विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज-१७

 


छत्रपती शिवाजी महाराज-१७
------------&------------
या लेखात प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि कानडी मुलखाची माहिती घेणार आहोत. रत्नागिरी पासून कारवार पर्यंत विजापूरकरांच्या ताब्यात असून रुस्तम ई-जमान असा वंशपरंपरागत किताब असलेला मुस्लिम अधिकारी सुभेदार होता. त्याचे वास्तव्य मात्र मिरजेत होते आणि पन्हाळा किल्ला त्याच्या मुलखात येत होता. परंतु तो विजापूरकरांच्या नियंत्रणात होता. सुभेदार राजापूर आणि कारवार या बंदरांचा कारभार पाहत होता.
कर्नाटकच्या अंतर्गत भागात जहागीरदारांचे राज्य होते. त्यांच्यामध्ये सुंद्याचे नायक व मिर्जनच्या दक्षिणेला केलडी राज घराणे होते.
अथेन्स ते कारवार हा पाच दिवसांचा प्रवास होता. सुंद्यांच्या राज्यातील मिरी जगातील उत्तम आहे. इंग्लंडमध्ये ती कारवार मिरी म्हणून ओळखली जाते.
ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंट आणि 50 हजार विनकारांना नोकरीस ठेवून उत्तम प्रतीची मलमल इथूनच निर्यात होत होती. निर्जन मधून मिरी स्वरा मीठ आणि सुपारी जहाजांवर लागून सुरतेला पाठवला जात होता तर राजापूर मधून मिरी आणि वेलदोडा यांचा व्यापार होत होता. हा प्रदेश सर्व शेजाऱ्यांसाठी गोदाम होता.
शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या सैन्याची 10 ऑक्टोबर 1659 रोजी वाताहात करून त्यानंतर 28 नोव्हेंबरला पन्हाळा जिंकून घेतला. नंतर राजे पश्चिम किनारपट्टीवरील एकेक बंदर व पठारी प्रदेश घेत गेले. रुस्तम इज जमान शिवाजी राजांचा दोस्त असल्यामुळे त्यांनी राजापूरला हात लावला नाही. 28 डिसेंबर 1659 रोजी अफजल खानाचा मुलगा फाजलखान आणि रुस्तम इ जमान यांनी राज्यांवर पन्हाळ्याजवळ जोरदार हल्ला केला. त्यात रुस्तम - ई-जमान नावापुरताच सहभागी होता. तो शिताफीने मागे सरला.
नंतर शिवाजी राजांच्या सैन्याने राजापूर ताब्यात घेऊन लूट केली. तथापि शिवाजीराजांनी त्यांच्या मित्राच्या गावावर हल्ला करणाऱ्या दररोजिया सेना अधिकाऱ्याला काढून टाकले तसेच पुन्हा एकदा राजापूर गावाने बंदर रुस्तम हे जमांच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात दिले आणि लुटीतील वस्तूही परत केल्या.
सोळाशे 63 च्या मार्चमध्ये सरनोबत नेताजी पालकर ने मोघलांच्या सरहद्दीत छापा टाकला परंतु मुघलांच्या 7000 घोडदळाने त्याचा पाठलाग केला. रुस्तम ने विजापूर जवळ या लष्कराची भेट घेऊन पुढील भाग डोंगराळ आणि धोकादायक असल्याने मीच पाठलाग करतो असे सांगून मुघलांना पाठलाग सोडून देण्यासाठी सरदाराचे मन वळवलं. त्यामुळे नेताजीचा बचाव झाला आणि शिवाजी राजांना कारवारच्या श्रीमंत बंदरात घुसण्याची योजना तहकूब करावी लागली.
