संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे:-मध्य पूर्व भारतात मावळा प्रातांत व सध्याच्या मध्यप्रदेश या ठिकाणी प्रदीर्घ काळ हिंदू क्षत्रिय परमार हे सुर्यवंशातील (अग्निवंश) परमार राजवंशाची सत्ता होती, त्यांचे पूर्वज पराक्रमी व जगविजेते होते त्यापैकीच चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य ,सम्राट शालिवाहन,उपेंद्र राजा, मुंजराज,उदयादित्य, राजा भोज राज, राजा जगदेव राव, हे प्रसिद्ध राजे सम्राट होऊन गेले, त्यांच्याच वंशातील जेष्ठ पुत्र राजगादीवर राजा होत, व बाकी पुत्र बंधू हे स्व पराक्रमाने दुसऱ्या राज्यात जाऊन आपले युद्ध कौशल्याने राज्ये जिंकून राजगादी मिळवत असे,त्याच कुटूंबातील अनेक राजपुत्र राजकुमार मध्य दक्षिण भारतात आले व आपल्या पराक्रमाने छोटे छोटे राज्य निर्माण केले,त्यापैकीच फलटण चे निंबाळकर राजघराणे, धवल नांदवळ ढवळे पवार घराणे,दौंड लिंगाळी चे जगदाळे पाटील घराणे,सुरगाणा नाशिक चे पवार देशमुख घराणे, कोकणातील सावंत पवार घराणे,वाल्हे चे वाल्हेकर धारकर पवार घराणे,असे अनेक पवार राजवंशातील राजकुमारांनी आपापल्या सैनिक व भावकितील योध्याच्या पराक्रमाने स्वतंत्र राज्य व जहागिरी देशमुखी पाटीलकी मिळवल्या,त्याच धार वंशातील राजकुमार शभूसिंह उर्फ साबुसिंह परमार तथा साबाजी पवार हे मावळा प्रांतातून धार राजघराणे मधून आपले कर्तृत्व व पराक्रम गाजविण्यासाठी उत्तरेतून दक्षिणेत आले त्यांच्या समवेत त्यांच्या भावकितील चुलत बंधू व मेहुणे ,मामा तसेच मित्रपरिवार व मोजके सैनिक ही होते, खान्देशातून दक्षिणेकडे आल्यानंतर, त्याचवेळी त्यांच्या मनात उत्तरेत मावळा राज्यात परकीय मुस्लिमांनी केलेल्या आक्रमणाची व लुटीची चीड होती,त्याची भरपाई व प्रतिशोध घेण्याचे ठरवले व अहमदनगर निजामशाही मध्ये गनिमीकावा युद्ध नीती वापरून निजामी इलाख्यात लूट सुरू केली, कामरागाव घाट येथे मुक्कामी राहून तेथून पुढे सुकेवाडी येथे आपला तळ ठोकला हा परिसर पुणे प्रातांत येत होता व त्याच दरम्यान मराठा फर्जंद शहाजीराजे भोसले हे निजामशाही ची सत्ता चालवत होते, त्यांच्या पर्यत ही बातमी समजल्यावर त्यांनी साबुसिंह परमार यांना भेटायची इच्छा व्यक्त केली,एवढा शूरवीर नर कोण आहे ते पहायचे आहे असं ठरवून सैनिकांना निरोप देऊन धाडले, त्यादरम्यान त्यांची भेट साबुसिंह सोबत झाली साबुसिंह यांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली , साबुसिंह यांचा पराक्रमी वंश समजल्यावर शहाजी राजे खुश झाले व त्यांनी साबुसिंहना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या बद्दल माहिती दिली ,साबुसिंहांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन स्वराज्यात सामील होण्याचे ठरले, त्यानंतर शिवरायांची व साबुसिंहाची भेट होऊन त्यांना कल्याण च्या लढाई मध्ये सामील होण्याचे आदेश दिले