सिदोजी, खतरोजी, सुभानजी आणि संभाजी हे चौघे पोळ बंधू कवठें महांकाळ येथें रहात असत, या पोळ
घराण्याकडे मौजे दहिवाडी कर्यात मलवाडी येथील पाटीलकी, आणि कर्यात सावळज प्रांत हुकेरी येथील देशमुखी अशीं दोन वतनें पूर्वीपार चालत होतीं.
शेजारचा मिरज प्रांत आणि मिरजेचा किल्ला हा मोगलांच्या ताब्यांत होता. महंमद दिलेलखान नावाचा मोघल सुभेदार मिरजेत रहात असे, त्रिमलराऊ उर्फ तिमाजी वेंकटाद्री नांवाचे ग्रहस्थ मिरजेचे देशमुख होते. पोळ घराण्याच्या कागदांत नमूद केलेली सर्व हकीकत इ. स, १७२५-२६ साली घडलेली आहे, त्या सालीं महंमद दिलेलखान यानें तिमाजी वेंकटाद्री याच्यामार्गे तगादा लाविला कीं, तुम्ही मिरज प्रांताचे देशमुख आहां. मिरज प्रांतांत सरकारी बहुलाची बाकी थकली आहे, ती वसूल करून द्या,असे म्हणून खानाने तिमाजीवर जबरदस्त दंड बसविला.
सरकारी देणे भागविण्याकरितां तिमाजीनें वर्षाची मुदत मागून घेतली. त्या मुदतीत तिमाजीनें सरकारी बाकी वसूल करण्याची अतिशय खटपट केली. परंतु त्याला सरकारी देणें भागवितां आलें नाहीं. तेव्हां खानाने तिमाजीच्या दाराशी पठाणांचें घरणे बसाविलें. पठाणांनीं सरकारी देणें भागविण्याकरिता तिमाजीच्या मानेवर तलवार लोंबकळत ठेविली.
मौजे सलगरे प्रांत रायबाग येथील सिंदोजी बिन तावजी बंडगर आणि कायाजी पांढरे या दोघांनीं तिमाजीच्या अडचणीचा फायदा घेतला.बंडगरांनी दिलेलखानाशी बोलणें लाविले कीं, आम्ही तुम्हांस दोन हजार रुपये देतो. तुम्ही तिमाजीकडून कवठें महांकाळ येथील निम्मे देशमुखीचे खरेदीपत्र आमच्या नांवें करून द्यावे. बंडगाराच्या या संधानावरून खानाने तिमाजीला ताबडतोब कैद केलें आणि त्याचें घरदार लुूटून टाकलें. या लुटीत तिमाजीचा देशमुखीचा शिक्का खानाच्या हाती सांपडला.
नंतर खानाने तिमाजी कडून कवठेमहांकाळचे निम्मे देशमुखीचे खरेदीपत्र आणि गोत महजर असे दोन कागद बंडगराच्या नांवे लिहून घेतल.भोवरगांवच्या वतनदारांनीं या दोन कागदांवर साक्षी घातल्या नाहीत. कुठल्यातरी सामान्य लोकांच्या साक्षी घालून ते कागद पुरे करण्यांत आले.या दोन कागदांवर देशमुखीचे शिक्के खानाने स्वतः केले, जुलमाने घेतलेले हे दोन कागद हाती पडल्यावर बंडगरांनीं आपला देशमुखीचा अंमल बसाविण्यास सुरवात केली.
इकडे तिमाजी देशमुख खानाच्या तुरुंगांत अडकला होता. पुढें कांहीं दिवसांनी तिमाजी तुरुंगांतून पळून कोकटनूर येथे लपून राहिला, पुढें कोकटनुरातून तिमाजी कवठे महांकाळचेच सिदोजी पोळ यांजकडे गेला, आणि म्हणाला की,आम्हांवर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे, पैशाकरिता पठाण आमचे प्राण घेत आहेत. कवठेमहांकाळ पंधरा गांवचे देशमुखीचे वतन आमचें पुरातन आहे. निम्मे देशमुखीचे वतन तुम्हांस विकत देतों, आम्हांस पैसे देऊन या प्रसंगांतून सोडवावे. पोळांनीं हें म्हणणें मान्य केळे आणि उभयपक्षी करार ठरला तो असा-
( १) कवठे महाकांळ येथील देशमुखांचा वाडा सिदोजी पोळांनीं नवीन बांधावा. त्या वाड्यांत तिमाजी देशमुख आणि पोळ बंधू या दोघांनीं मिळून राहावें.
(२ ) पोळांनीं देशमुखास २२५० रुपये, पांचशे रु. चे कापड, चार घोडी, पंचवीस बैळ, पंचवीस गाई,
म्हशी दह्या, जोरी खंडी दहा, येणेप्रमाणे द्यावें
.
(३) मिरज प्रांताचा देसाई आहे त्याचें पोळांनीं लग्न करून द्यावें,
(४) पोळांनीं तिमाजीच्या देशमुखीच्या अमलास मदत करावी,
(५ ) मौजे सलगरे प्रांत रायबाग येथील सिदोजी बिन तावजी बंडगर आणि काजी पांढरे यांनीं देशमुखीचे खरेदीपत्र लिहून घेतलें आहे, पोळांनी बंडगराचा अमल बसूं देऊं नये.
याप्रमार्णे करार ठरल्यावर पोळांनी रुपयांचा भरणा केला आणि तिमाजीनें सिदोजी पोळ यांचे नांवे खरेदीपत्र करून दिलें,या व्यवहाराबद्दल पुढें परगणे जत ब बरडोल, परगणे कोकटनूर, परगणे तेरदाळ, परगणे जंबखडी ( जमखंडी ), परगणे अथणी, कर्यात कवठे महांकाळ, देशिंग, डफळापूर वगेरे भोवरगांवच्या वतनदारांची पंचाईत भरली आणि तिने तिमाजी देशमुख आणि सिंदोजी पोळ यांना निम्मेनिम देशमुखीचा गोत महजर करून दिला.
या कागदावर दानपा बिन सातपा सुतार यानें आपली साक्ष घातली आहे. सुताराने आपलें निशाण तासणी असे लाविलें आहे पाटील देशमुख वगैरे मराठे वतनेदारांनीं आपलें निशाण नांगर असे ह्माविळें आहे.
पुढें सिदोजी बंडगर, साताऱ्यास गेला आणि प्रतिनिधींना म्हणूं लागला कीं, आपण तिमाजी देशमुखाला रोख रुपये दिले आहेत आणि
त्याजकडून कवठे महांकाळचे निम्मे देशमुखीचे वतन राजीखुषीनें विकत घेतलें आहे. तिमाजीनें दिलेले खरेदीपत्र आणि गोत महजर आम्हापा्शी
आहे, हे कागद पाहून आम्हांला सरकारांतून वतनाचे दुमालेंपत्र करून द्यावे.
बंडगराच्या पाठोपाठ संभाजी पोळ आणि तिमाजीचा चुलता तमाजी अण्णाजी हे साताऱ्यास गेले आणि त्यांनीं प्रतिनिधींकडे तक्रार केली कीं, बंडगरांनीं तिमाजीपासून जुलमानें कागद करून घेतलेले आहेत. तिमाजीनें बंडगरापासून एक पैसा देखील घेतला नाहीं. बंडगर!चे कागद खोटे आहेत. पुढें तिमाजी स्वतः साताऱ्यास गेला आणि त्यांने प्रतिनिधीपुढें तक्रार केली कीं, बंडगरांनीं जुलमाने मजकडून कागद करून घेतले आहेत ते खोटे आहेत. बंडगरापासून मीं
एक पैसा देखील घेतला नाहीं.
सिदोजी पोळ यांजकडून द्रव्य घेऊन आपण त्यांना निम्मे देशमुखीचे वतन राजीखुषीने विकत दिले आहे. सरकारी देणें भागविण्याकारतां आपण निरुपायानें वतन विकलें आहे.याप्रमार्णे वतनासंबेध पोळ आणि बंडगर यांमध्यें वाद उत्पन्न झाला आणि त्यांत बंडगर सर्व बाजूंनीं खोटे ठरले. मुख्य गोष्ट, बंडगराला रुपयांचा भरणा शाबीत करतां आला नाहीं.
प्रारंभीं बंडगर म्हणाला की, आपण तिमाजीच्या हातांत.रोख पैसे दिले आहेत, पुढें बंडगर म्हणूं लागला कीं, आपण तिमाजीच्या हातांत रोख पैसे दिले नाहींत. तिमाजीच्या सावकाराकडे आपण परभारें
भरणा केला आहे, साबकाराकडील तिमाजीचे कर्जखत आपण सोडविले नाही.
आपण सावकाराला मोघम रुपये दिले आहेत, बंडगराची वागणूक आणि त्याच्या बोलण्यांतील लटपट लक्षांत घेऊन पंचांनी निर्णय दिला कीं बंडगराचे कागद रद्यबादल आहेत आणि त्याचा दाबा खोटा आहे, तिमाजीनें पोळांना वतन विकलें ही गोष्टच खरी आहे.बंडगराचा वतनाशीं कांहीही संबंध नाही,
यानंतर प्रांतिनिधींनी पोळांना वतनासंबंधीं तीन कागद करून दिले.प्रतिनिधींनी पोळांना वतनपत्र करून दिलें आहे. त्या कागदावर प्रतिनिधींनीं आपला शिक्का केला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी पोळांना वतनाचे बाबतींत आज्ञापत्र दिले. कागदावर बाजीराव बल्लाळ प्रधान आणि प्रातिनिधि यांचे शिक्के आहेत. प्रतिनिधींनी पोळांना गोतमहजर करून दिला.छापला आहे. या कागदावर प्रातिनिधीनीं आपला शिक्का केला आहे.
पोळांनी शाहू महाराजांकडून आगळगांव हा गांव इनाम मिळविला त्यासंबंधी महाराजांचे आज्ञापत्रआहे. त्या कागदावर बाजीराव बल्लाळ प्रधान आणि प्रतिनिधि यांचे शिक्के आहेत. प्रतिनि्धींनीं पोळांना आगळगांवाबद्दल इनामपत्र करून दिले आहे. या कागदावर प्रातिनिधींचा शिक्का आहे. याशिवाय तिमाजीने पोळांना देशिंग कर्यात नऊ गांबांच्या निम्मे देशमुखीचे वतन खरेदी दिलें. याशिवाय तिमाजीचा मुलगा नरसो तिमाजी याने पोळांना अंजनी कर्यात बारा गावांच्या देशमुखीचे सर्व वतन खरेदी दिलें.
पोस्ट साभार.
हाडा चौहान उर्फ चव्हाण डफळपूर संस्थान.
No comments:
Post a Comment