#श्रीगोंदेकरांनी आपल्या गावचा वैभवशाली इतिहास कायम आठवणीत ठेवावा यासाठी हे लेखन.
श्रीमंत
राणोजी शिंदे यांच्या पाच पुत्रापैकी जेष्ठ पुत्र जयाजी आप्पा शिंदें
(जुलै १७४५ते २५जुलै १७५५)या दहा वर्षांच्या काळात मराठेशाहीची पताका
अवघ्या उत्तर भारतात फडकवंत त्यांनी केलेल्या पराक्रमाच स्मरण केलेच
पाहिजे. या निमित्ताने त्यांच्या पत्नी सकूबाई यांचे ही स्मरण करण्याचा
दिन.त्यांची छत्री श्रीगोंदेत आहे.
//श्री ज्योती लिंग चरणी तत्पर राणोजी सूत जयाजी शिंदे //
या
नावाने आपला मोर्तब,शिकका चालवणारे शिंदे घराण्याचे कर्तबगार सुभेदार
जयाजी आप्पासाहेब याचा कार्यकाळ श्रीगोंदे नगरी मध्ये गेलेला आहे. इथूनच
उत्तरभारतातील अनेक यशस्वी मोहिमाचे नियोजन जयाप्पा यांनी केल .त्यांचे
वडील राणोजी यांच्या नंतर कारभाराचे सूत्र हाती आल्यावर त्यांनी गंगा आणि
यमुना नदीच्या मधला प्रदेशात (अंतवेदी) केलेल्या यशस्वी मोहिमा आणि त्यातून
मिळवलेला राजकोष याबाबत पत्रव्यवहार उपलब्ध आहेत.उदयपूर, जयपूर ,जोधपूर
इथल्या राजकीय उलाढाली तर अभ्यासाचा विषय आहे.या भागातील न्यायनिवाडे ही
जयाजी यांनी केले असल्याचे कागद उपलब्ध आहेत.
आपल्या
सैन्याची काळजी घेणे या सैन्याला काय हवे त्यांची उपलब्धता करून देणे या
शिंदेशाहीतील गुणामुळे अनेक सरदार आणि सैनिक देखील शिंदे सरकारांसाठी झटत
होते.वेळप्रसंगीजीवाची बाजी लावत यासाठी एक पत्रात जयाप्पा यांनी तर
आपल्या सैन्यतील बारगीर चांदखान ,राजजी गायकवाड, जिवाजी जाधव ह्यात
मोहटतदार ,शिलेदार रानोजी ढवळे ,हरबाजी पवार हे युध्दात जखमी झाले असल्याने
त्यांची जखम बरी होई पावतो त्यांना रोज खर्चाची रक्कम देण्याबाबत पत्र
आहे.
असे कर्तबगार जयाजी शिंदे यांना दगा देऊन त्यांची हत्या करण्यात आली.याबाबत पत्रात उल्लेख आल्याप्रमाण
मराठी
सैन्यांत वाव मिळण्यासाठी ' बिजयसिंगानें मारेकरयास दक्षिणी थाट देऊन दगा
केला . वकील, वाणी किंवा भिकारी यापैकी कोणत्या रूपाने मारेकरी आत शिरले
हैं अनिश्चितच राहतें आहे.किंवा यावर वेगवेगळे मत आहेत.
तात्कालिन
शिष्टाचाराप्रमाणे आगत, खागत व दरबारी शिस्तीमुळे अपघात करण्याला व तसेच
निमूटपणे निसटण्याला फार कमी संधी होती दगा केल्यानंतर मारेकऱ्यापैकी एक
निसटुन परतही गेला असे एक बखरकार लिहतो.तर जगदीशसिंह गेहलोतकृत मारवाडचे
इतिहासावरूनही याबाबत प्रकाश पडतो.या प्रसंगासंबंधी
'खोखर बडो खुराकी खा गयो, आपा सरिखो डाकी'
अशी
अति प्रसिद्ध वाक्य आहे.[असून मारेकऱ्याचे नावही दिलें] आहे [मारवाड
इतिहास पृष्ट ] जयाजी आजारी असता मारवाडकर राजवैद्याचे हस्ते औषधोपचार
करवून गुण दाखविण्याची निमित्ताने ही मारेकरी छावणीत आले असावेत असा ही एक
मत आहे.
जयाप्पा
शिंदे यांनी यानी नागोर भागात मोहीम काढली असता फेब्रुवारी १७५५ मध्ये
अजमेरचा किल्ल्या ताब्यात घेतला यानंतर बिजेसिंहाने वकील पाठवून तहाचे
हालचाली सुरू केल्या . नागोरजळच्या ताऊस सरोवराजवळ छावणी टाकून शिंदे
राहिले असताना . विजयभारती नावाचा वकील येऊन जयप्पां यांच्याशी बोलणी करत
होता.
आषाढ
वद्य द्वादशी , दि. २५ जूलै रोजी विजयभारती गोसावी रायसिंह चोहान व
जगनेश्वर या सरदारांसह जयप्पा शिंदेंना भेटण्यासाठी छावणीत आला. याच वेळी
रावतसिंह सिसोदीया हा उदेपूरकर वकील सुद्धा छावणीत हजर होता. या उभय
पक्षात बरीच बोलाचाली झाली. बोलणे ऐन भरात असाताना गोसावी आणि चोहान
यांच्या अंगभूत मारेकऱ्यांनी संधी साधून जयप्पास दगा केला , जयप्पा जागीच
कोसळले , याच बरोबर रावसिंहाचाही हकनाक बळी गेला. आरोळी पडली , आणि गोसावी व
चोहान यांना जवळच्या मराठी सैनिकांनी मारले
"ताऊसर
जवळ नागोर येथे जयाप्पा शिंदे यांचा ज्या जागेवर अंत झाला तेथे त्याची
जी छत्री होती ती मोडकळीस आली असता के सर प्रतापसिंग यान शिंदे सरकारचे
शुद्ध स्नेहासाठी तिचा जिर्णोद्वार करून बाग व विहीर खोदून दिली।असा उल्लेख
पत्रात आला आहे.
याशिवाय आणखी एक छत्री पुष्कर येथे पुष्कराज तीर्थ सरोवराच्या पूर्व बाजूला आहे.
यानंतर
याची खबर श्रीगोंदे मुक्कामी त्याच्या घरी राजवाड्यात आली.इथं समस्त
श्रीगोंदे शोकसागरात बुडाले यांनंतर त्यांच्या पत्नी यांनी ही अग्निप्रवेश
केला असावा.
(
जयाजी (आप्पासाहेब )यांच्या पत्नी राजमाता सकूबाई यांची छत्री श्रीगोंदे
च्या सरस्वती नदीच्या काठी मैनाबाई च्या माळावर आहे. त्या गाढवे देशमुख या
सातारा जिल्ह्यातील खंडाळा मधील वतनदार घराने मधील होत्या. आजही गाढवे हे
ग्वाल्हेर शिंदे घराण्याच्या जवळचे नातलग अन मोठे जहागिरदार आहेत.
संदर्भ :शिंदेशाही इतिहासाची साधने
शिवाजी साळुंके श्रीगोंदे
साभार
No comments:
Post a Comment