व साबुसिंहनी ही कल्याण च्या लढाईत पराक्रम गाजविला, छत्रपतींच्या आदेशानुसार अनेक लढायांमध्ये भाग घेऊन पराक्रम गाजवत जीत मिळवली,त्यांनी सुकेवाडी च्या जागेवर सुपे हे गांव वसविले व छत्रपती कडून त्याच गावाची पाटीलकी ही मिळवली, दरम्यान शेजारील हंगे गावच्या दळवी पाटलांबरोबर गावच्या शिवेंवरून वाद होऊन त्यांच्यात लढाई झाली व त्यातच त्यांचा धोक्याने मृत्यू झाला, त्यांची पत्नी संगमनेर च्या थोरात पाटलांची मुलगी होती त्यांची पत्नी व मुलगा कृष्णाजी हे संगमनेर काही काळ राहिले ,दरम्यानच्या काळात कृष्णाजी सर्व युद्धनीती शिकले व मोठे झाल्यावर सुपे येथे आलें त्यांच्या भावकितील बंधू येथेच राहत होते, आपल्या पाटीलकी चे गाव ताब्यात घेऊन,ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे जाऊन स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले, त्यांचा पराक्रम पाहून महाराजांनी त्यांना सरदार केले,व सरदारकीचे वस्त्र देऊन स्वराज्य कार्यास पाठविले , त्यांनी आपल्या पवार कुळाचा नावलौकिक वाढवला व महाराजांच्या नजरेत भरले महाराजांनी आपल्या खास पागेतील सरदारांमध्ये कृष्णजी पवारांना स्थान दिले, कृष्णाजी पवारांना 3 मुले बुबाजी,रायाजी,केरोजी, त्यापैकी तिन्ही ही खूपच पराक्रमी व लढाऊ निघाले,आपल्या पराक्रमाने त्यांनी स्वराज्याच्या प्रत्येक लढाईत विजय मिळवला व छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी सरदारकी व जहागिरी मिळवली, बुबाजीना विश्वासराव ही उपाधी,व केरोजीना सेनाबारासहस्त्र पद दिले,
त्यादरम्यान कृष्णाजी पवारांनी व बुबाजी यांनी अहमदनगर व पुणे प्रांतात अनेक गावच्या पाटीलकी मिळवल्या काही विकत घेतल्या व आपल्याच घरातील व भावकितील वंशजांना वाटप करून दिल्या, त्यापैकीच वाघाळे गाव व परिसर रायाजी पवारांना दिले व आपले प्रमुख गाव असलेले सुपे बुबाजी विश्वासराव कडे ठेवले,तसेच *केरोजीना खान्देशातील नगरदेवळे येथील जहागिरी मिळाली,पुढे केरोजी व त्यांचे वंशज नगरदेवळे,चाळीसगाव,भोरस,भडगावं,व परिसरात च स्थायिक झाले,नगरदेवळे येथे गादी आहे.
*रायाजीचे वंशज वाघाळे येथे स्थायिक होऊन धार व देवास मधील संस्थानात प्रशासनात सहभागी झाले,
*बुबाजींचे मुलगे काळोजी व संभाजी , त्यापैकी प्रमुख सरदार *काळोजी हे सुपे शाखेत व त्यांची मुले अनुक्रमे कृष्णाजी , तुकोजी, जिवाजी, व मानाजी,होते ,त्यापैकी
1.कृष्णाजी ह्यांना सुपे शाखा,व काही गावांची पाटीलकी मिळाली,
2.तुकोजी ह्यांना गणेगाव (ता.शिरूर घोडनदी) चे वतन व नंतर देवास(मध्यप्रदेश) ची जहागिरी मिळाली,
3.जिवाजी ह्यांना हिंगणी (ता.श्रीगोंदा) येथील वतन पाटीलकी व नंतर देवास (मध्यप्रदेश) ची ( धाकटी पाती) जहागिरी मिळाली,
4.मानाजी ह्यांना पिंपळगाव पिसा(श्रीगोंदा) (तत्कालीन ता.पारनेर) येथील 23 गावचे वतन व पाटीलकी , व नंतर पाथरी येथील जहागिरी मिळाली.
