विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 5 April 2024

चौगुला चौगुले आडनाव नाही शिवकालीन पदवी

 


चौगुला
चौगुले आडनाव नाही शिवकालीन पदवी .
छत्रपती शिवाजी महाराज च्या राजव्यवहार कोशात त्यांना" ग्रामणी " असे म्हटले आहे . मुळ शब्द " चौकुला " म्हणजे चार कुळ बाळगणारा असा होते. चौगुले गावकीच्या काळातील पाटील चा साहाय्यक पाटलांचे अधिकृत प्रवक्ता ..सारावसुलीच्या कामात पाटलाला भरपुर साहाय्य करणार चौगुले होय. एखादा आदिलशाही व मघुलकडुन हल्ला नंतर परागंदा झालेल्या रयतेचा गावात परत आणण्याची कामगिरी व जबाबदारी चौगुले कडे असे.गोतसभेत त्यांना पाटलाला नंतरचे स्थान होते. शिवकालीन काही पत्रात देश चौगुला असे शब्द येते .चौगुले हे परगण्याचा अधिकारी. देश चौगुल्याला गावात मोठा मानचा असे.याचे निशाणी नांगर व "काठी" देखील आहे. यावरून जमिनीच्या क्षेत्रमापनाशीही त्याचा संबंध आहे . गावचा वसूल परगण्याच्या मुख्य कचेरीच्या पोत्यात अथवा खजिन्यात नेऊन भरण्याची जबाबदार चौगुले करीत असे .गावची कोठारे , अथवा खाजगी गुदामे, धान्याचे पेव यांची व्यवस्था ठेवण्याची कामही यांना करावे लागे .चौगुलेचा उल्लेख व इनामदार बद्दल .
जोहार मायबाप ऐका वचन! !
माणकोजी पाटलाने पाठविले हो न !!
मग चौगुल्यापाशी देऊन! !
जगज्जीवन परतले !!
चौगुले काय बोलती वचनं! तुम्ही महाराहाते पाठविले हो न !!
ते आम्ही सत्वरी घेऊन!!
पोते पाठविले राजव्दारी (राजे शिवरायाच्या स्वराज्यात असे उल्लेख समजवे )
गिरवीतील कदम घराण्यात गव
गावाचे पाटीलकी सोबत चौगुलापण या घराण्यात होते ़
चौगुले सामान्यत मराठा समाज तील असते पण छत्रपती शिवाजी राजे यांना एखाद्या व्यक्ती चे योग्यता .नेतृत्व व स्वराज्यावरील निष्ठा पाहुन काही ठिकाणी ब्राह्मण चौगुले (दाभोळ. हर्णे या भागातील ) शिंपी चौगुले, लिगायंत चौगुले., जैन चौगुले , माळी चौगुले , मुसलमान चौगुले(कोकणात ) पाथरूवट चौगुले (वडार समाज ) आढळतात.
तसेच गावातील वादविवाद, याचा हस्तक्षेप करावा लागत
तसेच जमीन खरीद व्रिकी, न्यायनिवाडा, सरकारी अधिकारी म्हणून महत्वाचे स्थान चौगुला यास होते जो हिंदवी स्वराज्याचा निर्माता पासुन आहे
शिवकालीन कगदापत्रात चौगुले चा उल्लेख " चौगुला " असे आहे याचा नोंदी घ्या .चौगुले हे वतनदार पैकी शिवपुर्वी कालखंडात होते . 96 कुलतील 4था व चार कुंलचा मानकरी चौगुले हे आहेत सदर आडनाव नाही तर मानचा पदवी आहे व स्वराज्यातीद निष्ठावंत घटक . म्हणजे चौगुले हे आडनाव व लोक ....
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य .
जय शहाजी राजे जय जिजाऊ .
सेवाशी ठाई व शब्दके न= संतोष झिपरे 9049760888
सदर लेख बदल आणखी माहिती आपणाकडे असेलतर मार्गदर्शन करावेत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...