---------------------------
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि पुढील वाटचाल -
शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने बुद्धीचातुर्याने धैर्याने आणि मुत्सध्ये गिरीने सर्व शत्रूंना नामोहरम केलेले होते आणि आपले स्वराज्य उभे केले होते. तरीही तेव्हाच्या प्रथेनुसार त्यांना अभिषेक राजे नसल्याचे तोटे जाणवत होते -
१) सर्व शत्रूंच्या नजरेत ते फक्त एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा होते त्यामुळे ते फक्त एक जमीनदार होते.
३) राजाच्या वचनाचे पावित्र्य त्यांच्या शब्दांना नव्हते.
४) ते कोणत्याही तहावर सही करू शकत नव्हते अगर हमी देऊ शकत नव्हते.
५) त्यांनी जिंकलेल्या प्रदेशाची सीमा ही त्यांची कायदेशीर मालमत्ता होऊ शकत नव्हती.
६) शिवाजी महाराजांची प्रजा राज द्रोहाच्या आरोपातून मुक्त होऊ शकत नव्हती.
७) बाकीचे जमीनदार जागीरदार त्यांना फक्त एक बंडखोर आणि लुटारू म्हणून तुच्छ समजत होते.
वरील कारणांमुळे आणि मिळालेल्या उसंतीमुळे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यात एक अडथळा होता तो म्हणजे राज्याभिषेक फक्त क्षत्रिय जातीच्या सदस्यालाच करून घेता येत होता. शिवाजी महाराजांचे पणजोबा तर शेतकरी होते आणि लोक अजून ते विसरले नव्हते. त्यामुळे अधिकृतपणे अधिकारवाणी असलेल्या व्यक्तीने त्यांना क्षत्रिय म्हणून जाहीर करणे आवश्यक होते. मगच त्या भागातील ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिले असते.
काशीविश्वेश्वर स्थित गागाभट्ट संस्कृतचे मोठे विद्वान धर्मशास्त्रज्ञ आणि हयात पंडितांमधील सुरेश वादविवाद पटू होते. त्यांचे चार वेद सहा शास्त्रे व सर्व धर्मग्रंथांवर प्रभुत्व होते त्यामुळे त्यांना ब्रह्मदेव आणि व्यास म्हणून ओळखले जात होते. त्यांनी राजांची विनंती मान्य करून शिवाजी महाराज शुद्ध क्षत्रिय वंशातील असल्याचे जाहीर केले. उदयपूरच्या महाराणांच्या अखंड वंशावळीतील हा वारस असून पौराणिक काळातील नायक प्रभू रामचंद्रांच्या सूर्यवंशी यांच्या प्रतिनिधी पैकी एक आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांना मुख्य पुरोहित म्हणून छान ग्रहण करण्याचे आमंत्रण दिले. ते त्यांनी मान्य केले. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सेना अधिकाऱ्यांनी कित्येक मैल पुढे जाऊन त्यांच्या आगमनाच्या मार्गावर त्यांचे स्वागत केले.
स्वतंत्र सार्वभौम राज्याच्या राज्याभिषेकासाठी नेमके कोणते समारंभ आणि साधनसामुग्री लागते याविषयीची माहिती कोणाला नव्हती. त्यासाठी संस्कृत महाकाव्यांच्या आणि राजकीय ग्रंथांचा पंडितांच्या समुदायाने अभ्यास केला व प्राचीन समारंभ शोधून काढून उदयपूर आणि अंबर येथील राज्याभिषेकाच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी लोकांना पाठवले. भारताच्या प्रत्येक भागातील विद्वान ब्राह्मणांना आमंत्रणे पाठवली. 11000 ब्राह्मण आपल्या कुटुंबीयांसह रायगडावर आले. त्या सर्वांना चार महिने मिष्टान्न भोजन दिले. आंध्रचा राजा श्री सातकर्णी याच्या राज्याभिषेकानंतर पंधराशे वर्षानंतर असा सोहळा इकडे होत होता.
