विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

वीरगळ :-

 


वीरगळ :-
वीर ' संकल्पना : - रणांगणावर वीर मरण येणे हे भारतीय लोकजीवनात पुण्यप्रद मानले गेले आहे . महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले वीरगळ आणि सतीशिळा याची प्रचिती देत उभे ठाकले आहेत .
वीरगळ संकल्पना : - आपल्या महाराष्ट्राला अतिशय संपन्न असा वारसा व इतिहास लाभला आहे . महाराष्ट्रावर अनेक परकीय आक्रमकांनी / राज्यकर्त्यांनी आक्रमणे केली आणि त्यावेळी इथल्या मातीतील वीरांनी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन ही भूमी परकीय आक्रमणापासून वेळोवेळी स्वतंत्र केली आणि पुढील काळात तर साऱ्या हिंदुस्थानचे रक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्राकडे आली .
वीरगळ म्हणजे शूरवीर व्यक्तीचे स्मारक शिळा होय . राज्याच्या किंवा समाजाच्या हितार्थ कधी साहसी वीर युद्धात लढाईत प्राण गमावलेले यांना वीर म्हटले जाते . वीरगळ हा पुल्लिंगी शब्द आहे . युद्धात राजेयज्ञेची कर्तव्य पार पाडणारी व्यक्ती म्हणजे वीर म्हणजे दगड , वीरगळ म्हणजे विराचा दगड . वीरगळ या शब्दाचा जन्म कर्नाटकात झाला असावा . कर्नाटकात वीरकल , वीरकल्लू असे म्हणतात . महाराष्ट्रात मात्र याला वीर कल्लूचा अपभ्रंश होऊन वीरगळ असा शब्द रूढ झाला .
वीरगळ व्याख्या : - " एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाल्यास , त्याचे चित्रण ज्या दगडी शिळेवरती केली जाते त्यास वीरगळ असे म्हणतात .
गोधन / पशुधन संरक्षक वीरगळ
साधारणतः प्राचीन कृषी संस्कृती पासून समाजाच्या जीवनशैलीचा मूलभूत पाया हा शेती आहे . पूर्वीच्या काळी व्यावसायिक दृष्टिकोनातून जीवन जगण्याची जी काही साधने होती त्यात शेती हे मुख्य साधन होते . शेती म्हटले की मुख्य प्राणी गाय , बैल , म्हैस इ . होते . शेती हा जरी मुख्य व्यवसाय असला , तरी शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून पशुपालन हे केले जाईल . त्यात गाय , बैल , कुत्री , कोंबड्या बकऱ्या , म्हशी , खेचरे , शेळ्या यांचे पालनही केले जाई .
राष्ट्रकूट , शिलाहार , यादव यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राला भरभराटीचे दिवस येण्यास सुरुवात झाली . शेती व शेतीला पूरक असे इतर सर्व कामे वाढीस लागले होते . त्यात सर्वात जास्त प्रमाणात दूध व्यवसाय केला जाईल . त्यातून मिळणारे उत्पन्न हे सर्वात जास्त मिळते त्यामुळे पशुधन ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था असे . त्याकाळी अशी पशुधने शेतकरी सांभाळत असत . ते पशुपालनाचा व्यवसाय करीत . त्यातून ते श्रीमंत झाले होते . प्रत्येक गावात , खेड्यात पशुपालन केले जाई . त्यामुळे सहाजिकच त्या पशुधनाचे संरक्षण करणे हे जीवनातली महत्त्वाची होती . आणि ते करण्यासाठी ते राज्यातील सैनिकांची देखील मदत घेत असत . कोणत्या गावात किती पशुधन आहे व कोणते पशुधन आहे याची माहिती पंचक्रोशीत सर्वांना असे . उत्तम पशुधनावर डोळा ठेवणारेही गावोगावी