विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 February 2024

सरदार जोत्याजीराव पाटणकर आणि सरदार सुभानराव रणनवरे!!

 


सरदार जोत्याजीराव पाटणकर आणि सरदार सुभानराव रणनवरे!!
सरदार चांदजीरावांचे पुत्र सुभानराव यांना एकच पुत्र होता त्यांचे नाव ज्योत्याजीराव असें होते. ते फार पराक्रमी व शुर होते. मराठ्यांच्या राज्यांत पूर्वजांनीं पराक्रमानें
मिळविलेल्या जहागिरींत राहून हिस्सेरशी करीत बसणें त्यांच्या स्वभावाला आवडत नसे. स्वतंत्रपणें आपल्या पराक्रमांने नवीन जहागीर मिळवून लौकिक वाढावावा अशा स्तुत्य हेतूनें जोत्याजीराव निजामाच्या राज्यांत गेले व त्या ठिकाणीं त्यांनीं अनेक पराक्रम करून थोड्यांच काळांत तीन लक्षांची जहागिरी मिळविली.
हे शक्तिमान्, साहसी व युद्धकलानिपुण होते. तलवार, बंदूक, भाला वगैरे त्यावेळी
उपलब्ध असलेल्या सर्व श्त्रांचा उपयोग निरनिराळ्या प्रसंगीं ते मोठ्या कुशलतेनें करीत, यामूळें त्यांच्याशीं युद्ध करणें इतर योध्यास फार धोक्याचे वाटे.जोत्याजीराव धर्नुविद्येतही निपुण होते. त्यामुळें उंचस्थानीं हत्तीवर अंबारींत बसून कित्येक वेळा ते लढत.
शाहमहाराजांच्या कारकिदीत कित्येक मराठे सरदार निजामास मिळ्ाले. त्यांपैकीं बहतेक इकडील दरबारची इतराजी झाल्यामुळें तिकडे गेलेले होते, परंतु जोत्याजीरावांची स्थिती तशी नव्हती.
त्यांचे बहुतेक पराक्रम निजामाच्या राज्यांत झाले. त्यांच्या ठिकाणीं शारीरिक शक्ति जबर होती. लक्ष्मी तें त्यांनीं नांवाचें हातांतील शस्त्र (खड़ग) फार तेजस्वी व अमौलिक असून आपल्या बहतेक हयातीत वापरल्यामुळें त्यावेळीं शेकडों लोकाचें काळखड़गच झालें होतें.
एके दिवशीं निजामानें छावणींत एका मोक्या, विस्तीर्ण, तंबूमध्यें मोठा दरबार भरविला होता. सर्व सरदार, मानकरी, अमीर उमराव, मुसलमान व मराठे त्या वेळी आपआपल्या दर्जाप्रमाणे स्थानापन्न झाले होते.
जोत्याजीराव व रणनवरे सुभानराव हे तंबूच्या खांबाशी बसले होतें. रणनवरे हा निजामाच्या दरबारीं पराक्रमी व सशक्त म्हणून नांवाजलेला होता व त्याला शक्तीची बढाई फार होती. जोत्याजीरावांनीं बसूनच सहज थक्वें तंबूचा खांब उचलून सुभानरावांच्या आंगरख्याच्या घोळावर ठेविला, दरबार ऐन भरांत आल्यावर कांहीं कारणानें रणनवरे उतून उभे राहू लागले; परंतु आंगरखा खांबाखालीं अडकल्यामुळे त्यांना उठतां आलें नाहीं. ते अर्धवउटून बसल्यामुळे सर्व दरबारी लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जाऊनसर्वत्र हृश्या झाला.
तेव्हां जोत्याजीरावांनीं पन्हा तो खांब उचलून आंगरख्याच्या घेराच्या बाहेर ठेविला, परंतु ह्या गोष्टीनें रणनवरे यांना आपल्या अपमानाबहल विषाद वाटून ते जोत्याजीरावांचा द्रेष करूं लागले.
पुढ़े एके प्रसंगी रणनवरे सुभानरावांनी आपल्या अपमानाचा सूड घेण्याकरितां जोत्याजीरावाशीं युद्धप्रसंग आणिला व उभयपक्षांचें मो्या निकरानें युद्ध होऊन
दोघे खासे वीर समोरासमोर लढूं लागले. खवळलेल्या भयंकर वाघाप्रमारणें ते दोघे एकमेकांचे प्राण हरण करण्यासाठी आपआपल्या शस्त्राचें प्रहार करूं लागले. दोन्हीं पक्षांकडील वीर चकित होऊन वैरभाव विसरून त्यांच्या सामन्याकडे लक्ष देऊन पाहू लागले. अशा रीतीनें युद्ध बराच वेळ झालें. परंतु शेवटी जोत्याजीरावांची आयुमर्यादा सरून ते पड़ले. ही गोष्ट इ. स. १७६३ साली झालीं.
फोटो साभार विशाल बर्गे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...