-----------------------------
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांचा खजिना रिता झालेला होता म्हणून त्यांना मोहिमेवर जाऊन भरघोस लूट आणणे भागच होते. सुरत तर दोन वेळा लुटली होती, त्याचबरोबर मुघल व आदिलशाही मुलखातील श्रीमंत गावे ही लुटून झालेली होती. त्यामुळे आता संपन्न अशा कर्नाटक पठारावरील मद्रास किनारपट्टी हाच एक प्रदेश शिल्लक होता आणि तो सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात होता. खाणी असलेल्या या भूमीतून समुद्रगुप्त, पश्चिम चालुक्य, मलिक काफूर आणि मिर जुमला यांनी प्रचंड संपत्ती लुटून नेली होती.
हा मुलुख तीन जहागीरदारांमध्ये विभागला गेला होता. त्यातील एक भाग व्यंकोजीराजे यांच्या ताब्यात होता आणि उर्वरित भाग आदिलशहाच्या दोन सरदारांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी या उर्वरित दोन सरदारांच्या जहागिरीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
जिंजीला नसीर मोहम्मद खान विजापूरचा सुभेदार होता तरी त्याची हद्द पाँडिचेरी पर्यंत होती. त्याच्या दक्षिणेला शेरखान लोधी जो वली गुंडापुरम मध्ये राहून कारभार पाहत होता व त्याच्याही दक्षिणेला तंजावर आणि मधुरेत हिंदू राजे होते. 12 जानेवारी 1676 रोजी तंजावर वर आक्रमण करून व्यंकोजीनी तो मुलुख ताब्यात घेऊन स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून राज्याभिषेक करून घेतला.
14 सप्टेंबर 1676 रोजी शेरखान लोधी याने फ्रेंचांच्या मदतीने पाँडिचेरीच्या पश्चिमेचा घेऊन नाशिक मोहम्मद चा पराभव करून त्याला जिंजीला हाकलून दिले आणि चार नोव्हेंबर पर्यंत वालदर पोर्टल आणि बहुतांश मुलुख शेर खानाकडे आला.
गोवळकोंडा चा शक्तिमान वजीर मादन्ना पंडित याला त्याचा पुतण्या गोपन्ना याच्यासाठी तिकडे हिंदूंची सत्ता यावी यासाठी विजापूर कर्नाटक बळकावण्याची मनोमन इच्छा होती. ही कामगिरी पार पाडण्यासाठी शिवाजी राजे हाच सर्वोत्तम पर्याय त्यांच्यासमोर होता. तो त्यांनी सुलतानाला सांगून शिवाजीराजांबरोबर संयुक्त मोहीम आखण्यासाठी तयार केले. सुलतान मोहिमेत भाग न घेता मोहिमेचा खर्च व युद्ध सामग्री देणार होता. शिवाजी राजे प्रत्यक्ष युद्ध करणार होते. नंतर जिंकलेला प्रदेश दोघे वाटून घेणार होते.
व्यंकोजी लहान असताना त्याचे पालक व कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक शहाजीराजे यांनी केली होती. या कारभाऱ्यांनी हिशेबात भरपूर लबाडी करून माया जमवली होती. व्यंकोजी मोठे झाल्यानंतर त्यांनी हिशेब मागताच तो राजीनामा देऊन तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर पडला आणि विजापूर करून शिवाजी राजांच्या आश्रयाला आला. त्याने शिवाजी राजांना आपल्या सावत्र भावाकडे पित्याच्या जहागिरीतील वाटा मागण्यासाठी तयार केले.
मुघल बादशहा 27 मार्च 76 रोजी दिल्लीत गेला होता आणि त्याची फौज वायव्य सरहद्दीकडील बंड मोडण्यात व्यस्त होती. इकडे विजापुरात बहलोल खानाने हवास खानाला ठार करून सुलतान सिकंदर याचे पालकत्व स्वतःकडे घेतले होते. तसेच तिथे अफगाणी आणि दख्खनी वादात दख्खनींनी बहलोल खानाचा उजवा हात फिजर खानाला ठार केले, त्यामुळे विजापूरची सत्ता सुद्धा खिळखिळी झालेली होती. तर बहलोल खानाचे मोहन सेनापती बहादूर खानाशी वितुष्ट आले होते. शिवाजी महाराजांना ही परिस्थिती अत्यंत अनुकूल होती. शिवाजी महाराजांनी आधी बहादुर खानाच्या मध्यस्थीने बादशहाशी तह करून संभाजी राजांना सहा हजारी मनसबदारी देण्याचा प्रस्ताव दिला. बहादूर खानाला लाच आणि खंडणी देऊन औपचारिक तह केला. पेशवा मोरो त्रिंबक पिंगळे यांना कारभारी नेमले, सुरनिस अनाजी दत्तो यांना नेमून राज्याच्या रक्षणासाठी फौज दिली व कोकणचा मुलुख ही त्यांच्या अखत्यारीत ठेवला. प्रल्हाद निराजी हे नावाजलेले तज्ञ हैदराबाद मध्ये राजदूत म्हणून नेमले.
