विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 July 2024

*🌹!!! झाशीची राणी !!!🌹* *भाग - ३.*


 *🌹!!! झाशीची राणी !!!🌹*

*भाग - ३.*

मनुबाई आतां महाराणी लक्ष्मीबाई झाल्यात.आणि तानुमावशीची जबाब दारी वाढली. राजगृहातले रितीरिवाज, पाकगृहाकडे लक्ष पुरवणे,पुजाविधी, अनुष्ठान,पत्री फुलं,कुळधर्म,कुळरिती, पतीच्या आवडीचे पदार्थ यांत जरी त्या गुंतल्या असल्या तरी,दुपारचा वेळ मात्र ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी राखुन ठेवला होता.राणीस अजुन ऋतु प्राप्ती न झाल्यामुळे दोघांचे मिलन झाले नव्हते.त्या ग्रंथालयात असतांना महाराज तिथे येऊन "राणीसाहेब"अशी हाक मारल्यावर,लक्ष्मीबाई विनम्रपणे हरकत घेत म्हणाल्या,आम्ही आपली अर्धांगिनी लक्ष्मीच! आम्ही सर्व रितीरिवाज शिकुन आपल्या लायक होण्याचा प्रयत्न करुन आपले कुळ,नाव नमुदास आणण्याचा प्रयत्न करु.ठीक आहे.एकांतात आम्ही लक्ष्मी म्हणु!परंतु जगासमोर मात्र राणीसाहेबच म्हणायला हवय!तुमचा पायगुण महाभाग्याचा,शकुनाचा ठरला. ब्रिटिश सरकारने झाशीची पुर्ण सत्ता आपल्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.
स्वामी आपल्याच देशात आपल्याला या फिरंग्यांनी लज्जात्मक रितीने अधिकारापासुन वंचित केले. आतां झाशीचे अधिकार मिळते म्हणजे, आपण केलेल्या राजव्यवस्थेचा सन्मान आहे.पण त्यांच्या अटी नक्कीच असतील राणीसाहेबा!आपलं वय केवळ १२-१३ वर्षाचं!महाराष्र्टातील एका ज्ञानेश्वरां बद्दल ऐकुन होतो.आपणही...आपले तेजही... स्वामी व्यर्थ संकोचात लोटु नये अटी सांगाव्या..
बुंदेले आणि ठाकुरांचे दमन करण्या स्तव ब्रिटिशांची एक तुकडी इथे राहील. त्यांच्या खर्चासाठी दुलिया,तालगंज, आणि आणखी दोन जिल्हे त्यांना द्यायचे. शिवरामभाऊ पासुन मोस आणि जलौन आधीच त्यांच्या अधिन आहेतच.
म्हणजे प्रत्येक ठीकाणावर फिरंगी आपले पाय रोवुन पाश आवळतात हे तानुमावशीचे म्हणणे खरे आहे तर? उदईक दरबारात होणार्या समारंभात सिंहासनावर आपण आमच्या शेजारी असाल.समारंभाची तयारी सुरु झाली. खांबाखांबावर फुलांपाणांच्या माळांची तोरणे,उंची समया,उंची गालिचे,दरबारा तील झुंबरे लखलखत होते.ललकारी झाली आणि गंगाधर राजे,महाराणी लक्ष्मीबाईसह प्रवेशुन सिंहसनारुढ झाले. कॅप्टन डनलाॅप मोठ्या मिजाशीत आसनावर बसला होता.लक्ष्मीबाईंच्या मनांत कल्होळ उसळला.सत्तापिपासू जळव्या इंग्रजांनी दोन अडीच लाखाचा मुलुख गिळला.आमच्याच गोष्टी आम्हाला दान करतात.मोरोपंत आणि तानुमावशी अत्यंत कौतुकाने सोहळा बघत होते.राणीच्या चेहर्यावर जरी वरवर हास्य विलसत असले तरी,त्यांच्या अंतःकरणात पेटलेला वणवा कुणालाच कळणारा नव्हता.
यानंतर राजे गंगाधरांनी अंतर्गत शासन व्यवस्थेकडे जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली.कॅप्टन डलहौसीच्या अटी अन्यायकारक व कठीण होत्या,पण स्विकारण्याखेरीज पर्यायच नव्हता. राधारामचंद्राची प्रधानमत्री म्हणुन नेमणुक केली.नरसिंह कोप्रा व नाना भोपटकर यांचीही योग्यपदी नेमणुक करण्यात आली.ओरछाच्या आजुबाजुस मळईखोर लोकं होती,जिथे विद्रोहाची शक्यता होती तिथे राजेंनी सैनिक तैनात केले.
आणखी चार वर्षे लोटली.आतां राणीसाहेब चौफेर लक्ष घालु लागल्या. त्याचबरोबर तारुण्यसुलभ भावनेने स्री पुरुष संबंधाचे अनेक पैलु लक्षात येऊ लागले.ऋतुशांतीचा कार्यक्रम झाल्यावर, पतीविषयीचा आदर,प्रेम,विश्वास या सार्या भावनासहित गंगाधर राजेंच्या महालाकडे निघाल्या असतां त्यांच्याहुन मोठी असलेल्या सुंदरी नावांच्या सखी कडुन जे महाराजांविषयी कळलं ते अतिशय घृणीत होतं.त्यांच्या मनातील प्रेम,समर्पणाची आस,मिलनाची आतुरता मांगल्याची भावना,भेटीची ओढ हे सारं अर्पन करण्याची,रितं करण्याची वेळ आलीच नाही.आणि आली ती फारच क्वचित! गंगाधरांच्या पदरांत इश्वराने मनू रुपी सुंदर गाणं टाकलं पण ते बाजारु गाणे ऐकण्यातच मग्न असत.आणि एके दिवशी त्यांची सोशीकता,सहनशक्ती संपल्याने मनाच्या क्षोमावस्थेत वर्दी न देता गंगाधरांच्या महालात प्रवेशल्या मात्र.....
क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...