता कथला करितोस तरी आजीपासून गोसावी याचे वाटें नव जाणे छ १९ जिलकादजिल
______________
लेखां क २३८ राजश्री आनंदगीर गोसावी मठ सदानंद गोसावी यासि अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य सेवक महिमाजी पा। व तानाजी पा। व विठोजी पा। व परसोजी पा। व कृस्णाजी कोनोजी व विसजी पा। व बाजे बापभाऊ समस्त मोकदम मौजे गोवे सा। नीब पा। वाई दंडवत विनंति उपरी आपले आत्मसंतोसे दसनामाचे भंडारियाबदल जमीन 68१॥ दीड नजीक नदी बागाचे खाली टुकडा दीधला असे लेकराचे लेकरी चालऊन जो हिक हरकत करील त्यास श्री व आपले वडिलाचे इनाम असे हे लिहिले सही व आमचे पाटाचे पाणीयासी निसबत नाही तुह्मी आपले धरणी पाणी धरणे कलले पाहिजे हे विनंती
(निशाणी नांगर)
_________________ श्री २२६ १६७३ आश्विन वद्य ११ सदानंद गोसावी
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणी मोकदमानी मौजे गोवे प्रा। वाई सुहूरसन इसन्ने खमसैन मया व अलफ कृष्णगीर गोसावी मठ मौजे निंब याचे इनाम मौजे मजकुरी आहे त्यात बोरी व बाभळ वगैरे झाडे आहेत त्यापैकी झाडे वठली आहेत तो विकत आहे त्यास तुह्मी अडथळा न करणे वगैरे झाडास काडीमात्र अडथळा न करणे जाणिजे छ २४ जिलकाद लेखनावधी
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे९०४९७६०८८८
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य)
No comments:
Post a Comment