विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

सरसेनापती संताजी घोरपडे यांस सेनापतिपद

 


सरसेनापती संताजी घोरपडे यांस सेनापतिपद
लेखन :शेखर शिंदे
संताजींचे वंशज (मुलाचा मुलगा) राणोजी यांस २५-६-१७३१ मध्ये शभू छत्रपती ( कोल्हापूर ) यांनी सरंजाम दिला.त्या प्रसगानें लिहिलेल्या हकीकतीत हा उतारा आहे. यावरून संताजींनी बादशाहाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले हे दिसते.
-------------------------------------------

.श्री.
सन १०९८ फसली. श्रीमन्महाराज शंभु छत्रपती यादी 'श्रीमन्महाराज शंभुछत्रपति' यांची स्वारी संगमेश्वर मुकामी होती ते समयीं अवरंगजेब पादशहा याची फौज शके १६१० विभवनामसंवत्सरे ज्येष्ठ शुद्ध १० रोज मंदवासरी येऊन लढाई जहाली.त्या लढाईत म्हालोजी घोरपडे फौज सुद्धा लढून ठार झाले.त्यास पुत्र तीन

१ संताजी घोरपडे वडील पुत्र १बहीरजी घोरपडे दुसरे पुत्र १मालोजी घोरपडे तिसरे पुत्र एकूण ३

या तीन आसामींनी व विठोजी चव्हाण यांणी फौज सुद्धा तुळापूर मुक्कामी अवरंगजेब पादशाहाचे लश्करावर छापा घालून पादशहाच्या डऱ्याचे सोन्याचे कळस आणून श्रीमन्महाराज राजेसाहेब विशाळगड मुक्कामी होते त्यांच्यापुढे ठेविले,ते समयीं महाराजांची मर्जी संतोष होऊन चौघांचा सन्मान करून व वस्त्र, भूषणे,जवाहीर देऊन संताजी घोरपडे यास #ममलकतमदार हा किताब दिला.बहीरजी घोरपडे यास #हिंदूराव म्हणून किताब दिला ; व मालोजी घोरपडे यास #अमिरुल उमराव म्हणून किताब दिला व विठोजी चव्हाण यास #हिम्मतबहाद्दर हा किताब दिला.नंतर विशाळगड मुक्कामी रामचंद्र पंडित आमात्य यांणी महाराजांच्या सेवेशी विनंति करून संताजी घोरपडे यास सेनापतिपद देविले.
-------------------------------------------
#History makers marathe
#इतिहासकर्ते मरहट्टे
#सरसेनापती
संदर्भ-महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास,पृ.क्र७६


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...