साडेतीन शहाणेः महाराष्ट्राच्या इतिहासातील साडेतीन शहाणे
भाग :
2. देवाजीपंत चोरघडे
लेखन :
- ओंकार करंबेळकर
- बीबीसी मराठी प्रतिनिधी
2. देवाजीपंत चोरघडे
देवाजीपंत चोरघडे हे नागपूरकर भोसल्यांच्या दरबारातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. सातारा, तंजावर आणि नागपूर ही भोसले घराण्याची तीन मुख्य केंद्रे. त्यात नागपूरकर भोसल्यांच्या दरबारात चोरघडे होते.
पेशव्यांकडे नाना फडणवीसांना जे स्थान होतं तेच स्थान देवाजीपंतांना नागपूरकर भोसल्यांकडे होतं. त्यांना दिवाकरपंत या नावानेही ओळखलं जाई.
नागपूरचे सेनासाहेबसुभा रघुजी भोसले यांचं निधन झाल्यावर त्यांच्या जानोजी आणि मुधोजी या मुलांमध्ये वारसासाठी स्पर्धा सुरू झाली. सेनासाहेबसुभा पदाची वस्त्रं मिळवण्यासाठी पेशव्यांना काही रक्कम द्यावी लागे. यासाठी जानोजींनी आपल्यातर्फे त्रिंबकजी भोसले, बाबुरावर कोन्हेर यांना पुण्याला पाठवले.
विश्वकोशाच्या नोंदीनुसार या पुणे भेटीत देवाजीपंतही उपस्थित होते. त्यांचं पेशव्यांशी सेनासाहेबसुभ्याच्या वस्त्रांसाठी सुरू असलेल्या चर्चेवर बारीक लक्ष होते.
विश्वकोशातील नोंद सांगते, 'त्रिंबकजी व बाबूराव कोन्हेर हे नजराण्याची रक्कम दीड लाख रुपये ठरवण्याच्या तयारीत आहेत; तथापि जानोजींना मात्र नजराण्याची रक्कम 7लाख रुपये सांगून ते लबाडी करत असल्याचे देवाजीपंताना समजले. तेव्हा त्यांनी जानोजींना भेटून याबाबत तपशीलवार सांगितले आणि ही कामगिरी माझ्याकडे दिल्यास मी नजराण्याची रक्कम अडीच लाख ठरवून आणतो, असे सांगितले. जानोजींनीही आपला फायदा ओळखून हे काम देवाजीपंतांवर सोपविले. देवाजीपंतांनी पुण्यास जाऊन नानासाहेब पेशव्यांना सांगितले की, 'त्रिंबकजी व बाबूराव जर दीड लक्ष देत असतील, तर मी जानोजींकडून अडीच लक्ष देववितो.ʼ नानासाहेबांचाही एक लाखाचा फायदा होत असल्याने त्यांना ही गोष्ट पसंत पडली. अखेर देवाजीपंतांच्या मध्यस्थीने नजराण्याची रक्कम ठरली.
देवाजींपंतांनी हुशारीने व संयमाने ही सर्व परिस्थिती हाताळली. त्यामुळे जानोजींची मर्जीही त्यांच्यावर पंतांवर बसली.'
No comments:
Post a Comment