जेव्हा शिवाजी महाराज प्रतापगड वाई सातारा कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (डच) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो..
दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती ह्याची माहिती शिवाजीराजेंला होती व त्याने दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली. राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम ह्याला ही जहाजे सुपूर्त करण्यात आली.. जेव्हा त्याला रुस्तुमेजमानच्या २८ डिसेंबर १६५९ च्या पराभवाबद्दल कळले तेव्हा त्याने राजापूरहून पळ काढला..
१२ जानेवारी १६६० ला शिवाजीराजेंचे पाचशे मावळे राजापूरला व आणखी दोनशे जैतापूरला पोहोचले. अब्दुल करीम, महमूद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला. जैतापूरला काही इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली..
१५ जानेवारी १६६० ला त्यांनी राजापूर सोडले खारे पाटणला गेले त्यांनी खारेपाटणच्या कोट घेतला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनविले..
५ मे १६६० च्या एका वलंदेजी पत्रात शिवाजीराजेंच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते शिवाजीराजेंनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे..
४ फेब्रुवारी १६६० ला दाभोळही शिवाजी महाराजांकडे आले व १५ फेब्रुवारी १६६० च्या सुमारास कुडाळचा किल्ला ही त्यांनी जिंकला..
No comments:
Post a Comment