!!! झाशीची राणी !!
भाग - १९.
राणीसाहेबांच्या बोलण्याने प्रत्येक दरबारी भारावुन गेला.शेतकर्यांचा सारा माफ केल्याने त्यांनी आनंदाने पेरण्या केल्या.तात्या टोपेकडुन हेर बातम्या कळवित होते.तोच गंगाधर राजेचे लांबचे चुलतभाऊ सदाशिवरावांनी १६ जुनला अभिषेक करवुन "झाशीके गौरव महाराज सदाशिवराव नारायण" हा किताब घेतला.राणीसाहेबांनी त्वरीत कार्यवाही करुन त्यांना किल्ल्यात बंदी केले.या यशानंतर महत्वाच्या व्यक्तींना मोठमोठे पदे देऊन त्यांचा गौरव केला. महिलांचे सैन्यदल वाढवल.आपल्या सारंगी घोडीच्या पाठीवर स्वार होऊन राणीसाहेब झाशीच्या गल्ली सडकावरुन सैनिकांना,कर्मचार्यांना सूचना,मार्गदर्शन करीत फिरत याचा त्यांना सार्थ अभिमान वाटे.शिपयांना चांगले खायला घालुन स्वतः गुळ लाह्या खाणार्या या वत्सल, कर्तुत्वानवान राणीसाठी सख्या,दरबारी, प्रजा,कर्मचारी,शेतकरी,व्यापारी हे सारेच जीवाला जीव देण्यास सज्ज होते.
ओरच्छा आणि दतियातील राज्या च्या मनांत राणींविषयी दरवर्षी ६०००रु. कर,लगान द्यावा लागतो म्हणुन अढी,राग होता त्यामुळे त्यांच्याशी कधीही युध्दास तोंड लागु शकणार होते.राणींनी युध्दाची जय्यत तयारी केली.सारी झाशी तन मन धनाने राणीसाहेबांच्या पाठी ठामपणे उभी होती.त्या स्वतः सैनिकांच्या घरी जाऊन अन्नपाण्याची सोय,शस्राची चौकशी करत आधार देत होत्या.गणपती मंदिरात भोजणासाठी मुक्तदार ठेवण्यात आले.बाणापुरच्या राजाने इंग्रजांशी असहकार पुकारल्यामुळे व आधीच राजाची आणि राणीसाहेबांची बहिण भाऊपणाची आणक्रीया असल्यामुळे, आपली बायका मुले,राणीवसा झाशीत आणुन ठेवुन स्वतःला युध्दात झोकुन दिले.पण इंग्रजांच्या आधुनिक शस्रापुढे टिकाव लागला नाही.बाणापुर इंग्रजांच्या ताब्यात गेले.पराभूत राजे झाशीस येऊन म्हणाले,राणीसाहेब!आमच्या प्रयत्नाला यश नाही आले.
बंधो!आपण इथे राहुन किल्ल्या च्या संरक्षणाकडे जातीने लक्ष द्यावे.हे ही आपलेच राज्य आहे.ओरच्छाहुन धमकीचे पत्र आले आहे.
राणीसाहेब! झाशीहुन,शिंदे सरकारच्या ग्वाल्हेरला जाणारी डाक आमच्या छापेमारांनी पकडली.त्यातील प्रत्येक कागद पाहत असतां,झाशीहुन बेनाम फितूरीचे झाशीराज्य घेण्याबद्दलचे मजकुराचे पत्र मिळाले,तेच सांगायला मुद्दाम इथे आलोय!राणीसाहेबांनी एवढ्या रात्री ताबडतोब सभा बोलावली. एका ताटात बाण आणि बेलभंडार ठेवले होते.सभेमधे बाणापुरच्या राजाने पत्र वाचन करतांच सर्वांच्या मुखातुन आश्चर्यो द्गार निघाले.आपल्याच सरदारांना शपथ द्यावी लागते केवढे दुर्देव?सर्वांनी बेलभंडार हाती घेऊन झाशीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.बाणेपुरचे राजे त्याच रात्री परिवारास घेऊन वेत्रावतीकडे निघुन गेले.ओरच्छाकडुन आक्रमण होणारची वार्ता रोज वेगाने येत होती.
जुनमधे राणींचं राज्य सुरु झालं, त्याच महिन्याअखेरीस सागरसिंग डाकु खिसनीच्या जंगलात आल्याची खबर मिळाली.त्याच्या सोबतच्या हत्यारी जमाव ठीकठीकाणी दरोडे,लुटालुट,रक्त पात करत असल्यामुळे बरुआसागरची जनता त्रस्त झाली.राणींच्या नजरबाजां नी सागरसिंग किसलीच्या जंगलात लपुन असल्याची खबर आणल्यावर जंगल व डोंगराला राणीने वेढा घातला.वेढा घातले ला पाहुन तो पळुन जाऊ लागल्याबरोबर राणींनी स्रीसैनिकांसह पाठलाग करुन त्याचेवर वार केल्याने तो घोड्यावरुन कोसळताच त्याला बरुआसागरला आणुन कैद केले.राणींचा पराक्रम पाहुन प्रभावित होऊन तो शरण आला व आपल्या सैन्यासह राणींच्या सैन्यात सामिल झाला.राणींच्या पराक्रमाने प्रजा उल्हासीत झाली.
श्रावणी पोर्णिमेला येणार्या भुजरियाच्या मेळाव्याच्या तयारीला प्रजा व्यस्त झाली.सर्व शहर सजुं लागले.मंदिर सजले.नांगर आणि चामर असलेला राणी साहेबांचा झेंडा किल्ल्यावर फडकत होता आणि त्याचवेळी ओरच्छाचा नत्थे खाॅं ससैन्य झाशीकडे निघाल्याची वार्ता मिळाली.राणींनी सर्वांना एकत्रीत करुन, भेदभाव विसरुन नत्थेखाॅंला चोख उत्तर देण्याचे आव्हान केले.
सप्टेंबरमधे नत्थेखांने झाशीला वेढा दिला.झाशीच्या परकोटाचे दरवाजे सख्त बंद असल्यामुळे ओरच्छासैनिकांचे नगरांत घुसण्याचे प्रयत्न वाया गेले. परकोटावरुन झाशीचे सैनिक नत्थेखाॅं च्या सैनिकांवर उकळते पाणी,तेल,पेटते गवत,दगडधोंडे फेकल्याने सैनिक जखमी होऊन पडुं लागले.एका फटक्यात झाशी घेऊ ही नत्थेखांची घमेंड पार उतरली.साधे परकोटाचे दारही उघडुं शकला नाही.झाशी सैनिकांनी छापामार करुन त्या सैनिकांना हैराण केले.ओरच्छा सैनिकांचे मनोबल ढासळले.त्याचवेळी स्रीसैन्यासह राणी मैदानात ऊतरल्या. घनसाम लढाई झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
No comments:
Post a Comment