सर्व पूर्व तयारी करून 1677 च्या जानेवारीत राजगडावरून शिवाजी राजांनी हैदराबाद कडे कुच केले. गोवळकोंडा च्या हद्दीत मराठा सैन्याने कोणतीही आगळीक करायची नाही अशी ताकीद देऊन आगळी करणाऱ्यांना मृत्युदंडापर्यंतची शिक्षाही देण्यात आली. फेब्रुवारी 1677 मध्ये राजे हैदराबाद येथे पोहोचले. स्वागतासाठी कुतुबशहा स्वतः येणार होते परंतु शिवाजी राजांनी त्यांना निरोप दिला की ते मोठे बंधू आहेत, मी कनिष्ठ असल्यामुळे त्यांनी चालत येण्याची गरज नाही. त्यामुळे वजीर मादन ना कांना आणि प्रतिष्ठित नागरिकांनी शिवाजी महाराजांचे जाऊन स्वागत व आदर सत्कार करून सन्मानाने राज्यांना राजधानीत आणले. त्यावेळी त्यांच्यासोबत सरनोबत हंबीरराव मोहिते सेनाधिकारी आनंदराव आणि मानाजी मोरे तर सूर्याजी मालुसरे व येसाजी कंक हे सेनापती होते. शिवाजी राजेंनी आपले सैन्याला योग्य ते पेहराव देऊन सजवून राजधानीत आणले. त्यांचे सर्वांनी कौतुक केले. सुवासिनींनी निरांजनाने ओवाळून व सोन्या-चांदीची फुले उधळून राजांचे स्वागत केले. तर राजांनीही मूठ-मूठभर सोन्या-चांदीचा वर्षाव केला आणि प्रत्येक भागातील महाजनांना मानाचे पोषाख दिले.
ही मिरवणूक दाद महालात आली. राजे आपल्या पाच अधिकाऱ्यांसह पायऱ्या चढून वर गेले आणि राजवाड्याच्या सभागृहात प्रवेश केला. सुलतान कुतुबशहाणे स्वागत करून आलिंगन दिले. त्यानंतर शाही गालीच्या वर वजीर मादण्णासोबत बसून तीन तास वार्तालाप केला. त्यात प्रामुख्याने अफजलखानाचा वध शाहिस्तेखानाला त्याच्या हराम मध्ये पकडून जखमी केले आणि औरंगजेबाला त्याच्या भर दरबारात जाऊन आव्हान देऊन युक्तीने आग्र्याहून सुटका कशी करून घेतली हे राजेंच्या तोंडून ऐकून सुलतानाचा थरकाप उडाला. त्याने शाही पाहुण्याला आणि मराठा अधिकाऱ्यांना दाग दागिने जड जेव्हाही घोडे हत्ती आणि मानाचे पोशाख दिले व राजांना अत्तर लावून स्वहस्ते विडा देऊन निरोप देण्यासाठी राजवाड्याच्या अखेरच्या पायरी पर्यंत आला.
दुसऱ्या दिवशी माझा पंडित आणि शिवाजी राजे व त्यांच्या सरदारांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना शाही मेजवानी दिली. राजांसाठी स्वयंपाक मादन्नाच्या मातेने केला होता. पाहुण्यांना हत्ती घोडे व पोशाख देऊन सन्मान केला.
