विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 August 2024

सरसेनापती संताजीराव घोरपडे, राणी चेन्नम्मा

 



सरसेनापती संताजीराव घोरपडे, राणी चेन्नम्मा,,🚩
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एक युद्धनितीचा भाग म्हणून किंवा राजकीय मुत्सद्दीपणा म्हणून राजाराम महाराज हे पन्हाळगडावरून दक्षिणेकडे जिंजीकडे प्रस्थान करत असताना बेदनुरच्या राणी चेन्नम्मा हिने राजाराम महाराजांना मोगलांच्या पाठलागापासून दूर ठेवण्यासाठी मोगलांना विरोध करत बेदनुर येथे आश्रय दिला होता आणि या गोष्टीची औरंगजेबाला हुरहुर लागली होती. औरंगजेबाने राणी चेन्नम्मा हिचा बिमोड करण्यासाठी आणि राजाराम महाराजांना कैद करण्यासाठी जाननिसार खानाच्या नेतृत्वाखाली मतलबखान आणि शर्जाखान यांना ससैन्य पाठवले होते. परंतु संताजी घोरपडे यांचे मोगलांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. गुप्तहेरांकडून बातमी येताच संताजी घोरपडे एखादा शिकारी जसा आपल्या सावजामागे जातो तसे संताजी घोरपडे आपल्या सैन्यासह या तीन खांनाच्या मागावर निघाले. संताजी घोरपडे यांनी जाननिसारखानाला आणि त्याच्या सैन्याला बेदनुरमध्ये शिरण्याआधीच हल्ला चढवून त्याच्या सैन्याची धुळधाण उडवली. तूफानी वेगवान घोड़दौड़ करत योग्यवेळी गाठून जाननिसारखानाचा आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला (ऑक्टो-नोव्हें १६८९) महत्वाचे म्हणजे संताजी घोरपडे यांनी राणी चेन्नम्मा हिच्या राज्याचे संरक्षण केले आणि राजाराम महाराजांच्या पाठलागावर असलेल्या मोगल सैन्याला रोखले आणि राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास सुरक्षित केला. नाहीतर संभाजी महाराजांवर कैदेचा प्रसंग ओढ़ावला तसा प्रसंग राजाराम महाराजांवर ही ओढवला असता हे निश्चित पण संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाने हा प्रसंग टाळला,
१ - राणी चेन्नम्मा चित्रकार - @abhiacharya1990
२ - सरसेनापती संताजीराव घोरपडे ,चित्रकार -@pramodmorti
@sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...