छ.राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई
लेखन :प्रकाश लोणकर
छ.शिवाजी
महाराजांचा राज्याभिषेक होऊन मराठ्यांची सत्ता दक्षिणेत स्थिर झाल्याने
मोगल सम्राट औरंगजेबने मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेकडे कूच
केले.तो तीन ते चार लाख घोडदळ आणि चार लाखांचे पायदळ घेऊन बऱ्हाणपूर इथे
नोवेंबर १६८१ मध्ये येता झाला.छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्मम, क्रूर
हत्ते नंतर (मार्च १६८९) मोगलांना असे वाटू लागले होते कि आता मराठे संपले,
मोगली साम्राज्याला सळो कि पळो करून सोडणारा जुना दुश्मन संपला आणि आपले
संपूर्ण हिंदुस्थानवर एक्छत्री साम्राज्याचे ख्वाब प्रत्यक्षात अवतरले. पण
मोगलांची सह्याद्रीच्या लेकरांना समजण्यात हिमालय एवढी चूक झाली. त्यांना
मराठ्यांच्या स्वराज्य भक्तीचा,स्वातंत्र्य प्रियतेचा,चिवट प्रतिकार
क्षमतेचा अंदाज आला नाही.छ.संभाजी महाराजांच्या क्रूर हत्त्ये नंतर
छ.राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलां विरुद्ध
स्वातंत्र्य युद्धास सुरुवात केली. छ.राजाराम महाराजानी सन १६८९ ते १७००
अशी ११ वर्षे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व केले. छ.राजाराम
महाराजांच्या मृत्यू नंतर(मार्च १७००) मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाची
कमान, सूत्रे छ.राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई ह्यांनी घेतली. तारा
राणीनी मराठ्यांच्या मोगल विरोधातील लढ्यात कुठलीही मरगळ, शैथिल्य येऊ दिले
नाही.मराठ्यांचे सुमारे २६ वर्षे चाललेले स्वातंत्र्ययुद्ध मोगल बादशाह
औरंगजेबच्या मृत्यूने (फेब्रुवारी १७०७) संपले.सतत सव्वीस वर्षे
मराठ्यांबरोबर चाललेल्या युद्धामुळे मोगल साम्राज्याची वाटचाल वेगाने
पतनाकडे सुरु झाली. औरंगजेबच्या मृत्यू नंतर मोगलांनी मराठ्यांमध्ये दुही
निर्माण करण्याच्या हेतूने छ.संभाजी महाराजांचे मोगलांच्या कैदेत असलेल्या
शाहू ह्या पुत्राची मुक्तता करून त्याला महाराष्ट्रात पाठविले. मोगली
डावपेच खरे ठरून छ.शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यात स्वराज्य संस्थापक
छ.शिवाजी महाराजांच्या मराठी राज्याचे खरे वारस कोण यावरून खूप संघर्ष होऊन
करवीर आणि सातारा अशा मराठ्यांच्या दोन गाद्या अस्तित्वात
आल्या.मराठ्यांच्या दोन्ही गाद्यात बहुतांश काळ संघर्षच राहिला.
ताराराणींच्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धोपरांत (युद्धानंतरच्या) कार्य काळाशी संबंधित बरेचसे साहित्य इतिहास प्रेमींच्या वाचण्यात आले असेल, म्हणून त्याविषयी इथे लिहित नाही.ताराराणींच्या राजकीय जीवनाचे सार प्रख्यात इतिहास संशोधक स.मा.गर्गे यांनी अतिशय सुयोग्य रित्या मांडले आहे. ते मला स्वतःला खूप भावले म्हणून समूहातील अन्य मित्रांच्या माहितीसाठी संपादित स्वरुपात देत आहे.
‘’ ताराबाई १० डिसेंबर १७६१ रोजी निधन पावल्या तेव्हा त्यांचे वय ८६ वर्षांचे होते. ताराबाइंच्या जीवनात जेवढे चढ उतार आले तेवढे कोणत्याही दुसऱ्या मराठा स्त्रीच्या जीवनात आले नसावे.त्यांचे सारे आयुष्य वादळी स्वरूपाचे होते. कर्तृत्वाच्या ऐन शिखरांवर उभे राहण्याचे सदभाग्य त्यांना लाभले.तसेच आपल्या सावत्र मुलाच्या व पुतण्याच्या तुरुंगात एक-दोन नव्हे, सतत पस्तीस वर्षे राहण्याचे दुर्भाग्यही त्यांना सोसावे लागले.इ.स.१७१४ ते १७३१ त्या राजसबाई आणि संभाजीराजे यांच्या नजरकैदेत पन्हाळ्याच्या किल्ल्यावर होत्या. आणि त्या नंतर इ.स.१७३१ ते १७४९ पर्यंत त्यांना शाहूमहाराजांच्या कैदेत अजिंक्यतारा किल्ल्यावर राहावे लागले. लहानपणी त्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकले होते. एका सेनापतीची मुलगी ह्या नात्याने माहेरीही पराक्रमी वडिलांच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. तरुणपणी औरंगजेबासारख्या अत्यंत हिकमती व बलशाली सम्राटाशी सामना देण्यात त्यांनी अपूर्व शौर्य दाखविले होते. प्रौढ वयात तुरुंगवास भोगला आणि वृद्धावस्था राजकीय डावपेचात व्यतीत झाली.ताराबाईनचा हा सारा आयुष्यक्रम पाहिल्या नंतर वाटते कि त्यांच्यावर काळाने सूड उगवला. शाहू महाराजांच्या आगमना नंतर त्यांच्या आयुष्याला एक प्रकारे उतार लागला. कर्तृत्वाच्या आणि कीर्तीच्या उच्च स्थानापासून त्यांचे आयुष्य घरंगळत जाऊ लागले.