गोवळकोंड्याशी करार-
शिवाजीराजांवर सुलतान अबुल हसन बेहद्द खुश झाला होता. तसेच मिर्झा मोहम्मद अमीन या सेनाधिकार्याच्या अधिपत्याखाली 5000 सैन्य पाठवणार होता व दारुगोळ्यासह शिवाजी राजांना तोफखाना देणार होता. त्या मोबदल्यात कर्नाटकातील जिंकलेल्या प्रदेशापैकी शहाजीराजेंचा मुलुख राजांकडे आणि बाकीचा मुलुख सुलतानाला दिला जाणार होता. तसेच कुतुबशहाच्या समोर राजांनी शपथपूर्वक मुघलांपासून कुतुबशाहीच रक्षण करण्याचे वचन दिल, त्या पोटी कुतुबशहाने नियमितपणे वार्षिक एक लाख होनाची खंडणी देऊन मराठा वकिलाला आपल्या दरबारात ठेवण्याचे वचन दिल. यावेळी त्यांना प्रचंड जड जवाहीर, दागिने, असंख्य घोडे आणि हत्ती भेटी दाखल दिले. दोन्ही राजे राजवाड्याच्या गच्चीवर येऊन मराठा सरदारांच्या सलामीचा स्वीकार केला. सर्व सरदारांना कुतुब शहाने त्यांच्या पदानुसार आणि कामगिरी नुसार भेटवस्तू दिल्या. शिवाजी राजांच्या घोड्याला सुद्धा रत्नमाला घातली.
तिसऱ्या दिवशी हैदराबादच्या आघाडीच्या सरदारांनी राजांना मेजवानी दिली व येसाजी कंक बरोबर मदोन्मत्त हत्तीचं द्वंद्व झालं. येसाजीनी हत्तीची सोंड छाटताच हत्ती चित्कारत पळून गेला.
हैदराबाद महिनाभर राहून आणि स्थानिक सहाय्यक दलाला शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करून 1677 च्या मार्चमध्ये शिवाजीराजे दक्षिणेकडे निघाले. कर्नुल शहराकडून पाच लाख खंडणी वसूल केली. तिथून पुढे पवित्र क्षेत्र निवृत्ती संगम व चक्र तीर्थ या दोन्ही ठिकाणी जाऊन स्नान केले व धार्मिक विधी यथा सांग पार पाडून श्री शैल्य इथे गेले. पंधराशे 63 फूट उंचीच्या पठारी प्रदेशावर हे अतिशय प्राचीन, पवित्र असे शिवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. राजे इथे दहा दिवस थांबले. असे सांगितले जाते की राज यांनी शिवाला येथे आपले मुंडके अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मंत्र्यांनी या धार्मिक उन्माला रोखले. राजांनी इथे गणेश घाट बांधला आणि धर्मशाळा व एक मठ बांधून ब्राह्मण लक्ष भोजन देऊन मोठ्या प्रमाणात दानधर्म केला.
श्रीशैल वरून राजे पुढे मद्रास जवळ पोहोचले आणि जिंजीला पाच हजाराचे घोडदळ पाठवले. किल्लेदार नासिर मोहम्मद खान याने 50 हजारांची जहागीर मान्य करून राजांना जिंजी किल्ला दिला. (ही जहागीर गोवळकोंडाच्या भरोशावर दिली होती परंतु राजांनी जिंजी किल्ला न दिल्यामुळे गोवळकोंडा च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील मुलुख देण्यास नकार दिला! नासिर मोहम्मद सर्व काही गमावून हलाखित मेला.)
ही खबर मिळताच राजे तडक जिंजीला गेले आणि तहात ठरल्याप्रमाणे किल्ला गोवळकोंडाकडे सुपूर्द न करता रायाजी नलगे यांना किल्लेदार म्हणून नेमून सुभेदार नेमले. राजांनी जिंजीच्या किल्ल्याभोवती नवीन कोट बांधून बुरुज ही बांधले व खंदक खणला.
जिंजी वरून राजे वेल्लोर ला गेले आणि किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्ला खान या शूर सिद्धी अधिकाऱ्याने तो 14 महिने लढवला. राजांनी तिथे जाताच शेजारच्या दोन टेकड्या ताब्यात घेऊन त्यांना साजिरा आणि गोजिरा अशी नावे दिली व तिथे तोफा ठेवून किल्ल्यावर हल्ला चढवला. तिथे सबनीस नरहरी रुद्र यांना 2000 घोडदळ व पाच हजार पायदळ ठेवून राजे स्वतः शेरखान लोधीशी लढण्यासाठी दक्षिणेकडे गेले.
