विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 July 2024

*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹* *भाग - ८.*


 *🌹!!! झाशीची राणी !!! 🌹*
*भाग - ८.*

सखुबाईने किल्लेदारास भरपुर लाच देऊन किल्ला ताब्यात घेतला. माणसं विकत घेतली.त्यांनी रोजमुर्याचे भरपुर पैसे मागावे म्हणुन चिथावणी दिली.नंग्या तलवारी घेऊन माणसं किल्ल्यात फिरुं लागली.राजे गंगाधररावा च्या सुरक्षिततेची काळजी उत्पन्न झाली. ही उलट्या काळजाची बाई कांहीही करुं शकणारी,वारंवार इच्छाभंग झालेली नागीन चवताळुन उठली.अखेर गंगाधरां नी सायमन फ्रेजला अवघी वार्ता कळवली.फ्रेजने किल्ल्याभोवती वेढा घालुन ४८ तासाच्या आंत शरण न आल्यास कैद करण्याचा इशारा दिल्यावर बंडखोर,मळइखोर बाई शरण आली. अश्या धोकादायक स्रीला तिथे ठेवणे शक्य नसल्याने दातिया राज्याच्या मदोरा किल्ल्यात ठेवले.आणि झाशी राज्य निर्वेध झाले.तानुमावशी बोलायची थांबल्यावर मनूला त्या दुर्देवी दिवसाची आठवण झाली.स्वामींना स्रीवेशात बघीतल्यावर ब्रम्हांड आठवले होते. हातात तलवार घेऊन वार्याच्या वेगाने अबलख घोडा पळवणारा,इंग्रजांशी दोन हात करणार्या स्वाभिमानी पुरुषाची प्रतिमा मनांत कोरली होती.मावशी!मला शारिरीक सुखाची अभिलाषा कधीच नव्हती ग!पण....आतां सुधारलेत ना राजे?
नाही मावशी!आपल्याच पतीवर नजरबाज नेमावे लागावे यापरते दूर्देव कोणते असेल?सुंदरच्या पतीला शपथ देऊन त्यांच्या सर्व हालचालींचा वृत्तांत तो रोज देतो.आज स्वामींनी भेट दिलेल्या पालखीतुन व राजे घोड्यावरुन महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचा बेत होता,पण बेत रद्द झाल्याची वर्दी आली. चौकशीअंती कळले की,महाराज अस्पर्श बसल्याचा आज तिसरा दिवस आहे!इतकी मर्दानगी,दिलेरी पण सारे व्यर्थ...
उद्या महास्नानाची तयारी सुरु आहे.छीः! हे असले विभित्स!मावशीने पोकळ सांत्वन करण्याचा प्रयत्न केला...सुंदर च्या नर्याने महास्नानाच्या तयारीचे समग्र वर्णन केल्यावर जायला सांगीतले.संतापा ने खदखदत सोहळा सुरु झाल्यावर राणी साहेब तिथे पोहचल्या.त्या आलेल्या पाहुन महाराजांसह सारे स्तब्ध घाबरत उभे राहिले.महारांजे वस्र लाल झालेले पाहुन राणीसाहेब दिःगमुढ झाल्या. महाराजांना खरच तसं काही....कलशात काय आहे असं जरबेने विचारल्यावर सेवक थरथरत कसंबसं उत्तरला...कुंकुम जल!क्षणांत त्यांना सारा उलगडा झाला. पवित्र कुंकु या अपवित्र कामासाठी?कुंकुम जलाने स्नान? असले नाटक?सेवकांच्या समोर बोलताही येत नव्हते. त्या महाराजांच्या समीप जाऊन अगदी हलक्या आवाजात म्हणाल्या,हे सर्व पाहुन आमच्या अंगी ज्वर भरलाय!धन्य झालो आम्ही....दिलेल्या शपथा,शब्द,तो करारीपणा,वचक कुठे गेले? आम्हाला सर्वांसमोर अपमानित करुन जाऊ नका. आमचा न्हाहण्याचा सोहळा पुर्ण करण्या ची आज्ञा द्या.संताप आवरत सेवकांना आज्ञा देऊन खदखदत त्या तडक महाली परतल्या.समोर मावशी दिसल्याबरोबर त्यांचा बांध सुटुन त्याना मिठी घालत मटकन् खालीच बसल्या.
दोन प्रहरांनी तजेलदार मर्दानी वेशातील राजेसाहेब त्यांच्यासमोर आल्याबरोबर त्या थक्कच झाल्या. हे मर्दानी रुप खरे की ते रुप? स्वामी आम्ही खचुन गेलो,पार कोसळुन पडलोय! महाराज! आपण दिलेला शब्द, शपथ मोडली.नियतशाबुती,शपथ,वचने जर पाळल्या गेल्या नाही तर,नात्याचे फक्त कलेवर उरतात. राणीसाहेब! आपण आमचा आब राखला,अब्रु जपली, आम्ही आभारी आहोत याचा आम्ही नक्की सन्मान करु.
आपला मनातील खदखदणारा संताप मनातच गिळुन अत्यंत संयमाने त्या म्हणाल्या, महाराज! जसा स्रीवेश वर्ज्य केला तसाच हाही प्रकार...जन माणसांत चर्चा,हसु,बदनक्षा होतो.अशा गोष्टी कर्नोपकर्णी होतात.महाराज! सामान्यांनी कोणत्याही केलेल्या चुका क्षम्य असतात,पण राजकर्त्यानेच असं विकृत...महाराज! आमचा रोष न धरावा आपल्या अश्या विकृत वागण्याने वचक, दरारा,मर्दानगी कलंकित होते.पुनरावृत्ती होऊ नये ही काळजी घेणे आमचा पतिव्रताधर्म!उतरल्या चेहर्याने महाराज निघुन गेले.
दुसर्या दिवशी अपराधी भावाने महाराजांनी राणीकक्षेत प्रवेश करुन म्हणाले,आम्हाला कळतय की,हे योग्य नाही,पण अस्पर्श बसण्याची उर्मीच येते. वैद्यकीय इलाज झाले.वैद्य म्हणतात ही व्यसनविकृती....मनाला आम्ही खुप आवरायचा प्रयत्न करतो पण मनाविरुध्द मन हे विकृती घडवुन आणतय!खुप प्रयत्न चालु आहे पण यश येत नाही, आम्हीही शर्मिंदा आहोत,आम्हालाही अपार कष्ट,शीण येतो.राणीसाहेब! आपण थोर मनाच्या,प्रगल्भ बुध्दीच्या, दूरंदेशी,न्यायदृष्टी आहात.पंडीत जसा बालकाहस्ते अक्षरे गिरवुन घेतात तैसी दृष्टी आम्हावर ठेवा,मदत करा.लक्ष्मीबाई चे मन सहानुभुतीने भरुन आले.महाराज व्यसनरुग्न आहेत तर?वैद्याच्या सहाय्याने यातुन मार्ग काढण्याचे त्यांनी मनोमन ठरवले.

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...