शिवाजी महाराज 12 मे 74 रोजी चिपळूण ला परशुराम मंदिरात पूजा करून राजगडावर परत आले. चारच दिवसांनी ते भवानी मातेच्या पूजेसाठी प्रतापगडावर गेले. त्यांनी मूर्तीला सव्वा मन शुद्ध सोन्याचं छत्र अर्पण केलं तसेच अनेक महागड्या वस्तू ही अर्पण केल्या. 21 तारखेला दुपारी ते राजगडावर परतले आणि बाळंभट्ट या भोसले कुळाच्या पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली महादेव, भवानी आणि स्थानिक देव - देवतांच्या पूजा केल्या. 28 मे रोजी त्यांच्या पूर्वजांनी व त्यांनी क्षत्रियांच्या रीतीरीवाजाच पालन न केल्याबद्दल प्रशिक्षित घेतलं. त्यानंतर गागाभट्ट यांनी उपनयन संस्काराद्वारे शुद्ध क्षत्रिय जातींप्रमाणे द्विज जातींसारखं जाणव घालायला दिलं. त्यानंतर दोन दिवसांनी दोन बरोबर क्षत्रिय पद्धतीने आणि द्विज जातीच्या हक्काप्रमाणे मंत्र पठण करून त्यांनी पुन्हा एकदा विवाह केला.
राजांना वैदिक मंत्र शिकवून क्षत्रिय जातीची दीक्षा देणं ही पुढची पायरी होती. शिवाजी राजांनी सर्व वैदिक मंत्र त्यांना ऐकू येतील अशा प्रकारे म्हटले जावेत अशी मागणी केली. कारण आता त्यांना मान्यताप्राप्त क्षत्रिय म्हणून वेदमंत्रांचा ब्राह्मणांसमवेत वापर करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. यावर ब्राह्मणांनी आक्षेप घेऊन आधुनिक युगात कोणीही खरा क्षत्रिय नाही आणि ब्राह्मणच फक्त द्विज जात आहे असे म्हटल्यामुळे गागाभट्ट ही गांगर्ले आणि त्यांनी स्पष्टपणे वैदिक मंत्र वगळले व राजांना फक्त द्विजाच्या जीवनाच्या सुधारित स्वरूपाची दीक्षा दिली. इथे शिवाजी राजेंना ब्राह्मणांच्या बरोबरीचे स्थान दिले नाही.
हे शुद्धीकरण आणि जानवे प्रदान करण्याचा कार्यक्रम समारंभ पूर्वक पार पाडले. यावेळी ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात दान दक्षिणा दिली. त्यात गागाभट्टांना 7000 होन आणि इतर सर्व सामान्य ब्राह्मणांना 17000 होन वाटले.
दुसऱ्या दिवशी शिवाजी राजांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात जाणीवपूर्वक अवर न कळत घडलेल्या बापांच्या शालनासाठी प्रसिद्ध घेतले. त्यांची सोने चांदी तांबे जस्त कठीण शिसे आणि लोह या धातूंनी तुला करण्यात आली. त्याचबरोबर अतिशय तलम ताग कापूर मीठ खिळे जायफळ आणि इतर मसाल्याचे पदार्थ लोणी साखर फळ आणि सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ ज्यात खाऊची पाने आणि देशी दारू यांचाही समावेश होता यांची तुला करण्यात आली. हे सर्व साहित्य आणि एक लाख फोन राज्याभिषेकानंतर जमलेल्या ब्राह्मणांना वाटले.
दोन लोभी ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना सुचित केले की त्यांच्या धाडींच्या दरम्यान त्यांनी शहर जाळली, त्यात ब्राह्मण गाई स्त्रिया आणि मुलं यांचाही मृत्यू झाला होता. या पापा पासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी कोकणातील आणि देशावरील ब्राह्मणांना आणखी दान दिले तर यामुळे बापाचं शालन होईल; म्हणून आठ हजार रुपयांची मागणी केली आणि शिवाजी राजे ती नाकारू शकले नाहीत.
शिवाजी राजेंचा राज्याभिषेक-
5 जून 1674 रोजी आत्मनिग्रह विधीसाठी शिवाजी राजांना गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान घातले. त्यानंतर त्यांनी गागाभट्टांना 5000 होन आणि इतर ब्राह्मणांना प्रत्येकी 100 सुवर्ण मुद्रा दिल्या.
दुसऱ्या दिवशी राजेंनी पहाटे भल्या पहाटे स्नान करून देवतांचे पूजन केले आणि कुलपोरोहित बाळंभट गागाभट्ट आणि इतर विद्वान ब्राह्मणांची पाद्य पूजा या सर्वांना धाक दागिने व कपडे भेट दिले.
