विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

*🌹!!! झाशीची राणी !!!🌹* *भाग - ४.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!!🌹*

*भाग - ४.*

महालात पाय ठेवताच तिथे नटुन थटुन बसलेल्या स्रीस लक्ष्मीबाईंनी स्वामी कुठे आहेत विचारल्यावर, ८-१० जण असलेल्यांच्या जीभा टाळुला चिकटल्या. त्यांनी संतापुन त्या स्रीस पुन्हा विचारले, पण ती पाठमोरी असल्यामुळे त्यांनी त्या स्रीला खसकन हात धरुन समोर उभे केले आणि क्षणभर सारं विश्वच गरगरतं आहेस वाटलं,स्वप्नातही कल्पना केली नाही असं दृष्य समोर दिसलं.ती स्री दुसरी तिसरी कोणी नसुन स्रीवेश धारण केलेले महाराज गंगाधरराव होते.राणी डोळे फाडुन बघतच राहिल्या.हे आपले स्वामी?ज्यांच्यासाठी आपण रात्र रात्र तळमळतो झुरतो?
स्वामी हा काय प्रकार आहे?इंग्रजां नी आपल्याला बांगड्या भरायला भाग पाडल की आपणच स्रीरुप घेतल? अहो! ही वेळ पुरुषार्थ गाजवायची,हा डोलारा सावरायचा,अशा वागण्याने डेर्याचे दोडे उतरण्यास वेळ नाही लागायचा!हे राज्य नमुदास आणणे आहे...आम्ही नाही सहन करु शकत...जातो आम्ही..गंगाधर ओरडुन म्हणाले,बोलावल कुणी?राज घराण्यात वर्दीशिवाय कुणी येत का?पण तुम्हाला कस कळणार?महाराणी खिन्न होऊन परतल्या.तानुमावशी त्याची समजुत घालत म्हणाल्या,मनुबाई!महाराज रसिक,कलावंत आहेत. नाटकाची त्यांना आवड आहे.
आणि नाटकशाळांचीही!मावशी हे दैवाने काय दिलय?तेवढ्यात राजे गंगाधर येत असल्याची वर्दी आली.लक्ष्मी बाईंच्या मनी घृणा दाटुन आली. मावशी आंत निघुन गेल्या.गंगाधरराव स्रीवेशातच तणफणत आले.राणीसाहेब संतापुन उभ्या राहिल्या.स्वामी या वेशात आपणाशी बोलणे अशक्य!आम्हास नाही सहन होत.आम्ही आपला पुरुषवेश सहन करतोच ना? आपला मल्लखांब, कुस्ती सहन करतो ना?महालात तर आपण आखाडाच उभा केलाय!महालात नाटकशाळा आणण्यापेक्षा अधिक चांगले.आपल्यासारख्या अरसिक पुरुषी स्रीला काव्य,कविता काय कळणार?कुस्ती,घोडदौड...छी...!इंग्रज स्री पुरुष बघा कसा कलेचा आनंद घेतात.नाच गाण्यात गुंतवुनच तर इंग्रजांनी सारा हिंदुस्थान घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे.आपण सुध्दा झाशीचा पांचवा हिस्सा किती सहजपणे देऊन टाकला.नाटके, गाणी ऐकुन सारं कसं परत मिळवणार?त्यासाठी आमचे आखाडेच कामी येतील,नाटकशाळेतील गणिका नाही.आपणास या वेशात बघणे अशक्य... अशक्य...
आम्हाला आवडतं हे सारं...नाटक दिग्दर्शन,अभिनय...रोज आठाचाराचा प्रसंग नको वाटते.आम्ही महिन्यातुन तीन दिवस अस्पर्श बसतो.चौथ्या दिवशी नहाण्याचा सोहळा..पुरे पुरे...या विकृत कथा कानी आल्याच होत्या.अभिनंदन आपलं... इंग्रजांशी लढण्यासाठी फारच उत्तम शस्रे निर्माण केलीत.इंग्रजांनी बांगड्या नाही का दिल्या?बांगड्या घाला स्रीवेश घ्या नी नाचत नाचत इंग्रजफौजेस सामोरे जा...घोड्यांच्या पायात घुंगरं... खामोशsss आमची ही बेअदबी? जबान आवरा...मनमानी बोलण्याचे अधिकार, स्वातंत्र्य आम्ही दिलेले नाही.
ते स्वातंत्र्य आणि अधिकार आम्हास या मंगळसुत्राने दिले.मी आपली अर्धांगी!आपल्यातल्या दडलेल्या लढवय्याला आव्हान करा.नाटकगृहांच्या जागी आखाडे येऊ द्या.फिरंगी अतिशय मातला आहे.चारही बाजुने पाश आवळत आहे.हे छंद बंद करुन दूरंदेशी येऊ द्या.स्वामी!ओरछा,दतिया,आजुबाजु चे सारे स्वार्थाने बरबटलेले.अवतीभवती वणवा घुमसू लागलाय!स्वामी देशाटन करा.चौफेर नजरबाज पाठवा.ऊपद्रव देतात त्यांना अविलंब समज द्या.सध्या सावध राहण्याची निकड असतांना स्वामी हे काय करीत आहात?फौजांना प्रशिक्षित करा.शस्रागारे उघडा.प्रधानमंत्री नेमुन अंतर्गत व्यवस्था बळकट करा. आणि सर्वात आधी स्रीवेशाचा त्याग करा आम्ही बंद डोळ्यांनीच आपल्याशी बोलतोय...बघणे अशक्य आहे.
गंगाधरराजे लुगड्याचा घोळ सावरत उठत म्हणाले,राणीसाहेब आपले बोलणे जरी जहाल असले तरी तथ्य आहे हे आम्हीही जाणतो.इंग्रजांकडे ससज्ज शस्रे असल्यामुळे आपला निभाव लागणे कठीण....कोण म्हणतो?इथले शासक आपण इंग्रज बरे इथे येऊन पाय घट्ट रोवतात आणि आपले पाय उखडतात हे घडतेच कसे?

क्रमशः

संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...