लेखन जीवन कवाडे
ता उमरी जिल्हा नांदेड
साडेछत्तीस गावाची देशमुखी असलेल्या श्रिमंत इंगळे देशमुखांचा हा वाडा. आमचे भाचे जावई तांदूळवाडी जिल्हा परभणी चे विशालराव देशमुखांच्या मावशीचा चा वाडा.
मी आजपर्यंत पाहिलेल्या वाड्या पैकी सर्वोत्तम वाडा . या वाड्यास भुईकोट किल्ला म्हटले तरी चालेल कारण या वाड्याचे क्षेत्रफळ नऊ एकर सात गुंट्टे आहे. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी ज्या कांहीं तरतुदी केलेल्या असतात त्या त्या सर्व सुरक्षा यंत्रणा या वाड्यात केलेल्या आहेत.जसे की दुहेरी तटबंदी , तळघरे , संकटकाळी बाहेर पडण्यासाठी गुप्त रस्ता, जलव्यवस्थापन, न्याय व्यवस्थेसाठी सदर, शत्रूंवर मारा करण्यासाठी बुरूज आणि तटबंदीत विविध आकाराच्या आणि अनेक दीशेस असणाऱ्या जंग्या, नगारखाना आणि वाड्यात दोन मजली नांदता वाडा. नांदता वाडा म्हणण्याचे कारण म्हणजे तीनशे वर्षांपेक्षा जास्त जून्या वाड्यात आजही वाड्यात भला मोठा देशमुख परीवार नांदत आहे. काळाच्या ओघात बाहेरील तटबंदी पडली असून आतील मुख्य तटबंदी सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत आहे. जितका वाडा मोठा तिथले देशमुख ही खूप मोठ्या मनाचे आहेत. आम्ही वाडा पाहण्यासाठी गेल्यावर श्री मोहनराव देशमुख व कीरतसिंह देशमुख बंधुनी संपूर्ण वाडा दाखवून सखोल माहिती दिली. हा भाग मराठवाडा आणि तेलंगणा च्या सिमावर्ती भागात असून या भागावर जास्तीतजास्त हैद्राबादच्या निजामाचा अमल राहिला आहे. या वाड्यात पावसाच्या पाण्याचे निस्सारन होण्यासाठी उत्तम व्यवस्था केलेली आहे.
प्रा रविकांत देशमुख यांनी तळेगावच्या देशमुख इतिहासावर शोध नीबंध लिहिला आहे असे समजले.
श्री मोहनराव देशमुख तळेगाव
श्री किरतसिंह देशमुख तळेगाव आणि
श्री विशालराव देशमुख तांदूळवाडी यांचे विशेष आभार.
धन्यवाद.
No comments:
Post a Comment