विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 February 2024

महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे)

  महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे)


१० फेब्रुवारी १७७१ हा मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहण्यासारखा दिवस आहे या दिवशी महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे) यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला आणि छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले...🚩
दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मनसुब्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे नजीबचे खानदान १७८२ मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली आणि मराठेशाहीचे सुवर्णयुग दिल्लीत अवतरले महादजी शिंदे यांनी नजीबच्या खानदानाच्या चिंध्या चिंध्या केल्या नजीबखान रोहिल्याचा नातु गुलाम कादर याने ३० जुलै १७८८ रोजी दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा घेतला त्याने बादशाह शाहआलमला शिवीगाळ केली त्याने आठरा शाहजादे पकडले स्त्रियांची विटंबना केली राजवाडा खणत्या लावुन लुटला गुलाम कादर बादशाहजवळ जाऊन बसला बादशहाच्या गळयात हात टाकुन त्यांने तोंडातील तंबाखुचा धुर बादशहाच्या तोंडावर सोडला शाह आलमला तळपत्या उन्हात अन्नपाण्याविणा उभे करण्यात आले पैसा, जडजवाहिर कुठे दडवुन ठेवले आहे त्याबददल विचारणा करण्यात आली...
बादशाह म्हणाला “माझ्यापाशी जे काही होते ते तुम्ही घेतलेच आहे आता मी तर माझ्या पोटात काही दडवुन ठेवणार नाही ना त्यावर ते तुझे पोट चिरून बघावे लागेल” असे उत्तर गुलाम कादरने दिले १० ऑक्टोबरला कहर झाला सुडाची धग आणि फाजिल हाव याने पेटुन गुलाम कादरने बादशाहच्या दोन्ही डोळयात दाभण भोसकुन त्याचे डोळे काढले कौर्याचा कळसच गुलाम कादरने केला दोन महीने दिल्ली लुटून तो रोहीलखंडाच्या घौसगडला आला महादजी शिंदे यांनी मथुरेहुन एक छोटे सैन्य दिल्लीवर रवाना केले आंधळया शाहआलम बादशाहला परत गादीवर बसवुन मराठी सैन्य घौसगडला निघाले मराठयांनी घौसगडला वेडा दिला रसद बंद पाडली कुमकेचा पराभव केला गुलाम कादर ही स्थिती पाहुन किल्ल्यातुन पसार झाला त्याच्या सरदारांनी घौसगड मराठयांच्या ताब्यात दिले मराठयांनी दिल्लीची संपत्ती ताब्यात घेतली आणि घौसगडला सुंरूग लाऊन उद्वस्त केला मराठयांनी गुलाम कादरचा पाठलाग सुरू केला. शामली नावाच्या एका गावाजवळ गुलाम लपला आहे हे कळताच मराठयांनी तेथे जाऊन गुलामाला ताब्यात घेतले. बादशहाच्या आज्ञाप्रमाणे गुलामाचा शिरच्छेद करून त्याची बुबुळे बादशहाकडे पाठविण्यात आली दिल्लीची सारी सपंत्तीही बादशहाकडे पाठविण्यात आली या घटनेनंतर बादशहाने मराठी ध्वज दिल्लीच्या किल्ल्यावर लावण्यास परवानगी दिल्ली ऑक्टोबर १७८८ मध्ये दिल्लीच्या किल्ल्यावर फडकावलेला मराठी ध्वज पुढची तेरा वर्षे तसाच फडफडत राहीला...
“दिल्लीचे राजकारण इंग्रजांचे हातास जाऊ न द्यावे” हे त्याच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते दिल्लीच्या बादशहाच्या सर्वश्रेष्ठ प्रतिनिधीचे म्हणजेच वकिलीमुत्लक पद किंवा कुलमुख्त्यारी पदरात पाडून त्याद्वारा सर्व हिंदुस्थानचा कारभार ताब्यात घेण्याचा गव्हर्नर जनरल हेस्टिंग्ज ऊर्फ इष्टिनचा कावा होता तो महादजींने हाणून तर पाडलाच परंतु हे पद आपणच घेऊन त्याचा डाव उलटवला...”
बादशाहाने महादजीस “महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे” असा फारसी शिक्का करून दिला होता...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...