विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

!!! झाशीची राणी !!! भाग - १०.

 


!!! झाशीची राणी !!!
भाग - १०.
राणीसाहेब गर्भवती असल्याच्या आनंदवार्तेने सर्वजन,विशेषतः राजेंना अतिशय आनंद झाला.खरं म्हणजे जगनन्नाथपुरीला जायचे होते पण....या पुढची यात्रा पालखीतुन झाला.काशीला पोहोचल्यावर चैत्रगौरीचा समारंभ थाटात पार पडला.या समारंभातच ही आनंद वार्ता सर्वांना सांगण्यात आली.डोहाळे फार कडक,पहिले चार महिने फारच जड गेले तरी त्या अधुनमधुन राजांना कान पिचक्या देतच असे.राजे त्यांची सर्वतो परी काळजी घेत होते.राणीसाहेब!ईश्वर आपले मनोरथ पुर्ण करतील.आतां ४-५ महिने सर्व विचार,कामे बाजुला सारुन फक्त येणार्या बाळावर लक्ष केंद्रीत करा.
मार्गशीर्ष एकादशीला राणी लक्ष्मी बाईंनी पुत्ररत्नास,झाशीच्या भावी राजास जन्म दिला.राजेंच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही.बारशाचा मोठा थाट,घरोघरी गुढ्या तोरणे,सडा, रांगोळ्या,हत्तीवरुन पेढ्यांच्या थाळ्या, सुवासिंनींच्या ओट्या भरणे,भजन किर्तन,कलावंतीणींचे नृत्य आनंदाला सगळीकडे ऊत आला.
आणि या आनंदावर विरजण पडले.२-२॥ वर्षाच्या दामोदरास ताप येऊ लागला.राणीच्या डोळ्यांना धारा... सर्व इलाज,उपचार,देवधर्म अनुष्ठाने वाया गेले.मायबापाच्या मांडीवर चिमण्या दामोदरने प्राण सोडले.
राजे गंगाधरराव मोडुन पडले.म्हणाले तानुबाई!पहिला पुत्र व पत्नी रमाबाई दोघेही देवाघरी गेल्यावर जीवन रिक्त वाटत होते पण लक्ष्मीबाईच्या आगमनाने मन टवटवीत,प्रफुल्लीत झाले होते.त्यांना पुत्र झाल्याने आम्हाला स्वर्गीय आनंद झाला होता.पण दैवाला आमचे सुख पहावले नाही.आमच्यातील सहनशक्ती संपली.नाही सहन होत म्हणुन हमसु हमसु रडु लागले.आणि राणीसाहेब? त्यांचा विलाप तर बघवत नव्हता.पण पुढचं सारं करणं भाग होतं.राजे लडखडतव उठले अन् भोवळ येऊन धाडकण पडले.शुध्द हरपली..राणी साहेबांचा हंबरडा सर्वांचीच ह्रदये चिरीत गेली.
गेल्या ६-७ महिन्यापासुन किल्ल्यात नुसती स्मशानशांतता होती.राजे अगदी कोलमडुन गेले.मनाच्या विषन्नतेने कंबर दुखी,पाठदुखी आटोक्यात येत नव्हती. त्यात त्यांच्या मोठ्या बंधुंनी ठेवलेल्या कंचनीचा पुत्र,म्हणजे पुतण्या अलिबहादुर कपटकारस्थाने करुन छळत होता.त्यामुळे त्याचे महाल जप्त केले. शांती हरवुन बसलेल्या राजेंना राणी साहेब हरप्रकारे समजावत पण, संताप, चीड,राग,आततायी वर्तन...यामुळे अलिकडे दोघांतील संवाद भांडणाणेच संपत असत.राजे कांहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.प्रकृती खालावतच होती.
अशातच घोडे विकणारा सौदागार घोडे घेऊन आला.राणीसाहेब अश्वपरीक्षे साठी येताच सौदागाराने कुर्निसात करुन दोन घोडे समोर केले.राणींनी दोन घोडे मंडलाकार फिरवुन आणले व तिसर्या घोड्यावर रपेट करुन आल्यावर आसनस्थ झाल्या.सौदागारा!घोडा कुशीत दुखावला आहे ही गोष्ट निदान आमच्याकडे येतांना तरी लपवायला नको होती.हे घोडे आम्ही व्यापारउद्दीम किंवा गाडीला जुंपण्यासाठी नव्हते घेत तर आम्हाला पाठीवर घेऊन जाण्यासाठी हवे त एवढंही भान असु नये?राणींनी केलेली अचुक,अप्रतिम अश्वपरीक्षा पाहुन प्रथम तो आवाक झाला,पण त्याच्याकडुन झालेली चुक लक्षात येताच तो पायी कोसळुन,क्षमा मागुन परत असं घडणार नाही हे कबुल केले.त्याकाळी अश्वपरीक्षेत तीनच लोक तज्ञ होते.नाना साहेब,शिदे व स्वतः मनुबाई.
अश्व विकत घेतल्याचे कळताच, राजेसाहेब चिडुन म्हणाले,हवेत कशाला घोडे?कुठला युवराज बसणार?आमची मनःस्थिती काय अन् करतां काय?महाराज!पुत्रवियोग आम्हालाही झालाय, पण राज्य चालवणार्यांनी रडत बसुन चलायचे नाही.चालवा राज्य...चालवा...
‌ वादावादी झाली की,त्या तानु मावशी जवळ येऊन मन मोकळं करत. मग त्या लक्ष्मीबाईची समजुत घालत. मनूताई शांत व्हा.महालक्ष्मीला शरण जा. तीच तारणहारी आहे.अहिल्यादेवींचा आदर्श समोर ठेवा.त्यांच्या समोर किती प्रकारची संकटे,घरांतील,राजकारणातील समाजकारणातील,धार्मिक,आर्थिक,पण सार्यांशी समर्थपणे झुंज देत शर्थीने, पुरुषार्थाने सामना केलाच ना?मावशी! त्यांच्याइतके धैर्य आमच्याकडे कुठे? विदिर्ण झालेले महाराज बघवत नाही. एखादा बालक दत्तक घ्यावा का?एक दिवस ज्वरक्लांत महाराजा जवळ बसल्या असतांना दत्तकाचा विषय काढीत म्हणाल्या,आपले मुळ पुरुष रघुनाथ रावांच्या धाकटे पुत्र खंडेरावांचा पुत्र आनंदा बद्दल...राणीसाहेब उत्तम विचार....झाशीच्या वारसाच्या चिंतेने ह्रदय भुंग्याप्रमाणे पोखरत आहे. ब्रिटिशांचा अमलफैल जोरात.... तलवारी गंजुन गेल्यात.दिल्लीचा राजा वृध्द!ग्वाल्हेरचा राजा अज्ञान, हैदर तर इंग्रजभक्त....वारस नसला तर झाशी ताब्यात घ्यायला आयतेच निमित्य इंग्रजांना मिळेल.त्या दत्तकाच्या तजविजीस लागल्या

.
‌ क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...