विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

*🌹!!! झाशीची राणी !!!🌹* *भाग - ७.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!!🌹*

*भाग - ७.*

झाशीचे राज्य गंगाधर महाराजांना कसे प्राप्त झाले याची थोडक्यात माहिती देणे क्रमप्राप्त आहे.तानुमावशींना सारा इतिहास माहित असल्याने त्या लक्ष्मीबाईं ना कथन करुं लागल्या....१५ वर्षापुर्वी याच किल्ल्यावर घडलेलं सखुबाईचं बंड, लक्ष्मीबाईच्या मोठ्या जाऊबाई!तुझे सासरे शिवरामभाऊंना तीन मुलें...मोठा कृष्णराव,त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान रघुनाथराव आणि त्यांच्यापेक्षा तब्बल २५ वर्षांनी लहान तुझे पती गंगाधरराव! गंगाधरराजेंचे जेष्ठ सावत्र बंधु कृष्णरावां ची पत्नी सखुबाई!सखुबाई अत्यंत महत्वाकांक्षी,अधर्मी..गंगाधरराजेंचे आजोबा रघुनाथ हरि फार प्रबुध्द शासक होते.तोफांची घडण,अनुसंधान शाळा, समृध्द ग्रंथालय वगैरेचा विकास त्यांनीच केला.त्यांच्या मृत्युनंतर तुझे सासरे शिवरामभाऊ झाशीचे सुभेदार झाले. झाशीभोवती परकोट त्यांनीच बांधला, पण दूरंदेशी,दूरदृष्टी कमी पडली.स्वतःच ब्रिटीश अधिनता स्विकारली.अस्तिनेत साप पाळला.मनुबाई!अधिनता स्विकारण्याचे बक्षीस म्हणुन शिवरामां च्या वंशाला झाशीचं सिंहासन कायमचं मिळालं.आणि याच राज्यप्राप्तीसाठी त्यांच्या जेष्ठ पुत्रवधु सखुबाईने कुटील कारस्थानं,चिथावणी,पैशांनी फितुरी विकत घेणे अशा कारवाया सुरु केल्यात. घरच्यांच्याच जीवावर उठणार्या घरभेदी स्रीचे कांही चालु न देतां,शिवरामभाऊंनी कृष्णरावांना सुभेदार केले,पण त्यांचा अवघ्या २५ व्या वर्षी मृत्यु झाला. जाणत्या व्यक्तीला सुभेदारी न देता, सखुबाई-कृष्णरावांचा मुलगा रामचंद्रास दिली.तुझे दीर रघुनाथराव व पती गंगाधर रावांना १२ हजाराचा तनखा देऊन गप्प बसविले.आणि एवढे कट कारस्थान करुनही सखुबाईंना कांहीच अधिकार न मिळाल्यामुळे तीचा संताप अनावर झाला.स्वतःचाच मुलगा रामचंद्र तीला शत्रुसमान वाटु लागला.अहिल्याबाईंच्या पोटी कुपुत जन्मुन सुध्दा त्यांनी सांभाळ केला.अश्या सखुईंनी सेवकांना चिथवलं, अशांती,अराजकता माजवली.या सार्याचा ताण सहन न होऊन शिवराम भाऊंनी दोन वर्षातच डोळे मिटले.१८१७ ला दुसर्या बाजीरावांनी तहसंधी करुन, इस्ट इंडिया कंपनीला बुंदेल खंडाचे सर्वाधिकार दिले.कंपनीने अकरा वर्षाच्या रामचंद्रांच्या अधिकारास मान्यता दिली. त्यांच्या वतीने आम्बेदारकर कामकाज पाहु लागले.पुढे दहा वर्षे सखुबाईच्या मनात जाळ उठत राहिला.
राजे रामचंद्र व ब्रिटिशांचे संबंध चांगले होते.कर्नल श् लीमनची अन् त्यांची मैत्री,राजेंचा कर्तबगारपणा, राज्यात नांदत असलेली सुख, शांती, आनंद सखुबाईला बघवत नव्हते.प्रत्यक्ष पुत्रावरच जळत होती.९ डिसेंबर १८३२ ला स्वतः विल्यम बेंटिंग झाशीस येऊन चौरंगी दरबार भरवला.वाजंत्री तुतार्या च्या गजरात रामचंद्र राजांना "महाराजाधिराज फिदुई बादशाही जानुजा इंग्लिस्तान महाराज रामचंद्र बहादूर" हा किताब प्रदान केला आणि दरबारात लावायला ब्रिटिश झेंडाही... किताब सोहळा जलाली नजरेने सखुबाई बघत होत्या.राजांना इच्छेविरुध्द कांही गोष्टी कराव्या लागत होत्या.नंतर भरभराट होऊन खजिना भरु लागला. झाशीत लक्ष्मीची पाऊले उमटु लागली. पण ओरछा,दतियाच्या डोळ्यात हा उत्कर्ष खुपु लागला.त्यांनी रामचंद्रांची तक्रार बेंटीग पर्यत नेली,पण त्याने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यामुळे घुमसान लढाई केली.दुही सांधावी,समेट व्हावा म्हणुन झाशीच्या सुभेदाराचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले.प्रजा स्वैरभैर होऊन वाटा फुटतील तिकडे पळु लागले.अन्नान दशा झाली.हाती फक्त झाशी व मऊरानी पुर राहिले.रामचंद्रांचे सारे प्रयत्न वाया जाऊन पराभूत झाले.अराजकता माजली.युध्दात तिजोरी रिक्त झाल्याने इंग्रजांचे ऋण काढावे लागले.या सर्वांचा सहाजिकच त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला.मृत्युशयैवर असलेल्या पुत्राचे डोके मांडीवर घ्यायचे सोडुन, सखुबाई सागरला जाऊन मुलीला व तिचा पुत्र कृष्णरावाला घेऊन आली,आणि राजा रामचंद्रांनी भाच्याला दत्तक घेतल्याची आवई उठवली.त्याच वेळी कर्नल (Shliman) श् लीमन झाशीस आले. झाशीच्या सुभेदारीवर चार जणं हक्क सांगणारे!तुझ्या सासर्याची काकु, रघुनाथरावांची यवनकांचनीचा पुत्र अलिबहादुर,सखुबाईचा नातू कृष्णराव आणि तुझे स्वामी गंगगाधरराव!गंगाधरां ना हक्क मान्य झाला आणि सखुबाईने थयथयाट मांडला.

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...