आता करारानुसार गोवळकोंडाच्या सरकारने दिली जाणारी 3000 होणांची रक्कम देण्यास नकार दिला. राजांनी किनारपट्टीवरच्या मुलखांमध्ये खंडण्या गोळा करण्यास सुरुवात केली मद्रास आणि पुलिकत या दोन मुलखांनी प्रत्येकी 50 हजार होन दिले. शिवाजी राजांच्या काही प्रशासकांनी आणि सैनिकांनी ही लूट केली. स्थानिक दरोडेखोरांनी याचा गैरफायदा घेऊन लुटा लूट केली.
कर्नाटकातील अर्ध्या दक्षिण भागावर शेरखान लोधी ची सत्ता होती. फ्रान्सिस को मार्टिन याच्या सावधगिरीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या ब्राह्मण सल्लागारांचा सल्ला घेऊन तो शिवाजीराजांवर कुडलोरच्या पश्चिमेला तिरूवाडी येथे 4000 घोडदळ व तीन-चार हजार पायदळ घेऊन चालून आला. 26 जून रोजी शिवाजी राजांच्या 6000 घोडदळाने शेर खानाचा सपशेल पराभव केला. शेरखान जंगलात पळाला परंतु मराठ्यांनी त्याचा पाठलाग केला म्हणून तो बोनागीर पट्ट्यांच्या किल्ल्यात गेला. मराठ्यांनी त्याला घेराव घालून कोंडले व खानाचे सर्व साहित्य जप्त केले. 30 जूनला वालदर टवेनपट्टम आणि खानाचे इतरही किल्ले मराठ्यांच्या हातात आले. शेरखानाने लढाई सोडून दिली व 20 हजार रोख रकमेसह आपला सर्व मुलुख राजांना देण्याचे मान्य करून तह केला. ही रक्कम देईपर्यंत त्याचा मोठा मुलगा व ओलीस ठेवला आणि तू हरियाणूच्या जंगलात आश्रयास गेला. त्या भागातील हिंदू राज्यांनी अष्टयाहत्तरच्या फेब्रुवारीत खंडणीची रक्कम राजांना देऊन खानाच्या मुलाला सोडवून आणले. एप्रिल मध्ये शेरखान्याने मधुराच्या नायकाच्या दरबारात आश्रय घेतला.
शिवाजी राजे आता १२ जुलै रोजी तंजावर जवळ कोल्हेरून नदीच्या काठी तिरूमला वाडी येथे पोहोचले. तिथे मदुराईच्या वकिलाकडे एक कोट रुपये खंडणीची मागणी केली. लवकरच रघुनाथ पंतही महाराष्ट्रातून तिथे आले. मग राजांनी त्यांना खंडणीची रक्कम ठरवण्यासाठी मदुरेच्या नायकाकडे पाठवले. नायकाने सहा लाख होन देण्याचे मान्य केले. त्यापैकी दीड लाख होन तात्काळ देणार होते.
व्यंकोजी राजे यांची भेट-
शिवाजी राजांनी सुरक्षिततेची हमी दिल्यानंतर जुलै च्या मध्यावर व्यंकोजी तिरूमला वाडीला आले. शिवाजी राजांनी सहा मैल पुढे येऊन व्यंकोजींचे स्वागत केले. एकमेकांना नजराने व मेजवान्या काही दिवस चालले. त्यानंतर शिवाजी राजेंनी व्यंकोजींकडे शहाजीराजांनी ठेवलेल्या जहागिरीतील आणि मालमत्तेतील अर्धा वाटा मागितला. मग व्यंकोजींनीही मराठ्यांच्या अर्ध्या राज्यावर हक्क सांगितला जय शिवाजी राजांनी बहुतांश स्व पराक्रमाने मिळवले होते. परंतु व्यंकोजीचे म्हणणे असे होते की वीस लाख फोन किमतीची शहाजीराजे यांची जाहीर होती. ती फक्त शिवाजी राजेंनी सुलताना कडून काढून घेतली. मात्र तंजावरच्या राज्यावर व्यंकोजीने आक्रमण करून तो मुलुख स्वतः जिंकून घेतला होता.
दोघांमधील मतभेद वाढल्यामुळे व्यंकोजी शौचाचा बहाणा करून एके रात्री निष्टून नदीपार निघून गेले. चिडून राजेंनी त्यांच्या मंत्र्यांना अटके ठेवले परंतु काही दिवसांनी त्यांना भेटवस्तू व मानाचे पोषक देऊन पुन्हा व्यंकोजी कडे पाठवण्यात आले.