एक मार्च 1663 रोजी दुसरा आली आदिलशहा बँकापूरला गेला. आली आदिलशहाने बहलोल खान शहाजीराजे आणि इतर अधिकाऱ्यांना कर्नाटकातून बोलावून घेतले. बहलोल खान आणि शहाजीराजे यांना तिथे अटक झाली पण दोन दिवसांनी शहाजीराजे यांना सोडून दिले. विजापूरच्या सुलतानाने कानडी हद्दीत आक्रमण आधीच सुरू केले होते. शिवाप्पा नायक यांनीही आपल्या राज्याच्या विस्तार करण्याचे काम सुरू ठेवले होते त्यातच आदिलशहाच्या ताब्यातील सौंद आणि इतर काही किल्ले जिंकून तो बंकापूरजवळ पोहोचला. बंकापूर किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. साऊंडच्या राजाने आदिलशहाची मदत मागितली. आदिलशहाने सौंद जिंकलेच शिवाय भद्रप्पा नायक बेदनूर आणि इतरही अनेक किल्ले घेतले. अखेरीस त्याने सात लाख रुपये खंडणी देऊन आदिलशहाची तह केला. 21 नोव्हेंबरला आदिलशहा राजधानीत परतला.
रुस्तम एक जमानला शिवाजी राजेंची केलेल्या गुप्त मैत्रीची शिक्षा सुलतानाने त्याची सुभेदारी काढून केली. त्याचा मुलुख मोहम्मद इखलास खान व खवासखान यांना दिला तर दाभोळ आणि चिपळूण फाजलखानाला दिले. शिवाजी राजांनी राजापुरावर अंतिम विजय मिळवला आणि राजापूर कायमच त्यांच्या ताब्यात ठेवले. रुस्तम च्या कारवार मधील हस्तकाने इंग्रजांकडून भरपूर पैसा उकळला त्यामुळे सुरत कार्यालयाने कारवारची वखार हलवण्याचा आदेश दिला आणि कंपनीचा माल गुपचूप हुबळीला हलवावा असे सांगितले. तथा पि आदिलशहाने नेहमीच्या कराखेरीस इंग्रजांना कोणतेही कर द्यावे लागणार नाहीत असे कळविल्यामुळे वखार पुन्हा एकदा कारवार मध्येच राहिली.
ऑक्टोबर 1660 मध्ये शिवाप्पा नायकाचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा भद्रपाचा त्याच्याकडच्या ब्राह्मणांनी 1663 मध्ये खून केला. त्यानंतर चन्नम्मा जी या आईच्या पालकत्वाखाली सोमशेखर या नवजात अर्भकाला गादीवर बसविले आणि चन्ना माझी व तिचा प्रियकर तमय्या नायक राज्यकारभार पाहू लागले. तमैया हा मूळचा ताडी विक्रेता काव्यबाजपणामुळे तो राज्याच्या सेनापतीपदापर्यंत पोहोचला. बेधनूर मधील या परिवर्तनामुळे दुसरा आदिलशहा संतापून त्याने दोन्ही बाजूंनी बेतनूरवर हल्ला करण्यासाठी बहलोल खान आणि सय्यद इलियास शारजा खान यांना एप्रिल 1664 मध्ये पाठवले.
रुस्तम एजमान पुन्हा आदिलशहाच्या मर्जी त बसला आणि मोहम्मद इखलास खानाची कारवारच्या सुभेदार पदावरून बदली केली तसेच अंकोला, शिवेश्वर किंवा हाळेकोट, कादरा आणि उत्तर कानडी मुलखातील सर्व ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या व ही शहरे रुस्तम ए जमानच्या तीन मुलांकडे दिली. आदिलशहा आता बेदनूर कडे 12 हजाराचे घोडदळ घेऊन रवाना होणार होता. त्यामुळे शिवाजी राजांनी भटकळ मध्ये आपल्या आरमारी तळावर जाऊन किनारपट्टीच्या गावांवर छापे मारण्याचा बेत आखला. परंतु खवास खानाने राजांचा मार्ग अडवला. कुडाळचा प्रमुख जखम सावंतही शिवाजी महाराजांचे मांडलिकत्व नाकारून कुडाळ ताब्यात घेऊ पाहत होता. म्हणून आदिलशहाने शिवाजी महाराजांना त्या मुलखातून पिटाळण्यासाठी खवास खानाबरोबर लहान फौज पाठवली. ऑक्टोबर मध्ये त्यांच्यात चकमक झाली. त्यात विजापूरकरांनी जोरदार लढा दिला व सिद्धीसर्वार शाह हजरत शेख मिरान आणि काही उच्च अधिकारी ठार झाले. तरीही खवासखणाने जोरदार युद्ध केले आणि नेताजींच्या घोडदळावर चालून गेले. त्यांच्याकडे छोट्या बंदुका होत्या त्यामुळे महाराजांनी तिथून माघार घेतली.
