सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचा इतिहास हा अज्ञातच राहीला गेला आहे. आज महाराष्ट्राच्या मातीला संताजी घोरपडे कोण होते हे माहिती झालेच आहे पण संताजींच्या मृत्यूनंतर ही आपल्या बापाचे नाव चालवणारे राणोजी घोरडेंना इतिहास कारांनी उजेडात आणले नाहीच. पण मराठ्यांच्या मोगली सैन्याबरोबर होणार्या प्रत्येक हालचाली मोगली बातमीपञात टिपून ठेवल्या जातं होत्या त्यातील राणोजींच्या पराक्रमाची साक्ष घेऊत.
सन 1701 मध्ये 23 डिसेंबर राणोजी हा कर्हाड भागात धामाधूम करीत आहे . धन्याची रसद त्याने घेतली आहे. महंमद खान यांची त्यांच्या विरूद्ध रवानगी . 24 डिसेंबर राणोजी हा औरंगजेबाच्या छावणीपासून चार कोसावर मलकापुरच्या दिशेने चाल करून आला. मलकापुरचा ठाणेदार जमशिदखान विजापुरी याच्या वर राणोजीचा प्रखर हल्ला करून जोराचे युद्ध केले. जमशिदखानच्या कुमकेला सवाई जयसिंग अवधूतसिंग महंमद खान होते. 26 डिसेंबर कालची राञीची बातमी राणोजीने बादशाही छावणीपासून एक कोसांवर वंजार्यांचे बैल लूटले.
27 डिसेंबर विशालगडाच्या अलिकडे एका टेकडीवर ताब्यासाठी प्रखर युध्द केले . 29 डिसेंबर कर्हाडचा ठाणेदार यासीनखान याजकडून राणोजीने दहा हजार सैन्यासहीत चाल करून बादशहापूर जाळून फस्त केले. यानंतर दोन किल्ल्यांमधील गढीला वेढा घातला तेथील किल्लेदार सातारचा समसाल हा तोफांचा मारा करत होता.
महंमद खानची रवानगी 1701 च्या शेवटच्या चार महिन्यात राणोजींच्या पराक्रमाने मोगली सैन्य फार हदरून गेले.
सन 1702 मध्ये....
जानेवारीत सातारचा फौजदार ख्वासीखान व राणोजींचे सातारजवळ प्रबळ युध्द झाले . 2 जानेवारी विशालगडातुन गोळ्यांचा वर्षाव .
5 जानेवारी मराठा सैन्य तेरदळच्या भागात मोगलांचा मनसबदार ऐकोजी (अखरोजी मुधोळकर ) घोरपडे यांचे मराठ्यांबरोबर युद्ध.
7 जानेवारी राणोजींविरूध्द महंमद खानची रवानगी त्य्चबरोबर पाच हजार पाचशे सैन्य देण्यात आले .फिरोजंगचा भाऊ हानिदखान याची आणि मराठे यांच्या भूम व चौसाळा येथे लढाया सुरूच होत्या.
20 जानेवारी विशालगडाजवळ माचाळ येथे मराठे व महंमद यांचे युद्ध व मतलबखान त्यास कुमकेला होता.
26 जानेवारी राणोजी परंडा बार्शी जवळ फिरोजंगचा सरदार नाहरखान यांच्याशी युद्ध.
29 जानेवारी विशालगडाच्या कोकणी दरवाज्याजवळ मराठे व खान यांचे युद्ध फत्तेहुल्लाखानाच्या मोर्चात किल्ल्यावरून तोफांचा मारा अनेक जण जखमी.
31 जानेवारी शेरदखान तोफ कोल्हापूरहून घेऊन पन्हाळगड मोर्च्यात यमाजी निंबाळकर ब्रम्हापूरी भागात हमिदखानबरोबर युद्ध.
विजापुरी प्रांती मराठ्यांच्या हालचाली.
फेब्रुवारी विशालगडाच्या मुख्य दरवाज्यासमोरील खंदकावर निकराची चकमक. 14 फेब्रुवारी कोकणी दरवाज्याजवळ सवाई जयसिंग व मराठे यांची लढाई.
15 फेब्रुवारी मोगली सेनापती फत्तेहुल्लाखान जबर जखमी झाला. राणोजी घोरपडे विजापुरी प्रांतात आपला दम बसवत मुजहिदखानबरोबर युद्ध केले. विशालगड किल्ल्यासमोर मराठ्यांचा ख्वाजखानवर जबरीने हल्ला. व निकराची लढाई .
संगमनेर प्रांती नेमाजी शिंदे ठाणेदार मुबारीजखान बरोबर प्रखर युध्द . राणोजी धारूर बीड मराठवाडा प्रांती रूहुल्लापार लुटून फस्त . फौजदार औरंगखान याची मनसब कमी करावी अशी आज्ञा.
1 मार्च उत्तर भारताचा खजिना दक्षिणेच्या वाटेवर.
2 मार्च कोकणी दरवाज्यासमोर कोतरी गावांवर( शिपोशीजवळ लांजे ) मोगली हल्ला निकराचे युद्ध. महंमद खान ख्वाजाखान आणि राव मानसिंग जाधव हे (रावजगदेवरावांचे पुञ) यांची कामगिरी.
5 मार्च पगारवाटण्यासाठी छावणीतील सावकाराकडून 5 लाख रू. उकळण्याची बादशाही इच्छा. सावकारांची छावणी सोडण्याची धमकी. खजिना येण्याची वाट पाहण्याचा निर्णय 7 मार्च अकोला ( नगर) येथे मराठे व मातबरखान यांची जोराची लढाई. 8 मार्च शहजादा बेदारबस्त यांची विशालगडी कोकणात दरवाज्याच्या दिशेने रवानगी. 14 मार्च महंमद खान बहादूर यांचा भाऊ नवाबखान व मराठे यांच्यात घाटाखाली कोकणात युद्ध महंमद खान राग बरोबर देण्यास सहा हजारी फौज तयार.
राणोजी घोरपडे यांनी आपल्या बापाचे नाव चालवले ते आपल्या पराक्रमानेच.....
21 मार्च 1702 साली संताजी घोरपडेंचा मुलगा राणोजी घोरपडे याने वाकिनखेडा तालुक्यात बेडरांच्या प्रदेशी भिमा काठी सुरपूर तालुका चंदनगढीला वेढा घातला होता. खुप मोठी लढाई सुरू होती. येथे राणोजींचे बेडरांची खुप मोठी शर्थ दिली पण राणोजीस लढताना समोरून छातीत गोळी लागली गेली व सरसेनापती संताजी घोरपडेंचा पुञ राणोजी घोरपडे रणी पडले. राणोजींच्या मृत्यू ने मराठ्यांची जबर हानी झाली.
संताजीपेक्षा ही दोन पाऊले पुढेच होता हा राणोजी असे फारशीत उल्लेख आहेत.
___
लेख साभार बाळासाहेब पवार
No comments:
Post a Comment