शककर्ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सुमारास जन्मलेल्या ह्या पराक्रमी स्त्रीला पानिपतच्या भयानक घटने नंतर मृत्यू आला. त्यांच्या जन्माच्या वेळी सारा महाराष्ट्र शौर्य आणि स्वातंत्र्य या भावनेने बेहोष झालेला होता.त्यांच्या मृत्युच्या वेळी साऱ्या महाराष्ट्रावर दुःखाची आणि निराशेची दाट छाया पसरली होती. मराठ्यांच्या चार पिढ्यांनी या कालखंडात एक पराक्रमी परंपरा निर्माण केली.ह्या परंपरेला पानिपतच्या मैदानावर प्रचंड धक्का बसला.ताराराणीना या कालखंडातील साऱ्या बऱ्या वाईट घटनांचे वृत्तांत ऐकावे लागले;पण त्या अशा परिस्थितीत सापडल्या होत्या कि त्यांना आपल्या पूर्व आयुष्याची स्मृती आठवण्याशिवाय काहीही करता येणे शक्य नव्हते.
एका अर्थाने ताराबाई प्रामुख्याने स्वातंत्र्य संग्रामाच्या सेनानी या दृष्टीनेच यशस्वी होऊ शकल्या.स्वातंत्र्य संगोपनासाठी आवश्यक असणारे कर्तृत्व त्यांना दाखवता आले नाही. संग्रामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या व्यक्ती तो संग्राम संपल्या नंतर निरुपयोगी ठरल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत,ताराबाईनचे व्यक्तित्व त्यांपैकीच होते.म्हणूनच एके काळी भद्रकाली ठरलेल्या या पराक्रमी स्त्रीला पुढच्या काळात मराठी राज्यात दुही निर्माण करण्याचा आक्षेप पत्करावा लागला.
शाहू महाराजांच्या निधनानंतर ताराबाईना पुन्हा नवी संधी मिळाली होती. राज्य करण्याचे स्वतंत्र क्षेत्र लाभले होते.त्यांच्या पसंतीचा,प्रत्यक्ष त्यांचा नातूच राज्यावर त्यांनीच बसविला होता;पण ती संधी कोणत्याही का कारणाने होईना त्यांच्या हाती राहिली नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्या सर्वांचे दूषण ठरल्या.
औरंगजेबाशी लढताना ताराबाईनि फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठी राज्य राखेतून जिवंत केले.हि त्यांची अभूतपूर्व कामगिरी मराठा इतिहासाला कधीही विसरता येणार नाही.’’ राजा नाही,राजधानी नाही,पैसा नाही आणि नेताही नाही. अशा अवस्थेत हजारो मराठे संघटीत केले,स्वातंत्र्याला उद्युक्त केले आणि समरांगण गाजविले. ’’असेच वर्णन इतिहासकारांना ताराबाई संबंधी करावे लागेल.त्यांच्या उत्तर आयुष्यातील उद्योगाकडे दुर्लक्ष करून आरंभीच्या काळी त्यांनी गाजविलेले कर्तृत्व लक्षात ठेवावे लागेल.दीर्घजीवी होणे हा ताराबाईनच्या दृष्टीने फार मोठा शाप ठरला यात शंका नाही. १७६१ साली नानासाहेब पेशवे आणि ताराबाई यांच्या सारख्या प्रमुख व्यक्ती निधन पावल्या आणि मराठेशाहीचा एक महत्वपूर्ण कालखंड संपला..’’
आज ताराराणी यांचा २६२ वा स्मृतिदिन.त्यांना भावपूर्ण आदरांजली.
संदर्भ:मराठ्यांचा इतिहास खंड दुसरा.संपादक अ.रा.कुलकर्णी आणि ग.ह.खरे

ताराणीनच्या समाधीचे छायाचित्र श्रेय:श्री राहुल दोरगे पाटील.
No comments:
Post a Comment