व्यंकोजी ना परत भेटीला बोलावण्याचे प्रयत्न वाया गेले. मग शिवाजी राजे 27 जुलै रोजी कोल्हेरून वरून वलीगंडापुरम इकडे निघाले. उत्तरेकडील वेल्लार नदी ओलांडून गुर्टी मध्ये मुक्काम केला. तिवेना पाटम येथील डच प्रमुखांने त्यांची भेट घेतली आणि नजराणे दिले. राजेंनी व्यंकोजी च्या ताब्यातील इलावणासूरचा किल्ला घेण्यासाठी आपले सैन्य पाठवले. तीन ऑक्टोबरला शिवाजी राजे मद्रासच्या आसपास होते. त्याआधी त्यांनी पोर्तोनोव्हो मध्ये लूट केली आणि अर्काटचा दक्षिण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. ऑक्टोबर मध्ये त्यांनी अरणीचा किल्ला जिंकला आणि उत्तर अर्काट मधील काही किल्ले ही जिंकले.
शिवाजी राजांच्या बंडात सहभागी झाल्यामुळे कुतुबशहाला शिक्षा देण्याचे प्रमाण औरंगजेबाने दख्खनच्या सुभेदाराला दिले. त्यानुसार विजापूर आणि दख्खनच्या सुभेदाराने गोवळकोंड्याच्या मूलखावर मालखेड जवळ सप्टेंबर 1677 मध्ये हल्ला केला. म्हणून 1677 च्या नोव्हेंबर सुरुवातीला शिवाजीराजे चार हजारांचा घोडदळ घेऊन पूर्व घाटावरून पठारी प्रदेशात आले आणि शहाजीराजांच्या जहागिरी पैकी कोलार, ऊस्कोटा, बंगळूर, बाळापुर आणि सेरा आपल्या ताब्यात घेतले. एप्रिल 1678 मध्ये राजे बेल्लारी धारवाड मार्गे पन्हाळ्यावर पोहोचले.
शिवाजी राजांनी कर्नाटकातील वीस लाख होनांचा मुलुख जिंकून स्वराज्यात सामील केला होता आणि त्यात त्यांनी बांधलेले किंवा जिंकलेले शंभर किल्ले होते ज्यात जिंजी आणि वेल्लोर या दोन भक्कम किल्ल्यांचा समावेश आहे. 72 भक्कम गड्या आणि अगणित संपत्ती ज्यात सोने भरपूर होते त्यांना मिळाली. अशाप्रकारे कर्नाटकचे पठार पूर्णपणे जिंकून प्रचंड लूट केली. त्यांनी पहिल्यांदा शांताजी या शहाजी महाराजांच्य अनौरस मुलाला जिंजीचा सुभेदार म्हणून नेमले. रघुनाथ नारायण हनुमंते यांना राजकीय सल्लागार आणि मुजुमदार म्हणून नेमले तर हंबीरराव आला कुठल्या लष्कराचे सरनोबत म्हणून नेमले. म्हैसूरच्या पठारी प्रदेशात रंग नारायणा सर सुभेदारी दिली आणि जिंजी हे मुख्य ठाणे केले.
16 नोव्हेंबर 77 रोजी व्यंकोजीने 14000 घोडदळ आणि दहा हजार पायदळ घेऊन शिवाजी राजांच्या बारा हजार फौजेवर हल्ला केला. संताजी भोसले फौजेचे नेतृत्व करीत होते. त्यांनी प्रखर लढा दिला व माघार घेतली. परंतु रात्री जोरदार हल्ला चढवून व्यंकोजींचा सपशेल पराभव केला. व्यंकोजीचे सैन्य कोल्हेरून नदी ओलांडून पळून गेले.
इकडे शिवाजी राजांना हल्ला होण्याची शक्यता दिसत होती. त्यामुळे दोघा बंधूंमध्ये तह झाला आणि शिवाजीराजांनी जिंजीचा परिसर व इतर काही किल्ले आणि म्हैसूरचे पठार आपल्याकडे ठेवून घेतले कोल्हेरोन नदीच्या दक्षिणेकडचा मुलुख आणि उत्तरेकडचा काही भाग व्यंकोजींना दिला त्या बदल्यात त्यांनी त्याच्याकडून तीन लाख परदोस (सहा लाख रुपये) रोख स्वरूपात मिळवले. हंबीररावांना महाराष्ट्रात परत बोलावले आणि नवीन प्रांताच्या संरक्षणासाठी रघुनाथ यांनी दहा हजारच घोडदळ उभारल.
दिलीप गायकवाड.
२०-०४-२०२४.
No comments:
Post a Comment