पांढरा शुभ्र पोशाख गळ्यात फुलांच्या माळा सोन्याचे दागिने घालून राजे अभिषेकासाठी सुवर्ण चौथर्यावर बसले. पट्टराणी सोयराबाई त्यांच्या डाव्या बाजूला बसल्या. त्यांच्या साडीच्या पदराची गाठ राजांच्या शैलाशी बांधण्यात आली. महाराजांचे वारस संभाजी राजे त्यांच्या जवळ मागच्या बाजूला बसले होते. त्यांचे अष्टप्रधान मंडळ आठ ठिकाणी हातामध्ये सुवर्णकलश घेऊन उभे होते. ते कलश गंगाजलन आणि सप्तसिंधूंच्या पवित्र जलाने भरलेले होते. त्यांनी राजे व महाराणी आणि भावी युवराजाला त्या जलाने अभिषेक केला. सोन्याच्या ताम्हणात प्रत्येकी पाच सुवर्ण दिवे घेतलेल्या ब्राह्मण स्त्रियांनी राजांना ओवाळले.
नंतर राजांनी शेंदरी रंगाचा राजेशाही पोशाख घातला तसेच चमकदार जडजवाहिराचे दागिने आणि सुवर्ण अलंकार घातले होते. गळ्यात कंठा व फुलांची माळ ही घातली होती. डोक्यावरच्या मंदिलाला मोत्यांच्या माळा व झुबक्यांनी सजवले होते. त्यांनी तलवार व ढालीची आणि धनुष्यबाणांची पूजा केली. राजेंनी ज्येष्ठ व ब्राह्मणांना वाकून नमस्कार केला आणि ज्योतिषांनी काढलेल्या मंगल मुहूर्तावर सिंहासनाच्या कक्षात प्रवेश केला.
राज्याभिषेकाचा कक्ष 32 शुभचिन्हे रेखाटून तसेच विविध पवित्र शुभ्र वृक्षांच्या चित्रांनी सजविलेला होता. वरच्या बाजूला सोन्याने मडविलेले छत लावले होते व मोत्यांच्या माळांनि ते कलात्मक पणे सजवले होते. जमिनीवर मखमली गालीचे अंथरून मध्यभागी भव्य 32 मण सोन्याचे सिंहासन ठेवले होते. ते अतिशय वैभवशाली आणि दिमाखदार होते. त्याचा तळ सोन्याने मढविलेला आणि आठ कोनांमध्ये आठ स्तंभ उभारण्यात आलेले होते. त्यांना रत्ने आणि हिरे जडवण्यात आले होते. वर सुंदर नक्षी काम केलेले, मोत्यांच्या माळा आणि झुबके सोडलेले सोन्याचे छत होते. सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सोन्याचे त्रिशूल उभे केले होते व त्यावर राजे चिन्ह लटकवली होती. उजव्या बाजूला अतिशय मोठे दात असलेली देव माशांची दोन भव्य मस्तक आणि डाव्या बाजूला कित्येक घोड्यांच्या शेपट्या लटकवल्या होत्या. एका त्रिशूळावर न्यायाचे चिन्ह असलेला समतोल सोन्याचा तराजू टांगला होता. या सर्व बाबी मुघल दरबारा प्रमाणे होत्या.