बाजी घोरपडे शिवाजी राजांनी जिंकलेल्या कोकणातील भागावर आदिलशहाची मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. शिवाजी राजांना घालवून देण्यासाठी खास खान कुडाळच्या दिशेने कुछ करत असताना घोरपडे विजापूर राहून दीड हजाराचे घोडदळ घेऊन खाण्याच्या मदतीला निघाला. शिवाजी राजेंनी अचानक मुधळ वर हल्ला चढवला. त्यामुळे बाजी घोरपडे ला आपल्या जहागिरीच्या बचावासाठी तिकडे धाव घ्यावी लागली. या लढाईत तो मारला गेला व त्याचे बाराशे घोडे मराठ्यांच्या ताब्यात आले आणि मराठ्यांनी मुधोळही काबीज केले. ऑक्टोबर अखेरच्या या लढाईत घोरपडे कुळाचा संहार झाला असेही म्हटले जाते.
मुधोळवरील विजयानंतर शिवाजी राजे कुडाळ जवळ आले असता लखम सावंत आणि खवासखनाला कुडाळ मधून सैन्य कमी असल्यामुळे पळून जाण्याचा सल्ला दिला. खवास खान बांद्याला गेला. 26 ऑक्टोबर रोजी खवासखानाच्या घोडदळाला अचानक गाठून नेताजीला बांधलेला पाठवले. परंतु खवासखान बालाघाटातील चंदगडला पळून गेला. शिवाजी राजांनी आता सावंतवाडी कडे कुच केले. तिथे आदिलशहाची निष्ठा बाळगणारे काही जहागीरदार होते- कुडाळचा देसाई लखम सावंत तसेच केशव नायक आणि केशव प्रभू अनुक्रमे पेर्नम आणि बिचोलीम च्या जहागिरीवर होते. हे सारे गोव्यात आश्रयाला गेले आणि आपापल्या फौजा उभ्या करून पोर्तुगीजांच्या हद्दीतून शिवाजी राजेंच्या सुभेदारांवर वारंवार हल्ले करीत असत. लखम सावंत चा भाऊ कृष्णा सावंत मात्र शिवाजी राजेंना जाऊन मिळाला आणि राजांनी त्याला कुडाळच्या प्रमुख पदी नेमले. त्यानंतर राजांनी वेंगुर्लेची लूट केली. तिथे डचांची प्रचंड संपत्ती होती हे राजांना समजले होते. तिथून त्यांनी हुबळी लुटण्यासाठी 300 घोडेस्वार पाठवले व त्यांनी त्यांचे काम चोखपणे केले.
आठ फेब्रुवारी सोळाशे 65 रोजी शिवाजी राजांनी मालवण सोडले व 85 लढाऊ गलबते आणि तीन मोठी जहाजे घेऊन ते गोव्यावरून बसनूरला गेले. बेदनुर राज्याचे हे मुख्य बंदर होते. तिथे त्यांनी भरपूर लूट केली. परतीच्या प्रवासात गोकर्ण महाबळेश्वर दर्शन घेऊन चार हजार घोडदळासह राजे अंकोल्याकडे गेले. मार्गातील नद्यांची पात्रे ओलांडण्यासाठी महाराजांनी 12 जहाजे स्वतःकडे ठेवून घेतली होती. इंग्रजांनी आपला माल एका शंभर टन वजनाच्या जहाजात नेऊन ठेवला व तेही पैसा घेऊन जहाजावरच गेले. शेर खान त्याच रात्री गावात आला होता. त्याने शिवाजी राजांना दूताकरवी निरोप पाठवला की राजांनी गावात प्रवेश करू नये अन्यथा तो प्रतिकार करेल. तो पराक्रमी होता त्यामुळे शिवाजीराजांनी कला नदीच्या मुखाजवळ सैन्याचा तळ ठोकला. शेर खानाकडे दूध पाठवून इंग्रजा व्यापाऱ्यांना त्यांच्या ताब्यात द्यावे असे कळवले. गावाच्या सुभेदाराने व्यापाऱ्यांचे मन वळवले आणि शिवाजी राजांना नजराना पाठवला. शिवाजी राजे 23 फेब्रुवारी रोजी तिथून निघून गेले आणि 14 मार्चला भीम गडला पोहोचले. तिथून ते लवकरच जयसिंगान पुरंदरला वेडा घातला असल्यामुळे आपल्या मुलखाच्या रक्षणासाठी निघून गेले.
