विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 January 2024

श्रीमन्त सरदार पाटणकर यांना रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी बारा गावांच्या इनामाची सनद

 


श्रीमन्त सरदार पाटणकर यांना रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी बारा गावांच्या इनामाची सनद 
 लेखन :

सिंहावलोकन पाटणकर

राजश्री नागोजीराव पाटणकर व श्री चांदजीराव पाटणकर यांना प्रल्हाद निराजी प्रतिनिधी यांना जिंजीहून पाठविलेले पाटणकरांच्या बारा गाव इनामाविषयीचे पत्र, रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी पाटणकरांना बारा गावांच्या इनामाची सनद दिली होती. ती आपलीच सनद आहे असे समजावे असे प्रतिनिधींनी लिहिले आहे. छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकात गेल्यावर पाटणकरांनी मोठा पराक्रम करुन मोगलांचे अनेक सरदार बुडविले, असा राजश्री पाटणकरांच्या कामगिरीचा गौरव करिताना प्रतिनिधींनी पुढे म्हटले आहे " तुम्ही नामांकीत घराणेदार तुम्हापासून स्वामी कार्ये नव्हे तेव्हा कोणापासून होवे! तुम्ही मर्दाने स्वामी कार्याचे आहा." राजश्री स्वामीप्रति तुमचा मजुरा आहे ये विषयी आपुले समाधान असो देणे व लिहिले की रा। रामचंद्रपंती आपणास बारा गाव इनाम करुन दिल्ही आहेत.
●संदर्भ :- सरदार पाटणकर घराण्यावरील पुस्तके
●पत्र संदर्भ :- शिवकालीन कागदपत्र पृ.१८१
संपादक - व्ही.जी.खोबरेकर
मुंबई पुराभिलेख विभाग
(मुंबई)
( मुळ पत्र मोडीलिपी मधे आहे, पत्राचा कागद हा खराब झालेला आहे म्हणुन पत्राचा फोटो काॅपी उपलब्ध होऊ शकली नाही. )
✒️लेखन :- सिध्देश दादासो पवार
📱मो.नंबर :- ८८०५४१०४८९
🔴इंस्टाग्राम आयडी⤵️
@gad_durgancha_dharkari_007
@shivohon

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...