विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 February 2024

गोव्यातील सर्वात मोठ्या मंदिराची निर्मिती करणारे थोरले शाहूमहाराज छत्रपती : २८५ वर्षांची पूर्तता...

 


गोव्यातील सर्वात मोठ्या मंदिराची निर्मिती करणारे थोरले शाहूमहाराज छत्रपती : २८५ वर्षांची पूर्तता...
१२ आणि १३ फेब्रुवारी देवीचा जत्रोत्सव....🚩
गोवा पोर्तुगीजांनी नानाविध अत्याचार केलेली भूमी. इथल्या जनतेला कायम परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला१६ व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पोर्तुगीज कित्येक प्रकारे जनतेवर धार्मिक बंधने लादत असत पिण्याच्या पाण्यात, विहिरीत ब्रेडचा एखादा तुकडा टाकायचा आणि ते पाणी पिले तर तुमचे धर्मांतर झाले अशी भीती याच पोर्तुगीजांनी सर्वत्र पसरवली होती अर्था ,ही गोष्ट कित्येक शतके चालू होती..
याच गोव्यातील केलोशी गावात शांतादुर्गा देवीचे मंदिर होते छोटेखानी असले तरीही ही गोव्याची आराध्यदेवता १६ व्या शतकाच्या मध्यानास पोर्तुगीजांनी हे मंदीर उध्वस्त केले स्थानिक जनतेने पोर्तुगीजांच्या विरोधात फार मोठे युद्ध पुकारले प्रतिकार केला पण सर्वांना अपयश आहे देवीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून मूर्ती गुपचूप केवळे गावी आणली आणि मंदिराच्या अभावी मूर्ती तशीच २०० वर्ष केवळे गावी स्थापण्यात आली..
पुढे छत्रपती थोरले शाहू गादीवर आले भारताच्या विविध भागावर आपला अंमल बसवला आपले वडील पराक्रमी संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच शाहू छत्रपतींनी गोव्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले इसवी सन १७३० मध्ये त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आपले मंत्री नारो शेणवी याच्या स्मृती जपल्या जाव्या म्हणून त्यांनी केवळे गावात शांतादुर्गा देवीचे मोठे मंदिर बांधण्याचे काम हातात घेतले..
जवळ जवळ ९ वर्षे या मंदिराचे बांधकाम चालले अखेर इसवी सन १७३९ साली हे मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले गोव्यात बांधण्यात आलेले हे सर्वात मोठे मंदीर शाहू महाराजांनी या देवीला स्वता सोन्याची पालखी दिली.देवीच्या खर्चासाठी केवळे गाव इनाम म्हणून दिले..
आपले आजोबा स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात सप्तकोटेश्वरचा जीर्णोद्धार केला हाच आदर्श थोरले शाहू छत्रपतींनी आपल्या डोळ्यासमोर नक्कीच ठेवला असणार केवळ हे शांतादुर्गाच नव्हे तर जवळच असणारे नागेशी मंदीर, मंगेशी मंदिराचाही जीर्णोद्धार थोरल्या शाहूंनी केला..
―――――――――――――――――――――
आपल्या पराक्रमाचा दरारा साऱ्या भारतावर बसवणाऱ्या थोरल्या शाहूमहाराज छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा...🙏🏻

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...