विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज-१८

 


छत्रपती शिवाजी महाराज-१८
---------------------------
औरंगजेबाचा पान उतारा करून शिवाजी राजे आग्र्याहून निष्टून आले आणि तीन वर्षे राज्याची स्थिरस्थावर करण्यात गेले. तरीही त्यांनी 1668 च्या ऑक्टोबर मध्ये 400 ते 500 सैनिक छुपेपणाने गोव्यात पाठवून युक्तीने गोवा सर करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या सतर्कतेमुळे त्याने ठिकठिकाणाहून शिवाजी महाराजांचे लोक पकडले. वकिलाला बोलावून सर्व हकीगत सांगून थोबाडीत मारून त्याला आणि मराठा सैनिकांना त्याच्या हद्दीतून बाहेर हाकलले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दहा हजार पायदळ आणि एक हजाराचे घोडदळ करून बारदेस व साल्सेटवर स्वतः आक्रमण करण्याचा इरादा व्यक्त केला. ते वेंगुर्लेला गेले आणि सर्व किल्ल्यांवर दारुगोळा व हत्यारे ठेवली. तथापि पोर्तुगीजांची युद्धाची जय्यत तयारी पाहून ते डिसेंबर मध्ये रायगडला परतले.
दुसऱ्या आली आदिलशहाचा 24 नोव्हेंबर 1672 रोजी मृत्यू झाला आणि सौंदे व बेदनुर येथील राज्यांनी बंड पुकारले. विजापूरच्या हद्दीतील मुलुखावर त्यांनी आक्रमण केले परंतु मुजफ्फरखानाच्या नेतृत्वाखालील फौजेने त्या दोघांनाही शिक्षा दिली आणि बंड मोडण्यात आले.
आता सेनापती प्रतापराव गुजर यांनी. मुजफ्फर खान आपल्या 4000 घोडदळासह तिथे पोहोचला. तोपर्यंत हाती आलेली लूट घेऊन मराठे तिथून पसार झाले. मुझफ्फरच मराठ्यांना फितूर झाला असे वाटून सुलतानाने त्याला सुभेदार पदावरून काढून टाकले. त्याने बंड केले.
जून 1673 मध्ये बहलोल खानाने कोल्हापूर जिंकले व अनेक चकमकीत मराठ्यांचा पराभव केला. पुढे दक्षिण कोकणवर स्वारी करून राजापूर व इतर ठाणे जिंकण्याचा इरादा व्यक्त केला. परंतु बहलोल खान मिरजेत आजारी पडला आणि विजापूर आणि गोवळकोंड्याला सप्टेंबर मध्येच मुघलांच्या आक्रमणापासून आपला बचाव करण्यासाठी शिवाजी महाराजांची मदत घेणे भाग पडले.
शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर मध्ये कर्नाटक व विजापूर हद्दीत मोहीम काढली व अनेक श्रीमंत शहरांची लूट केली. डिसेंबरच्या सुरुवातीला ते कादरामध्ये पोहोचले. परंतु बहलोल खान आणि सर्जा खानानं बंकापूर आणि चांदगड येथे केलेल्या पराभवांमुळे राजे कानडी मुलखातून झपाट्याने बाहेर पडले.
मियासाहेब या कारवारच्या फौजदारांना आदिलशहाच्या विरोधात बंड केले. सन 1674 फेब्रुवारी मध्ये आदिलशहाच्या फौजेने सौंदेवर विजय प्राप्त केला. मियासाहेबाची पत्नीही त्यांना सापडली तरीही त्याने आपला लढा इतर किल्ल्यांवरून सुरू ठेवला. मग सुलतानाने अबू खान उर्फ दुसरा रुस्तम ए जमान याला कानडी मुलखाची सुभेदारी दिली आणि त्याने हे बंड संपवले. त्याचे सर्व किल्ले आदिलशहाला पत्नीच्या सुटकेच्या मोबदल्यात दिले.