पुरंदरचा तह 12 जून १६६५ रोजी झाला आणि मुघलांनी शिवाजी राजांना आदिलशहाचा कोकणातील मुलुख जिंकून घेण्यास मोकळे सोडले. बहलोल खानाच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या वारसांमध्ये वाद सुरू झाले. शेर खानाने सर्वांना शांत केले परंतु त्याचा विष प्रयोगाने खून केला. इकडे शिवाजी राजे जयसिंग बरोबर लढाईत अडकल्याचे पाहून मोहम्मद इखलास खान याने दाभोळ व दक्षिण कोकणातील इतरही अनेक ठिकाणी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. आता जयसिंगने विजापूरच्या स्वारीला प्रारंभ केला होता. त्यामुळे इथ्लास खानाला कुडाळवरून घाई घाईने निघावे लागले. परंतु शिवाजीराजांनी पुढच्या नोव्हेंबर पर्यंत इखलास चे 2000 कापून काढून राजापूर व खारेपाटणचा तो सर्व प्रदेश परत जिंकून घेतला. परंतु कुडाळ व वेंगुर्ला विजापूरच्या हातीच राहिली होती.
16 जानेवारी 1666 रोजी शिवाजी राजे पन्हाळ्यावर चालून गेले होते परंतु ती स्वारी त्यावेळी अपयशी ठरली होती. त्यानंतर ते प्रतापगडावर गेले आणि तिथून त्यांनी कोंड्याला वेढा घालण्यासाठी आपल्या दोन हजार लोकांना मुघलसेनाधिकाऱ्यासोबत पाठवले. विजापूरच्या सुलतानाने सिद्धी मसूद अब्दुल अजीज आणि रुस्तम जमान यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळ्याला पाच हजारांचे घोडदळ आणि एक हजार पायदळ पाठवले व गुप्तपणे अचानक हल्ला करण्याची योजना आखली. शिवाजी राजे तेव्हा कोकणात एका टेकडीच्या माथ्यावर होते. रुस्तमैजमाने नव्हती वाजवल्या व शिवाजी राजांना निष्डून जाण्याचा इशारा दिला. परंतु मसुदने सहाशे निवडक घोडदळासह मराठ्यांचा पाठलाग करून 200 जणांना ठार केले. शिवाजी राजांनी रुस्तमला नेतृत्वाने लिहिलेला खलिता मसुदने पकडला आणि विजापूरला पाठवून दिला. त्यावर आदिलशहाने कळवले की त्याला फोंड्याचा वेढा उठवावा लागेल अन्यथा साखरेतून बडतर्फ केलं जाईल. त्यानंतर रुस्तम ने वेढा उठवण्यासाठी त्याच्या हस्तकाला कळवलं. तथापि सैनिक नमाजला गेलेले पाहून मोहम्मद खानाने अचानक हल्ला करून मराठ्यांचा पराभव केला व वेढा उठवला गेला. त्यामुळे शिवाजी महाराज व रुस्तम हे जमान यांच्यातील दीर्घ काळापासून ची मैत्री तुटली. आता रुस्तम ने फोंडा कुडाळ बांधा संख्येलीन बिचोली ही पाच गावे शिवाजी राजांकडून जिंकून घेतली.
दिलीप गायकवाड.
१७-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...