१६८० च्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराज यांनी मोगल प्रांतात आपले सैन्य पाठवण्यास सुरुवात केली, एक फौज खानदेश तर दुसरी फौजेची तुकडी औरंगाबादकडे. खानदेशात घुसलेल्या फौजेने आपला रोख बुऱ्हाणपूरकडे वळवला आणि सलग तीन दिवस बुऱ्हाणपूरमधील अनेक पुरांवर हल्ले चढवत लूट केली. मराठे बुऱ्हाणपूर भागात पसरले आहेत हे समजतास औरंगाबादचा सुभेदार बहादूरखान यास समजली तो त्वरेने बुऱ्हाणपूरकडे रवाना झाला त्याने लूट घेऊन चाललेल्या मराठ्यांची वाट आडवायला हवी होती पण बहादूरखान हा मार्ग बदलून एदलाबादकडे रवाना झाला. मराठा सैन्याने बहादुरखानास हुलकावणी देत सोबत असलेली लूट आणि कैदी बरोबर घेऊन साल्हेरकडे कूच केली. बहादुरखान हा यावेळी औरंगाबादपासून तीस कोसावर शेख फरीद दर्ग्याच्याजवळ आपली छावणी टाकून बसला होता, त्याचवेळी मराठे अहमदनगर आणि पैठण मार्गाने येत असून औरंगाबादवर हल्ला करणार अशी बातमी त्यास समजली..
बहादुरखानाने बाजारबुगणे मागाहून आणण्याची ताकीद देत औरंगाबादकडे निघण्याची तयारी केली, मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना यावेळी बहादूरखानासोबत होता. मराठ्यांनी औरंगबादमध्ये जी दहशत माजवली त्याबद्दल भीमसेन सक्सेनाने नोंद करून ठेवली आहे, त्या वृत्तांताचा थोडक्यात आशय असा " बहादुरखान दुपारी तातडीने निघून औरंगाबादमध्ये पोहचला, तो इतक्या तातडीने आला नसता तर अनर्थ ओढवला असता. बाईपुऱ्याच्या उपनगरात तसेच सातारच्या खेड्यात मराठ्यांचे सैन्य जमले आहे अशी बातमी आली. बहादुरखान हा तातडीने पोहचला पण तो येण्यापूर्वीच मराठे हे बाईपुऱ्यापर्यंत चाल करून आले होते त्यांनी तिथे धामधूम माजवली. माझ्यासोबत बायका माणसे होती, मी मध्यान्हाच्या वेळी औरंगबादमध्ये दाखल आलो तेंव्हा जे दृश्य दिसले ते विलक्षण होते. लोकांनी आपापल्या घरांचे दरवाजे बंद केले होते, बाजारातून गल्यातून एकही मनुष्य दिसत नव्हता. मराठ्यांची धामधूम पाहता औरंगाबाद शहराभोवती तट बांधावा असा आदेश बादशहाने ( औरंगजेब ) दिला, तट बांधण्याचे काम सुरू झाले ते काम एप्रिल १६८३ मध्ये अमातखान दिवाण याचा मुलगा अब्दुल कादिर याने पार पाडले "
- राज जाधव
No comments:
Post a Comment