असत . यातून गावोगावी असणारे हे पशुधन चोरण्यासाठी चोर आक्रमण करीत . पशुधन चोरणाऱ्या लोकांना प्रतिकार करण्यासाठी लढाया पेटत असत . त्यामुळे त्या काळात पशुधन व पशु हल्ला हे विषय मानाचे बनले गेले . अशा लढाईत पशु व वीर दोघेही मरत . पशु संरक्षणासाठी आलेले मरण हे शौर्य कर्म मानले जाई . जे वीर आपल्या गावावरील झालेला हल्ला परतण्यासाठी लढाईत धारातीर्थी पडत , अशा वीरांच्या स्मारक शाळा तयार करत . या शिळांना पशु हल्ला संरक्षक किंवा गोधन संरक्षक वीरगळ असे म्हणतात .
त्यामुळेच महाराष्ट्रात बहुतांशी वरती आपल्याला गाय , बैल किंवा युद्ध संग्राम हा प्रसंग जास्त दिसतो . अशा प्रकारच्या वीरगळांची सविस्तर माहिती ' मेमोरियल स्टोन्स ' नावाच्या पुस्तकात एस . शेट्टर आणि गुंथर सोंथायमर यांनी देऊन त्यांनी त्यावर चर्चा देखील केली आहे . त्यांनी गावावर चा पशु हल्ला हा विषय खोलात जाऊन मांडला आहे . त्यांना ते ' तुरूगुल ' असे संबोधतात ग्रामीण जीवन व त्यात वारंवार पडणारे दुष्काळ यातून पशुधनावर सतत हल्ले होत . पशूंची चोरी करणे हा एक मोठा व्यवसाय होता . व्यवसायिक पशुचोर अगदी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात निर्माण झाले होते . यातून अशा प्रकारच्या वीरगळांची निर्मिती झाली असावी . प्राचीन काळात विविध लेण्या , मंदिरे , गुंफा , भित्तीचित्रे यावरती कोरलेल्या प्राण्यांच्या शिल्पावरून कोण कोणते प्राणी त्या काळात होते हे लक्षात येते . शेतीसाठी उपयुक्त असलेल्या पशूंना देवासमान पूजले जात असे . यावरून शेतकऱ्याच्या व मानवाच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व किती होते हे समजते .
पशुधन संरक्षक वीरगळ , जुन्नर वीरगळाच्या तळाच्या कप्प्याखाली एक चौकोनी देवळी आहे ती दिवाबत्ती ची सोय म्हणून केली आहे तळाच्या कप्प्यांमध्ये पशु रक्षणकर्ता वीर रणभूमीवर मरण पावला आहे व त्याच्या वर 4 पशू उभे राहिलेले दाखविले आहेत . पशूंची शिंगे , शेपटी ठळकपणे रेखाटलेली दिसून येते . वीराच्या कानात मोठ्या आकाराची कर्ण कुंडले आहेत . डोक्यावरती फीत बांधल्या प्रमाणे दिसत आहे . व केसांचा मोठा गोलाकार ( बुचडा ) बांधलेला दिसत आहे .
दुसऱ्या कप्प्यात येथेही शिल्पकाराने वीर हा मोठा व शत्रु लहान दाखवले आहे . शत्रूच्या हातात ढाल आहे या लढाईत तो वीर मरण पावला आहे
त्यावरील भाग तुटून गहाळ आहे यांच्या वरच्या कप्प्यांमध्ये स्वर्गारोहणाचे दृश्य दाखविले असते यात नेहमीप्रमाणे अप्सरा वीरास स्वर्गात चालत नेताना दाखविले असतात . या चवरीधारी अप्सरा आहेत . वीरगळाच्या शेवटच्या कप्प्यात स्वर्गप्राप्ती दाखविलेले असते. या शिवपिंडीवर पुरोहित बिल्व वाहत आहे व दुसऱ्या हातात घंटा आहे . शिवलिंगाच्या डाव्या बाजूला वीर नमस्कार आसनात बसलेला .असतो. तो शिवाच्या उपासनेत मग्र आहे . वीरगळाच्या एकदम वरच्या भागात कलशारोहण असते त्यात सूर्य चंद्र असतात .ते असेपर्यंत याची कीर्ती राहील
©अनिल दुधाणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...