शिवाजी राजे सिंहासनावर बसल्यानंतर दरबारी मंडळीने त्यांच्यावर रत्नांनी मढवलेल्या लहान सुवर्ण कमळांचा आणि सोन्या चांदीच्या फुलांचा वर्षाव केला. 16 ब्राह्मण सुवासिनींनी त्यांना पंचारतींनी ओवाळले. मंत्रोच्चाराचा आणि आशीर्वाद पर मंत्रघोशाचा ध्वनी व शिवाजी महाराजांचा विजय असो या आरोळ्या, ढोल ताशा आणि सनईचे सूर गगनाला भिडले. शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा झुकून नमस्कार केला. तोफां मधून बार उडवून मानवंदना दिली. त्यानंतर मुख्य पुरोहित गागाभट्ट सिंहासनाकडे गेले आणि त्यांनी मोत्यांचा तुरा असलेला भरजरी सुवर्ण मुकुट राजांच्या मस्तकावर ठेवला व "शिवछत्रपती की जय'' असा घोष केला. त्यानंतर सर्व ब्रह्मवृंदांनी त्यांच्या मस्तकावर आशीर्वादाची वृष्टी केली. राजांनी सर्वांना भरपूर दक्षिणा आणि भेटवस्तू दिल्या. जमलेल्या सर्वसामान्य जनतेला ही भरपूर दक्षिणा आणि भेटवस्तू दिल्या आणि षोडष(१६ प्रकारचे) महादान केले. त्यानंतर अष्टप्रधान यांनी सिंहासनाजवळ जाऊन मुजरा केला व महाराजांनी त्यांना स्वहस्ते मानाचा पोशाख नियुक्तीपत्र आणि उदंड पैसा, घोडे, हत्ती, जडजवाहीर, कापड आणि शस्त्र दिली. आता पर्शियन शीर्षक रद्द करून संस्कृत पदनाम वापरली.
आता युवराज संभाजी राजे मुख्य पुरोहित गागाभट्ट आणि पेशवा मोरो त्रिंबक पिंगळे हे सिंहासनाच्या किंचित खालच्या बाजूला बसले होते इतर मंत्री सिंहासनाच्या दुधात दोन रांगांमध्ये उभे होते. सर्व दरबारी आणि पाहुणे आपापल्या दर्जा नुसार उचित स्थानी उभे होते.
सकाळी आठ वाजता इंग्रज राजदूत हेन्री ऑक्सेंडेंन निराजीपंतांनी महाराजांसमोर सादर केले. इंग्रजांकडून महाराजांना नजराना म्हणून हिऱ्याची अंगठी दिली. शिवाजी महाराजांनी त्याला सिंहासनाच्या पायथ्याजवळ बोलावून मानाचा पोशाख दिला. या कार्यक्रमानंतर महाराज घोड्यावर स्वार झाले आणि जगदीश्वराच्या मंदिरात गेले. तिथे दर्शन घेतल्यानंतर सजवलेल्या हत्तीवर बसले आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. घरोघरच्या सुवासिनींनी त्यांना निरांजनांनी ओवाळून लाह्या फुलं दुर्वा यांचा वर्षाव केला.
सात जून रोजी सर्व राजदूत वकील आणि ब्राह्मणांना भेटवस्तू दिल्या. भिकाऱ्यांना दान दिले. सलग बारा दिवस सर्व नागरिकांना अन्नदान केले आणि सर्वसामान्य लोक प्रिय व मुलांना एक रुपया ते पाच रुपये वाटले. आठ जून रोजी राजेंनी चौथा विवाह क्षत्रिय पद्धती आणि रितीरिवाजांसह केला.
राज्याभिषेक समारंभा नंतर 18 जून रोजी जिजाबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजांना त्यांची 25 लाख होनांची मालमत्ता मिळाली.
शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा -
पहिल्या उपचारीक राज्याभिषेक सोहळ्यानंतर तीन महिन्यांनी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला. निश्चलपुरी गोस्वामी नावाच्या प्रसिद्ध तांत्रिक पुरोहितांना म्हटलं होतं की गागाभट्ट मूर्ख होता त्याने चुकीचा मुहूर्त काढला होता आणि आकाशात अशुभ तारकांची युती असताना त्यांनी राज्याभिषेक पार पाडला. त्याने राजांना फक्त वैदिक देव देवतांची पूजा करायला लावली आणि तंत्रविद्येतील आत्म्यांची आणि शक्तींची पूजा केली नव्हती त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या. राणी काशीबाई, सरनोबत प्रतापराव व राजमाता जिजाबाई यांचा थोड्या कालावधीत मृत्यू झाला. उल्कापात झाला. राजे राज्याभिषेक कक्षातून बाहेर पडल्याबरोबर जागा भट्ट यांच्या नाकावर लाकडाचा तुकडा पडला. बाळंबट्टयाचे मस्त तंभावरच्या लाकडी कमळावर आढळले. शिवाजी महाराज सिंहासनांच्या पायऱ्या चढत असताना कोणीतरी शिंकला. युवराज यांच्या कंठ्यातील दोन मोठी हरवले. पूजेसाठी ठेवलेली तलवार ज्ञानातून खाली पडली. विधी वेळी राजांनी बाण सोडला तेव्हा त्यांच्या हातातून भाता गळून पडला. मंत्री दत्ताजी जमिनीवर अडखळून पडले. त्यानंतर निश्चलने आपला शिष्य मला नागाचेला याला राजाकडे पाठवून अपशकोनांचा अर्थ समजावून सांगितला आणि अष्ट दिशांना राहणाऱ्या अज्ञाना वगळल्यामुळे हे घडलं असे प्रतिपादन केले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करण्यासाठी मान्यता दिली. हा राज्याभिषेक 24 सप्टेंबरला झाला आणि उचित दान दक्षिणा देऊन प्रत्येक दर्जाच्या तांत्रिकाचे समाधान केले. यावेळी तांत्रिक आणि वैदिक अशा दोन्ही प्रकारच्या ब्राह्मण याचकांनी श्रावणातील दान मागण्यासाठी गर्दी केली.