रुस्तम हे जमान दुसरा याने मराठ्यांची खोड काढली आणि एका व्यापाऱ्याला पकडले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सूड घेण्याची तयारी केली. पण अबू खानला विजापूरला बोलावून घेऊन त्याची सुभेदारी काढून घेतली. शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह करण्याचे नाटक करून मुलांकडून हल्ला होत नाही याची खबरदारी घेऊन आदिलशाही मुलगावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली. पंधरा हजार घोडदळ 14 हजार पायदळ आणि दहा हजार बिनीचे सैनिक (कुदळी फावडे कुऱ्हाडी इत्यादी वापरणारे) अशी फौज तयार केली.
शिवाजीराजे 22 मार्चला राजापूर जवळ पोहोचले आणि 8 एप्रिल ला त्यांनी फोंडयाला वेढा दिला. तोपर्यंत त्यांच्या फौजेच्या दुसऱ्या तुकडीने आदिलशहाचे अतगिरि हे गाव आणि हैदराबाद जवळची दोन मोठी शहर लुटली व मोठी लूट आणली. मोहम्मद खाना ना प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत फोंडा पोर्तुगीजांनी गुप्तपणे दहा बोटी भरून धान्य व इतर साहित्य पाठवले होते ते मराठ्यांनी जप्त केले. बहलोल खान दीड हजारच्या फौजेसह मिरजेतच होता परंतु शिवाजी महाराजांनी आधीच झाड तोडून टाकून त्याचा फोंड्याकडे येण्याचा मार्ग बंद केला होता आणि उभ्या वाशांचा कोट करून आपले सैनिक ही ठेवले होते. त्यामुळे बहलोल खान परत फिरला. सहा मे रोजी फोंडा किल्लाचा पाडाव झाला. नंतर अंकोल्याचा फौजदार विनायत खान यानेही पैसे घेऊन आपले किल्ले राजांच्या ताब्यात दिले. अंकोला शिवेश्वर कारवार आणि कादरा हे सर्व किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले आणि 25 मे 1675 पर्यंत गंगावती नदी पर्यंतचा मुलुख विजापूरच्या ताब्यातून मराठ्यांकडे आला.
शिवाजी महाराजांच्या सेनापतीने 26 एप्रिल 1675 रोजी कारवार शहर बेचिरा‌ख केले. फोंडा पडल्यानंतर परत कारवारचा किल्ला ही स्वराज्यात समाविष्ट करून घेतला. 12 जून रोजी राजे रायगडावर परतले. राजे परतताच सौंदर्याच्या राज्याच्या मुलखातील बहलोलच्या सेनाधिकारी खिजरखान पाणी आणि तिथले देसाई यांनी मराठ्यांच्या शिबंदीवर हल्ला करून सुपे आणि उलवी ही दोन्ही ठिकाणी परत जिंकून घेतली. वर हुली येथील तुकडीलाही माघार घेणे भाग पडले.
बेधनुर ची विधवा राणी आणि तिमय्या हा तिचा सहकारी यांच्यामध्ये वाद झाला परंतु सत्ता तिमयाच्या हातात होती. राणीने शिवाजीराजांकडे संरक्षणाची मागणी करून वार्षिक खंडणी देण्याची मान्य केले व मराठा वकिलाला आपल्या दरबारात ठेवण्यास तिने मान्यता दिली.
सौंदर्याचा राजा आणि बेडनुर ची राणी यांच्यात जोरदार युद्ध झाली. राणीला तह करणे भाग पडले आणि त्यात शिरशी सेरा तसेच बंदर आणि निर्जन चा किल्ला तिच्याकडून आपल्या ताब्यात घेतला.
अशाप्रकारे दक्षिण कोकण आणि उत्तर कानडी मुलुख निर्विवादपणे राजांच्या ताब्यात राहिला होता परंतु दक्षिण कानडी मुलुख त्यांना घेता आला नाही.
दिलीप गायकवाड.
१७-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...