विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 January 2024

सरदार ज्योत्याजिराव पाटणकर

 


सरदार ज्योत्याजिराव पाटणकर 
 लेखन :

सिंहावलोकन पाटणकर

इ.स.१५७२ चे सुमारास पुन्हा पोर्तुगीज लोकांनी बाणकोट प्सून गोवेपरयंत लुटा लूट केली तेव्हा विजापूर छा बादशाह व अहमदनगर बादशहा या दोघांनी चौल व गोवे ह्या दोन शहरी पोर्तुगीज लोकांवर स्वारी केली ,विजापूर बादशहाने गोव्यास वेढा दिला त्यावेळेस दंतगिरी चे देशमुख नागोजीराव साळुंखे व त्यांगे पुत्र ज्योत्याजिराव त्या समयी सोबत होते. ज्योत्याजिरावं त्यावेळी शुर व धाडसी होते त्यांना त्यावेळी पाचशे स्वरांचे अधिपत्य होते.गोवे शहरास वेढा घातला नंतर बरेच दिवस लढाई चालली ज्योत्याजिरव ज्या फळीच्या बाजूस होते त्या बाजूला पोर्तुगीज यांनी मोठा हल्ला केला त्यास यांनी निकराने लढा दिला व पराक्रम केला .पोर्तुगीज मागे हटले व त्यांचा फार नाश झाला .हे पराक्रम ऐकून बाद शहा खुश झाला पुढे बाधशहा ने तो वेढा उठवला तो विजापुरी निघून गेला .पुढे वारणेचा पलीकडील भागात काही डोंगरी मुलखात रामोशी वगेरे लोक सरकार सारा न देत आणि दरोडे वगेरे घालून फार त्रास देत असत ही बातमी बादशाह क्या कानी पडली जोत्याजीराव साळुंखे यांनी विनंती केली की " मी तिकडे जाऊन बंदोबस्त करितो" हे ऐकून बादशाह खुश होऊन पाटण त्याने पाटण महालाची ६० गाव ची देशमुखी वतनाची सनद दिली. या नवीन वतनाच्या त्यांना व पुढील वंशज यांस पाटणकर हे उपनावाने ओळखू लागले .
ज्योत्याजिराव पाटण चां बंदोबस्त फार चांगल्या प्रकारे राखीला रामोशी लोकांना आश्वासन देऊन त्यांनी नोकरी आणि शेतिभाती करावी म्हणून सहाय्य केले . त्यावेलस विजापूर सरदार जवली येठीक चंद्रराव मोरे यांना निरा आणि वारणा ह्या दोन नद्यांमधील मुलुख हस्तगत करण्यासाठी १२००० सैन्य देऊन पाठवले .तो प्रदेश कोणत्या राज्याचा ताब्यात नसून शिर्के,गुजर, महामुलकर या सरदार यानेचे स्वामित्व होते .मोरे यांनी लढाई करून पराभव केला.पुढे बदशहाने मोरे यांस चंद्रराव किताब देऊन जावली क्या सभोवताली भाग जहागिरी देऊन "राजा" किताब दिला. पाटण महालाची देशमुखी ज्योत्याजिरव यांना मिळाली हे त्यांना रुचले नाही त्यांनी जोत्याजिराव यांचवर हलला करण्याचा घाट घातला ही गोष्ट ज्योट्याजिराव यांना कळताच त्यांनी मोठ्या शहाणपणाने विजापुर दरबार यातून आज्ञापत्र परभारे पाठवण्याची तजवीज केली त्यांना मनातील मत्सर काढून टाकीला .नंतर सुमारे एक हजार लोक सोबत घेऊन ते जावली मोरे यांना भेटण्यास गेले व त्यांचा स्नेह संपादन करून विजापूरल गेले.१५९० सली दिल्ली बादशहा अकबर याने दख्खन सर्व मुसलमान राज्ये बुडवण्यास सरदार पाठवले तेव्हा आप्ल्या राज्याचा बंदोबस्त करण्याकरता सरहद्दीवर ठिकठिानी सैन्य पाठवून बंदोबस्त केला . ज्योत्याजिरव यांचे दोन हजार स्वार घेऊन सरहद्दीवर निघाले त्यांची नेमणूक " इदर" परगण्यावर झाली होती .थोड्याच दिवसात मोगल सैन्य आणि पाटणकर सैन्य यांच्यात लढाई झाली यात मोगल मागे हटले ज्योत्याजिराव पराक्रम करून आपले संरक्षण केले.पुढे कही दिवसांनी ज्योत्याजिराव कैलासवासी झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...