25 सप्टेंबर 1675 रोजी प्रतापगडावरच्या मंदिराला वीज कोसळून आग लागून अनेक महागडे घोडे एक हत्ती भस्मसात झाला होता. त्यामुळे दुष्ट शक्तींना पिटाळून लावण्याचे वैदिक आणि तांत्रिक असे दोन्ही विधी निष्फळ ठरले होते!
या राज्याभिषेकाचा एकूण खर्च एक लाख पन्नास हजार पॅगोडा इतका झाल्याचे डच व्यापारी अब्राहम लिफेबर यांने चार महिन्यांनी म्हटलं होतं. तर सभासद हा खर्च एक कोटी 42 लाख होन झाला होता असे सांगतो. जदुनाथ सरकार यांच्या मते हा एकूण खर्च दहा लाख होन किंवा 50 लाख रुपयाहून जास्त होत नाही.
राज्याभिषेक सोहळ्यामुळे शिवाजी महाराजांच्या खजिन्यावर ताण आला होता. दख्खन मध्ये आता बहादुर खान ही दिलेरखान दिल्ली दरबारात परत गेल्यामुळे दुर्बल बनला होता. जुलैमध्ये मराठ्यांच्या दोन हजार घोडदळांना बहादूर खानावर हल्ला करण्यासाठी पेडगावच्या छावणीवर कुच केले. बहादुर खान त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सरसावला की मराठे पळून जाऊ लागले. नेहमीप्रमाणे बहादूर खान त्यांचा पाठलाग करीत 50 मैल दूर गेला. याचा फायदा उठवून 7000 सैनिकांच्या दुसऱ्या तुकडीने दुसऱ्या मार्गाने येऊन छावणीवर हल्ला चढवला आणि कोट्यावधींची लूट बादशहाला पेश करण्यासाठी आणलेले दोनशे उत्तम घोडे मिळवले. बहादूर खानाचे राहुट्या तंबू जाळून टाकले.
ऑक्टोबर मध्ये उशिरा शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली दख्खनच्या पठाराकडे सैन्याने कुच केले. त्यांनी बहादूर खानाच्या छावणीला वेढा दिला आणि औरंगाबाद जवळच्या कित्येक गावामध्ये लूट केली. तसेच बागलाण व खानदेशात मुसंडी मारली; धरणगाव लुटून बेचिराख केले आणि तिथली इंग्रजांची वखार ही लुटली. दत्ताजींच्या नेतृत्वाखाली 3000 मराठ्यांच्या घोडदळांना 1675 च्या जानेवारीच्या सुमारास कोल्हापूर वर छापा मारून पंधराशेतसेच सोनगाव व र छापा मारून 5 00 फोन असे दोन हजार होन दिले.
फेब्रुवारीच्या मध्यावर मुघल फौज कल्याण वर तुटून पडली आणि त्यांनी लूट व जाळपोळ केली पण लगेच फेब्रुवारीमध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा कल्याण वर ताबा मिळवला.
शिवाजी महाराजांना दक्षिणेत किनारपट्टीवर मोहीम राबवायची होती त्यामुळे त्यांनी बहादूर खानाशी वाटाघाटींचा बनाव रचला.