*तुकोजी व जिवाजी ह्यांचे
त्यानंतरच्या काळात देवास हे छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा गादीच्या अधिपत्याखाली संस्थान झाले,व ते तेथेच स्थायिक झाले, पूर्वीच्या गावचे वतने व पाटीलकी आपल्या इतर मुलांना व भावकितील बंधूंना दिल्या,भोयरे येथील पाटीलकी घराण्यातील च वंशज तुकोजीच्या वतनागावी गणेगाव येथे गेले व तेथेच स्थायिक झाले त्याच घराण्यातील संताजी पवार पाटील हे संत संतोबा तथा संताजी महाराज पवार हे आहेत,सध्या त्यांची व त्यांच्या पत्नी यशोदा माता यांची संजीवन समाधी रांजणगाव वाळकी बेट(ता.दौंड)येथे आहे.हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे,
*कृष्णाजी हे सुपे येथेच स्थायिक झाले, पुढील वंशज हे देवास थोरल्या पातीच्या गादीवर दत्तक गेले, व सुपे येथील गादीवर मानाजी यांचे वंशज आले,
धाकट्या पातीवर ही मानाजी यांचे वंशज दत्तक गेले,
*मानाजी*यांचे वंशज सुपे,देवास,पिंपळगाव पिसे,पाथरे,राहुरी,व येळपणे,येथे आहेत,तेथील गावच्या पाटीलकी ह्या त्यांच्याकडेच होत्या, अपधुप येथील प्रसिद्ध खंडोबा मंदिर,पिंपळगाव चे रेणुकामाता मंदिर, त्यांनीच पूर्ण केले तेथे शिलालेख आहे.
सध्याचे सुपे शाखेतील गादीवर ही ह्याच शाखेतील वंशज आहेत.
*संभाजी बुबाजी पवार* यांना मलठण येथे जहागिरी व पाटीलकी मिळाली,तेथे त्यांनी भव्य गढी वाडा बांधला,त्यांचे मुले,
1.शूरवीर उदाजी राजे पवार हे अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी राजकीय तरबेज होते.शाहू महाराजांचे विश्वासू सरदार व मित्र होते, सर्वात अगोदर नर्मदा नदी पार करून त्यांनी उत्तर भारतात मोगलांच्या क्षेत्रात आक्रमण केले होते,शाहू महाराजांनी त्यांच्यावरती गुजराथ व माळवा प्रांताची वसुलीची जबाबदारी दिली होती,दरम्यान शाहू महाराजांचे प्रधान पेशवे बाजीराव व उदाजीराजे यांच्यात वैमनस्य निर्माण झाले,दाभाडे व बाजीराव पेशवे यांच्या डोभोई च्या लढाईत उदाजी राजे व त्यांचे बंधू आनंदराव व जगदेव राव हे सेनापती दाभाडे कडून लढले,शाहू महाराजांचा गैरसमज निर्माण करून
उदाजीना धार च्या गादिवारून हटवले व आनंदराव यांना धार ची जहागिरी दिली,
उदाजीराव यांनी आपल्या मूळ जहागिरीच्या मलठन गावी येऊन राहिले व त्या शेजारच्या कवठे यमाई गावी वाडा बांधला व तेथेच स्थायिक झाले,त्यांचे वंशज हे मलठन व कवठे येथे आहेत, त्यापैकी काही वंशज धार संस्थानात प्रशासनात सहभागी झाले,
आनंदराव व त्यांचे मुले यशवंतराव पवार हे धार येथे गादीवर स्थायिक झाले,
जगदेव राव ही त्यांच्या सोबतच राहिले,
नंतरच्या काळात मलठाण शाखेतून च धार च्या गादीवर दत्तक पुत्र गेले,व बाकीचे मंडळी ही धार संस्थानात रुजू झाले.
सध्या धार च्या गादीवर ही ह्याच शाखेतील पुत्र दत्तक गेलेले आहेत,मलथन कवठे वाघाळे येथील परिसरात घोडनदी पट्ट्यात बऱ्याचशा गावात पाटीलकी आहेत,
पोस्टकर्ते
राजे धार पवार सामाजिक प्रतिष्ठाण महाराष्ट्र
No comments:
Post a Comment