मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 22 March 2024
मंगळवेढ्यातील एक अप्रसिद्ध बंड
मंगळवेढ्यातील एक अप्रसिद्ध बंड
आज पंढरपूर आणि परिसरात मोडी कागदपत्रांच्या शोधासाठी गेलो असता एका ठिकाणी मंगळवेढा येथे सन १८०८ मध्ये झालेल्या फितुरी आणि बंडाची माहिती असलेले मोडी लिपीतील कागद मिळाले. मराठेशाहीच्या उत्तरार्धात झालेल्या या बंडाची माहिती आजवर अप्रकाशित आहे. मंगळवेढा हे पटवर्धनांच्या ताब्यात असलेले मोठे गाव होते. सांगली संस्थानचे संस्थापक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या ताब्यात असलेले ते एक महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. त्यामुळे हे ठाणे फितुरी करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सन १८०८मध्ये काही फितुर लोकांनी केला. मात्र हे बंड चिंतामणराव अप्पासाहेब यांनी शिताफिने मोडून काढले. या बंडात सामील असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. त्या वेळी बंड आणि फितुरी संदर्भात संशयीतांच्या घेतलेल्या जबान्या असलेले कागद आज मिळाले. मोडी लिपीतील या जबान्यांवरून फितूरांनी नेमके काय केले होते, याची माहिती मिळते. मोरो जनार्दन म्हैसकर यांनी दिलेल्या जबान्यात तत्कालीन फितुरांची नावे आली आहेत. मंगळवेढ्याच्या बंडासाठी कोणती कटकारस्थाने रचली होती, याची माहिती यातून होते मराठीशाहीच्या उत्तरार्धातील हे महत्त्वाचे कागद आहेत.
©मानसिंगराव कुमठेकर
9405066065
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment