विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹* *भाग - ९.*

 


*🌹!!! झाशीची राणी !!! 🌹*


*भाग - ९.*

महाराजांना त्यांच्या विकृतव्यसना पासुन मुक्त करण्याचे आश्वासन दिल्या वर दुसर्या दिवशी त्यांनी भेट दिलेल्या पालखीतुन महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचे निश्चित करुन महाराज निघुन गेलेत.दुसर्या दिवशी महाराणी पालखी तुन व महाराज त्यांच्या लाडक्या सिध्दबक्ष हत्ती ठुमकत पुढे चालला होता यथासांग पुजा झाली. बरेच दिवसांनी राणींचे मन प्रथमच सहानुभुतीने भरुन गेले.पती दर्शनाने त्या मुग्ध झाल्या.पुजे च्या वेळी काशीयात्रेचा संकल्प सोडला.
दुसर्या दिवशी पासुन काशीयात्रे ची तयारी सुरु झाली.ही सारी पाहुन गांगरुन गेलेल्या मनुला मावशी म्हणाल्या देशाटन म्हणजे महापर्वणी,अनेक प्रजाजन भेटतात,त्यांची दुःख,वेदना जाणुन त्या निवारण्याचा प्रयत्न करावा लागतो,त्यांच्याशी बोलावं,मिसळाव लागते.त्यांची मनं सांभाळावी लागतात. मनू तुच या दौलतीस वाढवा घालुन प्रजेस सांभाळशील.एक दिवस हिच झाशी तुझ्या जयजयकाराने दिपुन जाईल.मावशीच्या अंतरंगात चित्र साकारुं लागले....धावत्या अबलख घोड्यावर स्वार झालेली झाशीची राणी, शुभ्रवेश,गळ्यात मौक्तीक माला,अंगी चिलखत,हातात ढाल तलवार असलेला उगवलेला उंच दिमाखदार हात,तेजस्वी डोळे,स्वाभिमानी चेहरा...
माघ महिन्यांत यात्रेकरुंचा थोरला कबिलाचे प्रस्थान झाले.सुवासिनींनी राजाराणीस ओवाळले,पुष्पवर्षाव झाला नी राजाराणीचे दोन सुंदर अलंकृत अश्व वेशीबाहेर पडले.आपली राणी पालखीत न बसतां घोड्यावर बसते याचाच सर्वांच्या चेहर्यावर अभिमान होता.एकच भाव होता,झाशी चा वारस राणीचे उदरी यावा....
यात्रेचा काफीला ठीकठीकाणी मुक्काम करुन तिथल्या प्रजाजनांच्या समस्या,व्यथा त्यांची राणी समजुन घेते, सामान्य मानसागत् त्यांच्यात मिसळते हे पाहुन प्रजाजन स्तंभीत झाली.कुठे नाच गाणे,कुठे नाटके,कुठे कथा,कुठे पोवाडे, गीत करत मजेत काफीला पुढे जात होता.चित्रकुट मुक्कामावर तर तानु मावशीने रामाच्या कथा रंगुन सांगीतल्या.अवघं वातावरणच जणुं राममय झालंय!हसत खेळत यात्रा प्रयाग कडे निघाली.पुर्वजांची श्राध्दे होत होती. पुर्वीचा इतिहास,पुर्वजांच्या कथा ज्या तानुमावशीच्या मुखोद्गत होत्या.सखुबाई चे बंड, तीने पोटच्याच मुलाला मारण्या साठी कसे कारस्थान रचले होते,स्वतःचा मुलगा रामचंद्राचा मृत्यु व्हावा म्हणुन तलावात फाळ वर करुन भाले रोवुन कसे ठेवले होते,पण रामचंद्रांनी कंपनी सरकारला कालपी क्षेत्राचा बंडावा मोडण्यासाठी सत्तर हजार,चारशे घोडे स्वार,दोन तोफा,हजारो पैदल सैनिक देऊन मदत केली होती ती जाण ठेवुन कंपनीसरकारच्या वफादारांना सखुबाई च्या कटाचा सुगावा लागल्याने त्यांनी वेळीच कळवल्यामुळे त्यावेळी रामचंद्र वाचले,पण अचानक २८ वर्षांच्या रामचंद्राचा मृत्यु झाला.रघुनाथराव, शिवरामभाऊ वगैर्यांच्या आठवणी सांगत यात्रा प्रयागला पोहचली.
गंगेवरील घाट,स्थाने,देवदर्शन, त्रिवेणी संगमात वेणीदान,घाटावर अनेकांकडुन होणारे पितृतर्पण!मोरोपंतां नी सुध्दा राणीसाहेबांच्या आईचे तर्पण केल्याचे पाहुन त्या गलबलुन गेल्या.त्या नंतर यात्रा काशीकडे निघाली.काशीच्या कमिशनरांना कळविल्यामुळे राजांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. ब्रिटिश सेना वेशीपाशी राजांना सामोरी आली.राजाराणीचा जयजयकार होत त्यांना सभास्थानी आणण्यांत आले. सर्वांनी उभे राहुन अभिवादन केले.पण एक व्यक्ती बेदारकपणे बसलेला पाहुन राजांनी त्याला बखोटीस धरुन उभे केल्यावर तो चिडुन म्हणाला,आम्ही काशीचे धनिक सावकार अन् आमचा एवढा अपमान?आम्ही कंपनी सरकारचे नोकर..एखाद्या मांडलिक राजासाठी... फार बोललात!हा सन्मान व्यक्तीचा नसतो तर राज्याच्या मातीचा,देशप्रितीचा असतो.त्याने माफी मागीतल्यावर दिलज माई होऊन प्रकरण मिटले.राणीसाहेबांना बरे वाटले. राजांच्या देवदर्शनाची सर्व व्यवस्था चोख ठेवल्या गेली.अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेली ब्रम्हपुरी पाहुन राणीसाहेब थक्क झाल्या.सर्व यात्रीक घाटावर मनसोक्त फिरत होते. गंगेतुन वाहणारी घाण बघुन राणीसाहेबां ना भडभडुन उलटी झाली.प्रकृती एकदम बिघडली.तानुमावशीला आलेली वेगळी शंका,वैद्याच्या नाडीपरीक्षणाने खरी ठरली.झाशीचा वारस येण्याची आनंद वार्ता राजांना कळल्यावर ते आनदाने भारवुन गेले.

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...