विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹* *भाग - ५.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹*

*भाग - ५.*

फितुरी! राणीसाहेब फितुरी,स्वार्थी मतलबी,पैशासाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्यामुळे राजकारण बिघडत आहे.फिरंग्यांची हाजी हुजरी....
आणि फिरंगी वरवर राज्य नको म्हणत, पण त्याच्यात शिस्त असल्यामुळे आपला मुलुख घशात घालत आहे.वीरांच्या रक्तमोलानं,बलिदानानं मिळवलेलं राज्य आयतच त्यांच्या घशात जात आहे. आपण विश्वासु लोकांची एकजुट करुन बुध्दीचातुर्याने बंडावे,कार्य करुन राज्याचे पाय भक्कम करावे.फिरंग्यास उखडावे.
मोतीबाई,जूहीबाई या गणिकांचा ऊपयोग नजरबाज, हेर म्हणुन करावा.
राजे त्यांचे बोलणे ऐकुन थक्क झाले.त्यांना आपल्या स्रीवेशाची लाज वाटु लागली. स्वामी खुप कटु पण पोटतिडकेने सत्य तेच बोलले.स्वामी!मनी रोष न धरावा.आपला बदनक्षा नाही सहन होत.आपले शौर्य व्यर्थ जातसे पाहुन उरात वेदना ठसठसतात,कळ उठते स्वामी!
महाराणी!हाती तलवार व बेलभंडार घेऊन आपल्याला वचन देतो की,यापुढे स्रीवेश धारण करणार नाही.या पाप क्षालनासाठी काशीयात्रेस जाऊन,त्या निमित्याने देशाटन व मातब्बर आसामीं ची भेट होईल.यापुढील क्षण व कण फक्त राज्यासाठीच! आज आपण झणझणीत अंजन घातलं.मी आपला...
पुरे स्वामी!आपण क्षमा करावी.महाराज निघुन जाताच तानुमावशी धडधडत्या ह्रदयाने बाहेर आल्या कसे निभावले असेल माझ्या मनुने?हीच्या सारख्या शूर लढाऊ मुलीस स्रीवेश धारण करणारा पती मिळाला.दुर्देवाची बाब असली तरी राज्ञीपद मिळाले ही दुर्मिळ संधीच!कच न खाता खुप कर्तव्य करायचेत मनुला...
मनु काय झाले ग?महाराज खुप रागावुन गेले का?मावशी!आमच्या स्पष्ट व परखड बोलण्याने स्रीवेश व विकृतीचा त्याग करण्याची आण घेऊन गेलेत स्वामी! मावशी राजाची मनगटे प्रजेच्या रक्षणासाठी,सुखसुविधेसाठी असतात, गजरे बांधण्यासाठी नाही याची स्पष्ट जाणीव करुन दिली स्वामींना...
महालक्ष्मी नवरात्रोत्साहाची तयारी सुरु झाली.विजयादशमीच्या उत्सवा साठी चौघडे,हत्तीवरचा चांदीचा हौदा, छत्र चामरे,हत्तीचे चांदीचे तोडे,उजळवणे मंदिर रंगवणे,तुतार्या चकचकीत करणे, घोड्याच्या गळ्यातील घुंगरे,माळा, कपाळावरचे बिजोरे,मुकुट सारे शोभीवंत होऊ लागले.महालक्ष्मीसाठी सुंदर सुंदर लुगडी,मूर्तीचे पोषाख,किनखापी वस्रे, सर्व तयारी केल्या गेली.रिवाजाप्रमाणे ब्रिटिश सरकारच्या बॅंडपथकालाही आमंत्रीत केले.नवरात्राचा नऊ व अष्टमीचा निर्जळी उपवास महारीणींनी केला.त्यांचा सुंदर चेहरा अधिकच तेजाळला.गेले ७-८ महिन्यापासुन राजे नाटकशाळेऐवजी तालिम आखाड्यात मेहनत करु लागले.दर महिन्याला न्हाण्याचा सोहळा तर लोकं विसरुनही गेले.गाणे बजावणे थांबले.मोतीबाई,जूही बाई यांच्या फेर्या नबाब,ब्रिटिश अंमलदाराकडे होऊ लागल्या.
लोकं ऊत्सुकतेने दसरा मिरवणुकी ची वाट बघत होते.दसरा रविवारी येत असल्यामुळे इंग्रजांचा प्रार्थना दिवस असल्यामुळे,ब्रिटिश अधिकारी व बॅड पथक शोभायात्रेत सहभागी होण्यास असमर्थ असल्याने दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र व नजराणा आल्याचे पाहतांच, महाराज संतापाने पेटुन उठले.धर्म हा राजकर्तव्या आड कधीही येऊ देऊ नये.सिमाल्लोघंनाच्या मिरवणुकीत सामील होणं राज कर्तव्य आहे.प्रधानमंत्री!त्याचा नजराणा परत पाठवुन त्यांना लिहा आपली अनुपस्थिति झाशी राज्याची बेअदबी आहे.आम्ही सहन करणार नाही.बॅंड पथकासह शोभायात्रेत सामील न झाल्यास पुढील गंभीर परिणामास तयार असावे.खलिता व नाकारलेला नजराणा इंग्रजांकडे रवाना झाला.महाराजांनी गमावलेला सन्मान महाराणीच्या सानिध्याने परत आला.महाराणींनी पडदासंस्कृतीला पायबंद घालुन स्रीयांचे लढाऊ पथक तयार केले.स्रीयांमधे आत्मविश्वास निर्माण होऊ लागला.लाल तोंड्या माकडं,ब्रिटिशांची चिड येऊ लागली.राणीसाहेबांबद्दलचा आदर,प्रेम, विश्वास निर्माण होऊन त्यांच्या बरोबर घोडसवारी,शस्रविद्या शिकण्यास त्यांना आनंद वाटु लागला.दसर्याची मिरवणुक वेळेवर निघाली.इंग्रजांचे बॅंडपथक व अधिकारी वर्ग आधीच हजर होते.

क्रमशः

संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...