विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 April 2024

औरंगाबादवर छत्रपति संभाजी महाराजांचे न थांबणारे हल्ले आणि औरंगाबादवर संभाजी महाराजांचा ताबा .

 


औरंगाबादवर छत्रपति संभाजी महाराजांचे न थांबणारे हल्ले आणि औरंगाबादवर संभाजी महाराजांचा ताबा . म्हणून " छत्रपति संभाजी महाराज नगर " हेच नाव तिकडे शोभत आणि शेवट पर्यंत तेच राहणार. ह्याच कारण आणि हक्कीकात पुढील प्रमाणे -

इ. स १६८१ , एप्रिल आणि मे महिन्यात मराठ्यांची एक मोठी तुकडी थेट औरंगाबादवर चालून गेली. औरंगाबाद हे दख्खनच्या सुभ्याची राजधानी मानली जायची . प्रत्येक्ष आलमगीर बादशहाच्या नावाने वसलेलं हे शहर. पण इथं मराठ्यांनी मोठी लूट केली आहे. औरंगजेबाचा सरदार बहादूरखान ज्याने इकडे सोळा कोसांवर बाबूळगाव येथील तळ ठोकलं व्हतं , तोच औरंगाबादवर जायला निघालेला. तो पोहोचण्या आधीच मराठे तिकडे पोहोचले होते. औरंगाबाद ( छत्रपती संभाजी महाराज नगर ) हे मराठ्यांच्या धास्तीन अवघ शहर भयभीत झालंय हे बहादूरखानास कळून आलं .

ह्या प्रसंगाचे वर्णन भीमसेन सक्सेना तारिखे दिल्खुशा ह्यात नोंदवतो - " मी माध्यान्हाच्या सुमारास औरंगाबादेत दाखल झालो त्यावेळी तिथे जे दृश्य दिसले ते विलक्षण होते. लोकांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद केले होते. आपल्या वाड्यात ते दडून बसले होते . बाजारात आणि गल्ल्या-गल्ल्यातून एकही मनुष्य दिसत नव्हता. कोतवालीच्या ओट्यावर मला फक्त तीन शिपाई बसलेले आढळले."

आलमगीर औरंगजेब या हल्ल्याच्या बातमीने सुन्न झाला . मराठ्यांच्या आक्रमणापासून या शाही राजधानीच रक्षण करण्यासाठी शहाराभोवती तट बांधण्याची आज्ञा दिली. शहजादा अकबराने औरंगजेबाला पाठवलेल्या एका पत्रात या हल्ल्याचा उल्लेख करताना लिहिलं की , " औरंगाबाद शहर हे आपल्याच नावाने वासविण्यात आले , पण शत्रूच्या सैन्याच्या आघाताने ते पाऱ्यासारखे अस्थिर झालेले आहे."

ह्या पत्रावरून एक कळून येत की
या हल्ल्याचा अंदाजा जर घेतला तर ही औरंगाबाद जी राजधानी बादशाह मानीत होता ती आता सरळ सरळ मराठ्यांच्या ताब्यात आली आहे म्हणून आता औरंगाबाद हे शहर आता आणि भविष्यात " छत्रपति संभाजी महाराज नगर " म्हणूच ओळखलं जाणार.

श्री राजा शंभु छत्रपति जयते
- अमित सुधीर राणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...