समशेरबहाद्दर वीर कोयाजीराव बांदल , हिरडस मावळ , प्रांत भोर --
लेखन व छायाचित्र :अमित सुधीर राणे
आपण आपल कायम प्रामाणिकपणाने करत राहायचं.
आपल्या
कडून अजून एक मराठ्यांच्या इतिहासाच्या संबंधित असणाऱ्या तैलचीत्राचं
अनावरण मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते समशेरबहाद्दर
वीर कोयाजीराव बांदल समाधी स्थळ येथे झालं काल दिनांक २१ एप्रिल , २०२४
संध्याकाळी हिरडस मावळ , भोर प्रांत मधे . संपूर्ण बांदल सरकार व त्यांच्या
येणाऱ्या पिढीला हे मराठ्यांच्या इतिहासातल एक सोनेरी पान महत्त्वाचा विषय
ठरत आलेलं आहे.
पुण्यातील लाल
महालात विळखा घालून बसलेल्या शाहिस्तेखानावर सर्जीकल स्ट्राईक करण्याची
योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी आखला व त्याचे तीन बोटे तोडून ससैन्य
पुण्यातुन पळवून लावले.शाहिस्तेखानावर छापा कुठल्या दिवशी घातला पाहिजे हे
पण राज्यांनी अभ्यासले होते. रविवार ५ एप्रिल , १६६३ ची उत्तररात्र म्हणजे ६
एप्रिल ची पहाट. त्या वेळेला ६ एप्रिल ला रामनवमी होती आणि उन्हाळा सुरू
झालेला. खास करून मराठ्यांना फायदा असा की मुसलमानांचा हा रमजानाचा महिना ,
आणि त्या दिवशीचा चंद्र म्हणजे सहाव्या रात्रीचा चंद्र. ह्या महिन्यात
मुसलमानांचे राजे उपवास धरतात , दिवसभर काही खात नाही आणि रात्री मात्र
खायला-प्यायला पूर्णपणे पोटभरून खातात आणि त्यांचे खाणे म्हणजे जडच आणि
ह्यामुळे रात्री गाढ झोप येणं साहजिकच आहे.
शाहिस्तेखानावरचा
छापा हा कोण्या बेसावध सेनापतीवर केलेला खुनी हल्ला नाही, हा एक अचानक
केलेल्या युद्धाचाच डाव आहे जो छत्रपति शिवाजी महाराजांनी आखलेला.छत्रपति
शिवाजी महाराजांनी आपल्या शंभर दोनशे सैनिकांनिशी तासाभरात केलेल्या
कारवाईने असा परिणाम झाला की खान तिसऱ्या दिवशी औरंगाबादला रवाना झाला.
मराठा
सैन्यात समशेरबहाद्दर वीर कोयाजीराव बांदल हे हिंदूस्थानातील पहिल्या
यशस्वी सर्जीकल स्ट्राईकच्या मराठ्यांच्या सेनेचे सदस्य होते व येत्या
काळात पण राहतील . या सर्जीकल स्ट्राईकचे नेतृत्व स्वतः छत्रपती शिवाजी
महाराजांनी केले होते. या सर्जीकल स्ट्रायीकचे वेळी महाराजांचे सहा मावळे
ठार झाले होते व चाळीस जखमी झाले होते. जखमी झालेल्यात कोयाजी राव बांदल हे
खूप जख्मी झाले होते व कांहीं दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्या बद्दल
महाराजांनी मौजे आलंदे तर्फ हिरडस मावळ येथे जमीन इनाम देऊन समशेरबहाद्दर
वीर कोयाजीराव बांदलांचा गौरव केला.
श्री राजा शिव छत्रपति जयते
श्री समशेरबहाद्दर वीर कोयाजीराव बांदल जयते
--- अमित सुधीर राणे
No comments:
Post a Comment