विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 January 2024

आपल्या साताऱ्यातील ते सोळा शूरवीर मावळे शिंदे सरकार

 


आपल्या साताऱ्यातील ते सोळा शूरवीर मावळे
शिंदे सरकार 
लेखन :महेश पवार
14 जानेवारी पानिपत
पानीपत युध्दात ज्या सोळा शिंदे पुत्रांनी हौतात्म्य पत्करले त्यांचे सोळाखांबी स्मारक मौजे कण्हेरखेड ता कोरेगाव जि.सातारा
जय्यापाराव शिंदे
दत्ताजी शिंदे
तुकोजी शिंदे
ज्योतिबा शिंदे
जनकोजी शिंदे
साबाजी शिंदे
बयाजी शिंदे
धारराव शिंदे
येसाजी शिंदे
जीवाजी शिंदे
संभाजी शिंदे
हणमंतराव शिंदे
फिरंगोजी शिंदे
मानाजी शिंदे
रवलोजी शिंदे
आणि
आनंदराव शिंदे
१४ जानेवारी दिवशी #पानिपतावर देशरक्षणार्थ धारातीर्थी पडले.
एकमेव #महादजी शिंदे तेवढे वाचले.जख्मी अवस्थेतील महादजी उजैनला परतले ते सुड उगवायचे ध्येय डोळ्यासमोर ठेवुनच!
आणि महादजींनी पुन्हा शिंद्यांची नव्या दमाची पलटण उभा करुन दिल्लीची सत्ता काबिज केली.
नजीबाची कबर फोडुन त्याची हाडे इतस्ततः फेकून दिली. दत्ताजी शिंदेंसहीत 16 मृतात्म्यांचा आत्मा मुक्त झाला! अमर झाला!
आजही कण्हेरखेडमध्ये गेलात तर या सोळा योध्यांची सोळा खांबी स्मृतीस्थळ आपणास पहावयास मिळेल.
हेच 16 स्तंभी पवित्र स्मृतीस्थळ.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...