विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 July 2024

!!! झाशीची राणी !! भाग - १७.

 


!!! झाशीची राणी !!
भाग - १७.
शहरातील घनिक... बीमावाले, मगन गांधी,मोती खत्री व शाम चौधरी यांनी जामीननामा लिहुन दिल्याने झाशी च्या राणीच्या सन्मानचं रक्षण झालं.पण ह्रदयात बोचलेल्या काट्याचा सल ह्रदया त खुपुन इंग्रजांविषयाचा तिरस्कार प्रजेत वाढत चालला.राणींवरच्या अन्यायाला तर सीमाच नव्हती.दत्तक अमान्य, किल्ला जप्त,एखाद्या भिकार्यास द्यावी तशी पांच हजाराची मामुली निर्वाह निवृत्ती देऊन राणी व तिच्या आरित परीवाराची घोर उपेक्षा केली.केशवपना साठी जात असलेल्या राणीला बंदी, महालक्ष्मीच्या पुजेसाठी असलेले महाल जप्त,गंगाधर राजेंचे कर्ज राणीच्याच तनख्यातुन,दामोदरच्य्या नांवे असलेले पैसे काढण्यास जामीन पत्र,गोहत्या..या सर्वांसाठी राणीसाहेबांनी वेळोवेळी पत्र व्यवहारही केला,पण इंग्रजांनी साधी दखल न घेता पिसाटासारखे अन्याय करीत,राज्ये,गांवे हडप करीत सुटले. अनेक राज्ये,संस्थाने ब्रिटिश अमलां खाली आले.नवनवीन अस्रेशस्रे,कठोरता दहशत,शिक्षेचे अघोरी प्रकार,शिकार या मुळे प्रजा संतापाच्या आगीत तीळतीळ जळत होती.या अपमानकारक स्थितीचा बदला कधी व कसा घ्यायचा?राणींसाठी सर्वस्वाचा,प्राणांचाही त्याग करण्यात लोकं आतुर होते.पण प्रजेचे हित लक्षात घेतां जे कांही पाऊल उचलायचे ते विचाराने व सबुरीने करायचे होते.
संपुर्ण भारतालाच आग लागली. मुसलमानांनी ज्या सुभेदाराकरवी लढण्यास नकार दिला त्या सुभेदारालाच फासावर लटकवले व चाळीस लोकांना बरखास्त केले.लाहोर राजमार्गावर २५ लोकांना फाशी दिले.छोटासाही विरोध चिरडुन टाकत होते ब्रिटिश.ग्वाल्हेरमधे इंग्रज फौजेत असणार्या देशी शिपायांचा आठ महिण्याचा तनखा न झाल्याची तक्रार करतांच गोळीबार केला त्यांत १६ लोकांचा मृत्यु झाला.गावोगावी फौजा घुसुन गांवकर्यांकडुन कोंबड्या,दुध, धान्य लुटुन नेत,जबरदस्तीने मिशनरी ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत,शेतच्या शेतं उध्वस्त करुन तेथे बराकी बांधल्या जात. मेरठमधील एका सैन्याने शिस्त मोडली म्हणुन प्रथम चाबकाने फोडुन नंतर त्याला मृत्युदंड दिला.कानपुरच्या बाजारांत घोडागाडीखाली बालक आला तर चालकावर कार्यवाही म्हणुन खाली डोके वर पाय असं बांधल्यामुळे नाका तोंडातुन रक्त येऊन त्याचा मृत्यु झाला. साधी रागीट नजर जरी टाकली तरी फासी होत असे.हमालांवर लाठीमार.. अश्या अनेक घटना..रक्ताने भिजलेल्या जमीनीतुन कोणतं पीक येणार?अन्याय, अत्याचार व उत्पाताने पिडित,अर्धमेली झालेली भारतमाता आपल्या लेकरांना साद घालत होती.
राणीसाहेब या वार्तांनी पेटुन उठत. १८५७ साल उजाडले.नानासाहेब तात्या टोपेंशी गुप्त खलबते सुरु होती.गुप्तपणे वेगवेगळ्या क्लुप्त्या योजुन,गावोगावी, खेडोपाडी देशासाठी उठाव करण्याचा, लढण्याचा गुप्त संदेश पाठवल्या गेले. एकाचवेळी सगळीकडुन लढाई व्हावी अशी योजना आखण्यांत आली.
तेवढ्यात पेशवे बाजीरांवाकडे धर्म कार्य करणारे रामभटांचे पुतणे विष्णुभट देशाटन करुन सैनिकांतील असंतोषाच्या बातम्या माहित असल्याने मोरोपंत त्यांना घेऊन राणीसाहेबांच्या भेटीस आले.त्या म्हणाल्या कांहीही आडपडदा न ठेवता सत्य कथन करा.विष्णुभट सांगु लागले, विलायतेतुन ज्या बंदुका काडतुस आल्या त्याला गायीची व डुकराची चरबी लावले ली ती काडतुसे दातांनी तोडावि लागते ही वार्ता वायुवेगाने सर्वत्र पसरल्यामुळे हिंदु व मुसलमान अक्षरशः पिसाळलेत. सगळीकडे क्रांतीची भाषा,छावणीतील गोर्यांना कापुन काढावं,आग लावावी, दबल्या आवाजात सर्वीकडे अशीच चर्चा, डाकटपाल लुटुन शिपाई मारले,तारांचे खांब पाडले.ग्वाल्हेरला बायजाबाई शिंदेनीही बहुत सैन्य जमा केले.सारा हिंदुस्थान खवळला.कानपुरात फलटणी जमा झाली,तिथे लढाई झाली.शिंदे कडील लोकांजवळ विषारी गोळे,ते फुटले की तात्काळ डोळे फुटतात व नंतर माणुस मरतो,अश्या फलटणी घेऊन तात्या टोपे गुलसराईला आले.तीन लाखा ची मागीतलेली खंडणी नाकारतांच तात्या टोपेने डंका वाजवला.बंदुकांचे आवाज घुमले.गुलसराईवाल्याचे शिपाई भयभित होऊन पळु लागले.गुलताई बाल्या केशवास बांधुन आणले.
स्वतः नानासाहेब पेशवे, बाळासाहेब,रावसाहेब तोफेस बत्ती देत होते.कानपुर हस्तगत झाले.सारे ब्रम्हवर्तास आल्यापासुन नानासाहेबांकडे गुप्त बैठका सुरु झाल्यात.नबाबांशी इंग्रजांचे कितीही सख्य असले तरी इंग्रज कधीहि उलटु शकतो,या विचाराने तेही भयग्रस्त झाले.इंदौर,ग्वाल्हेर,जोधपुर, जयपुर,कच्छभुज,हैदराबाद,कोल्हापुर, सातारा, इथुनही उठाव होणार अशी आवई उठली.इंग्रजांनी जबर कर बसवल्यामुळे लोकं मेतकुटीस आले. सर्वत्र असंतोष घुसमटत आहे.अशी माहिती विष्णुभटाने दिली.त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यांत आली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...