ताराराणींनी तापी व नर्मदा पार धडक देत मोंगलांना शह दिला आणि मराठा साम्राज्यविस्ताराचा पाया रचला !
मराठ्यांच्या साम्राज्य विस्तार धोरणानुसार सरसेनापती खंडेराव दाभाडेंनी नर्मदानदी ओलांडून गुजरातमधून मोगलांना हटविले व आपले वर्चस्व प्रस्थापित केले .
गायकवाडांनी गुजरातमधे आपला अंमल बसविला व मराठा राज्याची निर्मिती करून करून बडोदा हे राजधानीचे शहर बनविले .
शिंदेंनी तर माळवा , मध्यभारत व दिल्लीच्या आसपासचा प्रदेश हस्तगत केला .
शिंदे , गायकवाड , होळकर हे मराठेशाहीतील बलाढ्य सरदार होते . याकाळात मराठ्यांनी दिल्लीच्या पुढे पंजाब व लाहोर पर्यंत आपले झेंडे फडकवले . राजस्थानातील रजपूत राजे , दिल्ली जवळील जाट व पंजाबातील शिखांना नमोहरम केले .
मराठ्यांनी संपुर्ण भारतात आपला दरारा निर्माण केला . इतकेच नव्हे तर मराठे इतके शक्तीशाली बनले की खुद्द दिल्लीच्या बादशाहीची म्हणजेच परकीय व देशांतर्गत आक्रमकांपासून भारताचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आली .
शिंदे घराण्यात राणोजी शिंदे ... जयप्पा शिंदे ... दत्ताजी शिंदे ... जनकोजी शिंदे ... महादजी शिंदे असे एकापेक्षा एक पराक्रमी शूर वीर होऊन गेले . शिंदे घराण्यातील या शूर वीरांनी आपल्या तळपत्या समशेरीच्या जोरावर मराठ्यांचा जरीपटका दिमाखात डौलत ठेवला .
अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दालीने इ. स. १७५९ मधे पंजाब मार्गे भारतावर आक्रमण केले . त्याला भारतातील रोहिला नजीबखान , अयोध्देचा नवाब शुजा सामिल झाले . अब्दाली आपल्या प्रचंड फौजेसह दिल्लीच्या रोखाने निघाला .
यावेळेस दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी शिंदे घराण्यातील शूर वीर दत्ताजी शिंदेंकडे होती .
अब्दाली जेव्हा दिल्लीवर चालून आला तेव्हा उत्तरेत फक्त दत्ताजींच्या सेनापतीत्वाखाली शिंदेंची फौज होती . अब्दाली , नजीब , शुजा यांच्या एकत्रित फौजेच्या मानाने ती खूपच अपुरी होती .
कठीण प्रसंग ओळखून दत्ताजींनी पेशवे व होळकरांकडे मदतीसाठी निरोप पाठविले . अब्दाली दिल्ली जवळ येई पर्यंत राजस्थानातून मल्हारराव होळकर सैन्यासह नक्कीच आपल्या मदतीला पोचतील अशी आशा दत्ताजींना वाटत होती .
१७६० सालच्या जानेवारी महिन्यात अब्दालीचे सैन्य दिल्ली नजिक पोचले परंतु तोपर्यंत निरोप मिळूनही होळकर सेना किंवा इतर कुमक दत्ताजींच्या मदतीला पोचू शकली नाही .
आपल्या मातृभूमी पासून शेकडो मैल दूरवर .... अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत .... मोठ्या संकटात .... एकाकी असतानाही शूर वीर दत्ताजी शिंदे किंचितही डगमगले नाहीत ... माघार न घेता शत्रूशी लढण्याचा धाडसी निर्णय दत्ताजींनी घेतला !
प्रसंग बिकट होता .. पण दत्ताजींची हिंम्मत अशी की आपण स्वबळावर यातून निभावू शकतो . चहुकडून दुष्मन फौजाही भारी व सारे अमित्र .. परंतु शिंदे मोठ्या हिंम्मतीचे माणूस .. जवामर्द .. शूर .. पराक्रमी . येवढे आवडंबर आले असता किमपी भय अगर चिंता किंवा कसे होईल हा उद्वेग दत्ताजींच्या मुखश्रीवर नव्हता . छत्रपतींच्या पुण्यप्रतापे मारूनच घेतो हेच तोंडावाटे होते .
दिल्ली जवळील बुरांडी घाट येथील यमुना नदीचे पात्र ओलांडून दिल्लीवर हल्ला करण्याची योजना अहमदशहा अब्दालीने आखली .
१० जानेवारी १६६० रोजी दत्ताजींनी आपल्या प्राणांची पर्वा न करता .... अब्दालीच्या सैन्याला यमुनेच्या पात्रात रोखले .
घनघोर रणसंग्राम झाला .... शत्रूशी लढता लढता शूर वीर दत्ताजी शिंदेंना वीरमरण आले आणि ....
बचेंगे तो ... और भी लढेंगे .... ! हे दत्ताजी शिंदेंचे वाक्य इतिहासात अजरामर झाले ...
आज १० जानेवारी दत्ताजींचा शिंदेंचा २६३ वा स्मृती दिन ... !
रणधुरंदर महान सेनानी दत्ताजी शिंदे यांना स्मृती दिनी विनम्र वंदन !
बचेंगे तो और भी लढेंगे !
- अजयकुमार जगताप .
No comments:
Post a Comment