विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 July 2024

*🙏🌴🌹!!! झाशीची राणी !!!🌹🌴🙏* *भाग - ६*.

 


*🙏🌴🌹!!! झाशीची राणी !!!🌹🌴🙏*

*भाग - ६*.

मिरवणुकीच्या प्रारंभी हाती उंच निशाण उभारुन पांच घोडेस्वार,नंतर वाजंत्री चौघडे,त्यामागे बॅंडपथक,नंतर घोडेपथक आणि आश्चर्यकारक स्रीयांचे २० घोड्यांचं घोडदळ,त्यामागे तुतार्या च्या निनादात सजलेल्या हत्तीवर चांदीच्या अंबारीत महाराज गंगाधरराव आणि महाराणी,त्यामागे मानर्यांचे दोन हत्ती,मागे नर्तकीचा ताफा!झाशीच्या राज रस्त्यावरुन मिरवणुक जात होती.स्रीयां च्या घोडदळावर फुलें उधळली जात होती.राजा राणीच्या जयजयकाराने आकाश दुमदुमुन गेले.झाशीला एक समर्थ राणी मिळाली होती.जनता गवाक्ष सौधावरुन,वाटेच्या दुतर्फा फुले ऊधळत नमस्कार करीत होते.
गंगाधररावांचे मनूशी विवाह झाल्या वर त्यांनी आपल्या ३२ वर्षीय सासर्याचे मोरोपंताचे लग्न चिमाबाईसंगे लावुन दिले.ते दोघेही झाशीच्या महालातच राहत होते.तानुमावशी व मोरोपंत पत्नी चिमाबाईसह आपल्या कन्येचा सुख सोहळा तृप्त मनाने डोळ्यात साठवुन घेत होते.जयजयकार करीत होते.नाना साहेबांनी हत्तीवर घेतले नव्हते म्हणुन रुसलेली बालमनू त्यांना आठवत होती. मिरवणुक सीमाल्लोघंन करुन महालक्ष्मी चे दर्शन झाल्यावर किल्ल्यावर येताच राजाराणींनी तानुमावशी,मोरोपंत व चिमाबाईस आदरवंदना दिली आणि समारंभ संपला.
दसरा झाला.या प्रसंगाची चर्चा सर्वीकडे सुरु होती.राजांमधला आमुलाग्र बदल,बंद झालेल्या नाटकशाळा, सुरु केलेली शस्रागारे, तालिमखाने...आपला राजा समर्थ होतसे पाहुन रयत सुखावली त्याचबरोबर राजाराणी काशी यात्रेला जाणार म्हणुन आनंदीत झाले.
झाशीच्या राजप्रसादाचं काम संपत आलं.झाशीत अनेक कलाकार,चित्रकार, विणकर राजश्रयास आल्याने झाशी गजबजुन गेली.राजांनी राजकारणांत पुर्ण लक्ष घातल्याने लाखो रुपयांचं कर्ज फिटलं,केवळ ३६ हजाराचंच कर्ज बाकी होतं.तंटे मिटत होते.कोषागारात भर पडत होती.छोट्या मोठ्या माणसांपर्यत न्याय पोहचत होता.पत्रव्यवहार नियमित होत होता.गरीबाना,शेतकर्यांना जातीवंत खिल्लारे वाढण्यास,पाटांची डागडुज्जी,ऊत्तम बि-बियानांची लावणी, जागोजागी पाण्याचे नहर,या सर्वासाठी मदत मिळाल्याने झाशीचा उत्कर्ष होऊ लागला.राजास दुवा आणि महाराणीच्या कर्तुत्वाची व शुभ पायगुणांचे कौतुक होऊ लागले.महाराणी तानुमावशीला म्हणाल्या,विकृत व्यसनांचा म्हसारा,बंध तोडणे महाकठीण,पण स्वामींनी सहज शक्य करुन दाखवले.
देवी अहिल्याबाईंनी खंडेराव व मालेरावांना व्यसनांच्या विळख्यातुन बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्यांचे सारे प्रयत्न विफल झाले,पण तुम्ही मात्र असामान्य काम करुन दाखवले.तेवढ्यात राजे येत असल्याची वर्दी आली. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व मानकरी,मदतनीस व जवळचे सर्व दिवानखाण्यात जमा झाले.सर्व येऊन बसल्यावर थोड्याच वेळात लव्याजम्या सह महाराज प्रवेशुन सुशोभीत आसना वर स्थानापन्न झाले.त्यांच्या शेजारी महारीणीही बसल्या.आजच्या सोहळ्या च्या प्रयोजनार्थ प्रधानमंत्रीनी निवेदनास सुरुवात केली.झाशी व भोवतालचा परीसर सोनारपेठ,विणकरांचे माग,रेशीम व्यापार व अन्य उद्योगधंदे सुरु झाल्या मुळे गजबजुन गेला.देवमूर्तीचे मुकुट, किरीट,कुंडले,अनेक मंदिरांचे जिर्नोध्दार,समृध्द ग्रंथसंपदा वृध्दींगत झाले हे सारे महाराणींच्या प्रेरणेने!विद्वानांना राजाश्रय,कारागीर,विणकर, कोष्टी,मजुर यांच्यासाठी सरकारी घरकुले नवीन दोन पाठशाला,वैद्य संशोधन कार्य महाराणींच्या अथक प्रयत्नाने व दूरंदेशीने होत आहे.त्याप्रित्यर्थ गौरव म्हणुन त्यांच्या सन्मानार्थ खास चांदीची लाल मखमली महीरपी,मोत्यांची माळा, मखमली गादी लोडांनी सजलेली पालखी प्रेमादराने महाराज भेट करीत आहेत. त्यांना पालखीपेक्षा अबलख घोडा जास्त आवडला असतां.तरीसुध्दा या अनमोल भेटीचा स्विकार करुन, महालक्ष्मी दर्शना ला या पालखीतुन जाऊन महाराजांची इच्छा त्यांनी पुर्ण करावी.
टाळ्यांच्या कडकडाटात भरुन आलेल्या मनाने महाराणी उठुन म्हणाल्या,आम्ही तर केवळ भिक्षुकाची कन्या!स्वामींनी आम्हास इथपर्यत आणल.तानुमावशीने माणुस म्हणुन घडवलं.स्वामींची इच्छा आम्ही जरुर पुरी करु! पण,आज फिरंगा चारही बाजुने या भूभागाचे लचके तोडत आहे,कुटील कारस्थान,लाचलुचपत देऊन माणसं फितवत असुन आंतपर्यंत शिरकाव करीत आहे.त्याच्या पारिपात्यास्तव घरांघरांतीन सैनिक निर्मिण व्हावा. प्रत्येकाची पंचेंद्रिय सावध असावे, आपल्या झाशीचा किल्ला अभेद राहावा ही आपणांसर्वांकडुन अपेक्षा करुन महाराजांच्या या अद्वितिय भेट(पालखी) चा स्विकार करते.

क्रमशः

संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...