शिवाजी राजे आपले 17 किल्ले औरंगजेबाला देतील आणि मुघल सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी संभाजी या आपल्या पुत्राला फौजेसह दरबारात पाठवतील. त्या बदल्यात बादशहाने त्यांना सहा हजारी मनसबदार करावं आणि शिवाजीराजांना भीमेच्या उजव्या काठावरचा संपूर्ण प्रदेश द्यावा.
बहादूर खानाने खुश होऊन बादशहाला या अटी कळवल्या आणि बादशहाने उत्तरा दाखल पूर्वीची शिवाजी महाराजांची सर्व दुष्कृत्ये माफ करून त्यांच्या सर्व अटी मान्य केल्याचे शाही फर्मान पाठवून दिले. त्यानंतर सुभेदाराने दुता करवी राजांना फर्मानाचे स्वागत करण्यासाठी जाण्याचा आणि किल्ले सुपूर्द करण्याचा निरोप पाठवला. परंतु तोपर्यंत फोंड्यावर विजय मिळवलेला होता. त्यामुळे महाराजांनी वकिलाला "मी तुमच्याशी तह कशासाठी करावा?" असे विचारून हाकलून दिले. बहादुर खान फटफजिती मुळे शरमला.
अपमानाचा बदला घेण्यासाठी बहादूर खानाने विजापूरचा वजीर खवासखान याच्याशी ऑक्टोबर मध्ये शिवाजी राजांशी संयुक्तपणे युद्ध करण्याचा करार केला. औरंगजेबाने याला मान्यता दिली. आपल्या सुभेदाराला मनापासून सहाय्य केले तर एक वर्षाची खंडणी माफ करण्यात येईल असेही त्याने कळवले. परंतु 11 नोव्हेंबर 1675 रोजी बहलोल खानानं मुख्य प्रधान खवासस्थानाला पदच्युत करून सर्व सत्ता आपल्याकडे घेतली. या सर्व गोंधळामध्ये शिवाजीराजांवर एकत्रित हल्ला करण्याची योजना साफ बारगळली.
शिवाजी महाराजांनी मार्चमध्ये कोल्हापूर जिंकले. दुसरी एक तुकडी पूर्वेकडे जाऊन विजापूर आणि गोवळकोंडा हद्दीत घुसून यादगिरी व हैदराबाद जवळची लूट करून एप्रिलच्या मध्यावर पोर्तुगीज हद्दीतील कुंकू लिम आणि वेरोडा लुटली.
बादशहाने खरडपट्टी काढल्यानंतर बहादूर खानाने नोव्हेंबर मध्ये कल्याण मध्ये शिवाजी राजांना मागे रेटले. जानेवारी 1676 मध्ये मराठा फौज औरंगाबाद जवळ जाताच बहादूर खानाने पेडगाव वरून झपाट्याने जाऊन लातूर जवळ अचानक हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव केला.
यावेळी शिवाजी महाराज आजारी पडले आणि तीन महिने ते अंथरुणावर होते. मार्च अखेरीस ते खडखडीत बरे झाले आणि पन्हाळ्यावर विश्रांतीसाठी गेले. एप्रिल मध्ये मराठ्यांनी अथणी लुटली व दख्खनी आणि अफगाण पक्ष यांच्यातील यादवीचा फायदा उठवला. मे च्या सुरुवातीला 4000 घोडदळ पाठवून विजापूर प्रांतात कोणत्याही अडथळ्याशिवाय लुटा लुट केली. मे मध्येच पेशवे मोरो त्रिंबक यांनी रामनगर च्या राजाला हाकलून पिंडोळ आणि पायनेका जिंकले. तेथील व्यवस्था लावून पावसाळ्यामुळे ते रायगडावर परत गेले.
अफण फौजांनी विजापूर ताब्यात घेतल्यामुळे बहादूर खानाने 31 मे रोजी विजापूरच्या विरोधात मोहीम उघडली. विजापूरचा नवीन अंमलदार बहलोल खानाने शिवाजी राजांशी गोवळकोंडा चा मुख्य सुभेदार मादण्णा याच्या मध्यस्थीने शांततेचा तह केला. परंतु तो अस्थिरतेमुळे टिकला नाही. सन 1677 च्या जानेवारीत त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कर्नाटकच्या स्वारीवर शिवाजी राजे बाहेर पडले.
दिलीप गायकवाड.
१६-०४-२०२४.
No comments:
Post a Comment