*निजाम-उल-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या....*
*निजामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला....*
*असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली....*
*निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला....*
*बाजीरावांनी औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोफखाना, बोजड चिलखती घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला....*
*राऊंनी अगदी नियोजन बद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्वनियोजित योजने प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते....*
*आता मराठ्यांकडे अंदाजे ५०००० सैन्य जमले होते नगर पासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आस-पास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती....*
*पालखेड वैजापुरच्या पूर्वेला १२ मैल तर औरंगाबाद पासून २८ मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राऊ होते Horse Shoe अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूह रचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले....*
*औरंगाबादकडे झेपावणारे बाजीराव (राऊ) आणि त्यांना तेथे पोहचण्या अगोदर रोखण्याच्या इराद्याने निघालेला निजाम यांची टक्कर २५ फेब्रुवारी १७२८ ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले, रसद तोडली....*
*अर्जुनाच्या दिव्यास्त्रां प्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा ह्या आणीबाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पुर्णपणे भंगले होते....*
*आणि भयानक वास्तव मृत्यू बनून पालखेडला त्याच्या समोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक, तहान आणि समोर असलेले मराठे यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्याच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला....*
*या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने ईवाझखाना मार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर ६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला....*
*त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते -*
*१.छत्रपती शाहूराजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोघल सम्राटाने मान्य केले....*
*२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला....*
*३.मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या....*
*४.महसूलाची थकलेली रक्कम निजामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले.
No comments:
Post a Comment