मराठ्यांच्या रणनीतीमधे छत्रपति संभाजी राजांनी युद्धक्षेत्रातील कामगिरी एका जाणकार अभ्यासक ले. कर्नल अभ्यंकर ह्यांनी केले. ते म्हणतात केवळ नऊ वर्षांच्या अल्पकाळात संभाजी महाराजांनी ज्या चौफेर मोहीमा हाती घेतल्या त्यांचे लष्करी दृष्ट्या मूल्यमापन केल्यास "एक रणझुंजार युद्धनेता" हीच त्यांची उज्जवल प्रतिमा आपल्या पुढे उभी राहते.
संभाजी महाराजांच्या चरित्राचे युद्धशास्त्रीय दृष्ट्या पुढील प्रमाणे -
१) आपल्या उद्दीष्टांचा सातत्याने पाठपुरावा आणि आक्रमक पवित्रा ही युद्धशास्त्राची दोन महत्वाची तत्वे संभाजी राजांनी कधीही दृष्टीआड करू दिली नाहीत.
२) युद्धपद्धतीच्या दृष्टीने पाहता गोव्याच्या लढाईची हाताळणी करण्यात संभाजी राजे कुशल होते
३) सैनिकांचे मनोबल वाढविण्यास त्यांच्यात इच्छा निर्माण करणे हे सेनानायकांचे कर्तव्य आहे, याचा विसर संभाजी राजांनी पडू दिला नाही.
४) खच्चीकरणाच्या ( गनिमीकावा) युद्धनीतीची सर्व तत्वे प्रत्यक्षात उतरवून मोगली सेनेविरुद्ध यशस्वी कारवाई होऊ शकते , हे संभाजी राजांनी सिद्ध केले.
५) सन १६८० ते १६८५ लगातार मोगल , सिद्दी व पोर्तुगीज यांच्याविरुद्ध मध्य महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र , कोकणपट्टी व गोवा या प्रदेशांत आक्रमक व बचावात्मक अशी दुहेरी लढत देऊन या सर्व सत्तांना संभाजी महाराजांनी हैराण केले , ही बाब युद्धशास्त्रीय दृष्टीने कौतुकास्पद ठरते.
श्री छत्रपति शंभु राज्याभिषेक सोहळा
२०२४ , राजधानी रायगड
( सगळ्यांनी आवडीने यावे )
No comments:
Post a Comment